ADVERTISEMENT
home / Care
केस धुण्याआधी करा हा उपाय, केसांचे गळणे होईल कमी

केस धुण्याआधी करा हा उपाय, केसांचे गळणे होईल कमी

केस तुटणे आणि केस गळणे या समस्या आजकाल जास्तच गंभीर होताना दिसत आहे. वाढणारे प्रदूषण आणि चुकीचा आहार यामुळे तुमच्या केसांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. एवढंच नाही तर केसांचा वातावरणातील धुळ, माती आणि घामाशी सतत संपर्क आल्यामुळे केसांच्या इतर समस्या दिवसेंदिवस वाढतात. याचाच परिणाम तुमच्या केसांच्या आरोग्यावर नकळत होत असतो. अशा वेळी तुमच्या केसांना अती काळजी आणि निगेची गरज असते. केस गळणे रोखण्यासाठी आणि केसांच्या स्वच्छतेसाठी केसांवर नियमित योग्य शॅम्पूचा वापर करणंही तितकंच आवश्यक आहे. मात्र सध्या बाजारात मिळणाऱ्या अनेक शॅंम्पूंमधून तुमच्या केसांसाठी योग्य शॅंम्पू निवडणं वाटतं तितकं नक्कीच सोपं नाही. म्हणूनच हा उपाय तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचा आहे. केस धुण्यापूर्वी अर्धा तास आधी हा उपाय करा आणि मिळवा घनदाट आणि मजबूत केस.

केस गळणे रोखण्यासाठी अगदी सोपा आणि घरगुती उपाय –

बऱ्याचदा तुम्ही एखादी जाहिरात पाहून अथवा कुणाच्यातरी सल्ल्यावरून केसांसाठी शॅंपूची निवड करत असता. मात्र अशा पद्धतीने निवडलेले शॅंम्पू तुमच्या केसांसाठी योग्य असतीलच असं नाही. जर हे शॅंम्पू तुमच्या केसांच्या प्रकारासाठी योग्य नसतील तर तुमचे केस अधिक प्रमाणात गळू लागतात. शिवाय यामुळे तुमच्या केसांच्या इतर समस्यांही हळूहळू अधिकच वाढतात. यासाठी योग्य तज्ञ्जांचा सल्ला घेणे नेहमीच फायदेशीर ठरते. मात्र जर तुम्हाला केसांसाठी कोणता शॅंम्पू निवडावा हे समजत नसेल तर असा योग्य शॅंम्पू मिळेपर्यंत तुम्ही नैसर्गिक साधनांचा केस धुण्यासाठी वापर करू शकता. तुमच्या किचनमधील अनेक घटक तुमच्या केसांच्या स्वच्छतेसाठी नक्कीच उपयुक्त आहेत. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत एक अशी युक्ती शेअर करत आहोत. ज्यामुळे तुमचे केस तर स्वच्छ होतीलच शिवाय तुमचे केस गळणेही थांबेल.

Shutterstock

ADVERTISEMENT

केस धुण्यापूर्वी अर्धा तास आधी करा हा उपाय –

तुमच्या स्वयंपाक घरातील खाण्याचा सोडा अथवा बेकींग सोडा तुम्ही केस स्वच्छ करण्यासाठी वापरू शकता. कारण बेकींग सोड्यामध्ये अॅंटि फंगल आणि अॅंटि बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. ज्यामुळे केंसामध्ये कोंडा व इतर इनफेक्शनच्या समस्या होत नाही. त्याचप्रमाणे यामुळे स्कॅल्पचे आरोग्य सुधारते. ज्यामुळे केसांची तुटण्याची आणि गळण्याची समस्या आपोआप कमी होते. शिवाय तुमचे केस पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आणि घनदाट होतात. 

हा सोपा उपाय करण्यासाठी खालील स्टेप जरूर फॉलो करा – 

– एका भांड्यात अर्धा कप बेकींग सोडा घ्या.

– सोडयाच्या तिप्पट पाणी त्यामध्ये मिसळा.

ADVERTISEMENT

– या मिश्रणाला व्यवस्थित मिक्स करा.

– बेकिंग सोड्याचे मिश्रण एका स्प्रे बॉटल मध्ये भरून ठेवा.

– एका वेगळ्या भांड्यात अर्धा कप अॅपल सायडर व्हिनेगर घ्या  मिश्रणाच्या चौप्पट त्यात पाणी मिसळा.

– त्यात काही थेंब लवेंडर ऑईलचे मिसळा.

ADVERTISEMENT

– हे मिश्रण एकजीव करून एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. 

अशाप्रकारे दोन स्प्रे बॉटल तयार करून ठेवा.

या साधनांचा कसा कराल वापर –

केस धुण्याआधी अर्धा तास आधी बेकिंग सोड्याचे मिश्रण स्प्रे बॉटलने केसांवर शिंपडा आणि केस अर्धा तास सैलसर बांधून ठेवा.  त्यानंतर वीस ते तीस मिनीटांनी केस थंड पाण्याने स्वच्छ धुवा. केस धुतल्यावर अॅपल सायडर व्हिनेगरपासून तयार केलेले मिश्रण कंडिश्नरप्रमाणे केसांना लावा. त्यानंतर पाच ते दहा मिनिटांनी केस पुन्हा स्वच्छ धुवा. अशा प्रकारे केस धुतल्यामुळे तुमच्या केसांचे गळणे नक्कीच कमी होईल. कारण बेकिंग सोड्यामुळे केस स्वच्छ होतील आणि अॅपल सायडर व्हिनेगरमुळे केस मऊ आणि मुलायम होतील. ज्यामुळे तुमचा स्कॅल्प आणि केसांची मुळं मजबूत होतील आणि तुमचे केस गळणे हळूहळू कमी होऊ लागेल.

ADVERTISEMENT

 

 

यासोबतच अधिक वाचा –

जास्वंदीच्या फुलाने घरीच करा केस असे चमकदार

ADVERTISEMENT

केस घनदाट दिसण्यासाठी वापरा 7 सोप्या टिप्स

केस वाळवताना अशी घ्या काळजी, नाही होणार नुकसान

 

03 Jul 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT