ADVERTISEMENT
home / Fitness
रात्री जेवणानंतर खा गुळ, आहे फारच फायदेशीर

रात्री जेवणानंतर खा गुळ, आहे फारच फायदेशीर

 

लाडू, मोदक, भाजी, आमटी, पुरणपोळी, गुळपोळी, ओल्या नारळाच्या करंज्या अशा कित्येक पदार्थांमध्ये गुळ घातला जातो. चवीला गोड लागणारा गुळ हा फक्त चवीला गोड म्हणून वापरला जात नाही तर तो आरोग्यासाठीही चांगला म्हणून खाल्ला जातो. गुळापासून तयार केलेले पदार्थ आपण रोज खाऊ शकत नाही. पण गुळाचे सेवन तुम्ही रोज करु शकता. रोज तुमच्या आहारात गुळ असेल तर तुम्हाला त्याचे आरोग्यदायी फायदे मिळतात. विशेषत: रात्रीच्या जेवणानंतर काहीतरी गोड खाण्याची इच्छा होत असेल तर तुम्ही गुळाचा थोडासा खडा तोंडात टाका. रात्री जेवणानंतर गुळ खाल्ले की, तुम्हाला च्याचे फायदेच फायदे होतात. ते कोणते ते आता जाणून घेऊया.

चिंच-गुळाची अशी चटणी कराल तर स्वयंपाकात असा होईल तिचा वापर

पोट ठेवते निरोगी

 

पोटाचे आरोग्य चांगले ठेवणे आपल्या सगळ्यांसाठी फार आवश्यक आहे. कारण त्यावरच आपले संपूर्ण आरोग्य अवलंबून आहे. गुळामधील घटक पोटांच्या सगळ्या विकारांना दूर ठेवते. पोटामध्ये तयार होणारे गॅसेस, अपचनाचे त्रास गुळामुळे कमी होतात. म्हणून जेवणानंतर  गुळाचा छोटासा खडा चघळा तुम्हाला गोड खाल्ल्याचे समाधान मिळेल आणि तुमच्या पोटाचे आरोग्यही चांगले राहील. 

रक्त करते शुद्ध

 

गुळाच्या सेवनाचा आणखी एक फायदा म्हणजे रक्त शुद्धीकरण. गुळाच्या सेवनामुळे रक्त शुद्ध होते. शरीराला कोणताही संसर्ग झाला तर गुळ फारच फायदेशीर ठरते. शरीराला उष्णता प्रदान करुन संसर्गाचा यशस्वी नायनाट करण्यास गुळ मदत करते. 

ADVERTISEMENT

रोगप्रतिकारशक्ती वाढवते

गुळ

Instagram

 

शरीर निरोगी असेल तर तुम्हाला कोणतेही आजार होत नाहीत. तुमच्या आहारात चांगल्या गोष्टी असतील तर तुमचे आरोग्य चांगले राहते. तुमच्या शरीराला इतर आजारांपासून दूर ठेवण्याचे काम गुळ करु शकते. दररोज तुम्ही गुळ खाऊ शकता. विशेषत:रात्री जेवणानंतर तुम्ही गुळ खाऊ शकता. तुम्हाला तुमच्यामध्ये नक्कीच फरक जाणवेल. 

हिमोग्लोबिन वाढवते

 

जर तुमच्या शरीरात रक्त कमी असेल तर तुम्ही अगदी आवर्जून गुळाचे सेवन करायला हवे. गुळाचा इवलासा खडा तुमचे हिमोग्लोबिन वाढवायला मगत करते. हिमोग्लोबिनची कमतरचा असेल तर तुम्ही गुळ- शेंगजदाण्याचे सेवन करु शकता. 

स्वयंपाक करताना चटका लागला तर त्वचेवर त्वरीत करा हे घरगुती उपाय

ADVERTISEMENT

सांधेदुखी करते कमी

 

गुळामध्ये लोह आणि कॅल्शिअम असते.जर तुम्हाला सांधेदुखी आणि सतत थकवा जाणवत असेल तर तुम्ही गुळाचे सेवन करायला हवे. गुळ हे उष्ण असते. तुमच्या शरीराला उर्जा देण्याचे काम हे करते. तुमची सांधेदुखीही यामुळे कमी होते. 

स्त्रियांसाठी फारच फायदेशीर

गुळाचे रोज करा सेवन

Instagram

 

स्त्रियांसाठी गुळ फारच फायेदशीर आहे. महिलांचे कामांमुळे आणि इतर तणांवामुळे आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. मासिक पाळी आणि चुकीचा आहार यामुळे महिलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण फारच कमी असते. गुळामध्ये लोह असल्यामुळे गरोदरपणात आणि बाळ झाल्यानंतर महिलांनी गुळ खायलाच हवे. दररोज रात्री झोपताना तुम्ही गुळ खायला हवा. याशिवाय तुम्ही नियमित गुळाचा चहा प्यायल्यास, आरोग्यासाठी फायदा मिळतो.

आता लक्षात ठेवा दररोज रात्री गुळाचा छोटासा खडा तरी तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी खा.

ADVERTISEMENT

DIY खोकला बरा करण्यासाठी घरीच तयार करा होममेड कफ सिरप

18 Aug 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT