logo
Logo
User
home / xSEO
Funny Jokes In Marathi For Friends

मित्रांसोबत शेअर करा मस्त मराठी जोक्स | Funny Jokes In Marathi For Friends

मानव हा समाजशील प्राणी आहे. त्यामुळे प्रत्येकालाच आयुष्यभर चांगल्या मित्रांची गरज असते. प्रत्येकालाच असे मित्र हवे असतात जे तुम्हाला कठीण काळात मदत करतील. जे तुमच्या आनंदात सहभागी होऊन तो द्विगुणित करतील आणि जे तुमच्या दुःखाच्या काळात, कठीण काळात तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहून तुमच्या चेहेऱ्यावर हसू आणतील.  मित्रच नसते तर आपण आज कुठे असतो हा विचार एकदा करून बघा. मित्रांशिवाय आयुष्य अगदी निरस आणि निराश वाटते कि नाही? मैत्री ही बर्‍याच गोष्टींची गुरुकिल्ली आहे. मित्रांबरोबर आपण आयुष्यातला सुंदर काळ घालवतो जो अनेक वर्षांनी आठवून सुद्धा आपल्या चेहेऱ्यावर एक स्मित उमटते. 

एखाद्या पांचट जोकवर तुमच्या जिवलग मित्रासोबत खळखळून हसणे यापेक्षा उत्तम थेरपी कोणतीही नाही हे सगळेच मान्य करतील. मित्र हे आपली एक्सटेंटेड फॅमिलीच असतात ज्यांना तुमची सर्व रहस्ये माहित असतात आणि त्यांच्या आधाराने तुम्ही लव्ह लाईफ पासून ते करियर पर्यंत अनेक महत्वाचे निर्णय घेता. अशा तुमच्या BFFच्या  चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी एखादा  नवीन मार्ग शोधत आहात? पुढे दिलेल्या जोक्स (Funny Jokes In Marathi For Friends ) पैकी तुमच्या मित्रांना काही Funny Jokes In Marathi आणि मित्रांबरोबर हसण्याची मजा घ्या. 

मित्रांसाठी कॉमेडी मराठी जोक्स | Comdey Marathi Jokes For Friends

Funny Jokes In Marathi For Friends
Funny Jokes In Marathi For Friends

चिंटू : यार मला सांग I am going याचा अर्थ काय?

पिंटू : मी जात आहे.

चिंटू : असा कसा निघून जातोस यार! सकाळपासून मी 20 जणांना हाच प्रश्न विचारला आणि सगळेच मी जातोय असं म्हणाले. जाताना उत्तर देऊन जा.

दोन मित्र दारूच्या नशेत रेल्वे रुळांच्या मध्यभागी चालत होते.

पहिला : अरे देवा, मी याआधी इतक्या पायऱ्या कधीच चढल्या नाहीत.

दुसरा: अरे पायऱ्या तर ठीक आहेत, पण त्यांना धरण्यासाठी रेलिंग किती खाली आहे ते बघितलेस का?

अधिक वाचा – वाढदिवसाला पाठवण्यासाठी भन्नाट विनोद

संता – याच मुलीशी मी लग्न करणार आहे

बंता – अरे मी तर हिला ओळखतो  

संता – मूर्खा, तू हिला कसा काय ओळखतोस ? 

बंता – ही आणि मी एकत्र झोपलेलो असताना पकडले गेलो होतो. 

संता – काय?? कधी ?

बंता –  अरे ती आणि मी एकाच गणिताच्या क्लासला जायचो. 

एक मुलगा कॉलेजमध्ये पोहोचताच, आनंदाने उड्या मारू लागला. 

मित्र – काय झालं, तू एवढा आनंदी कसा आहेस?

मुलगा – आज पहिल्यांदा माझ्याशी एक मुलगी स्वतःहून बोलली. 

मित्र – अरे वा! कसं काय?

मुलगा – मी बसमध्ये बसलो होतो आणि ती मुलगी येऊन म्हणाली, ऊठ ही लेडीज सीट आहे. 

खेड्यातील एक मुलगा शहरातील मुलीला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत असतो. 

तो मुलगा तिच्या मैत्रिणीला म्हणतो – बघ किती attitude  आहे तुझ्या मैत्रिणीमध्ये

मैत्रीण – attitude चे स्पेलिंग सांग बरं जरा,

मुलगा – जाऊदे attitude नाही, ego आहे. 

अधिक वाचा – 100 एप्रिल फूल जोक्स, SMS मराठी मध्ये 

मित्रांसाठी नवीन मराठी जोक्स | Funny Jokes In Marathi For Friends

मित्रांबरोबर मनसोक्त हसणे यासारखा दुसरा आनंद कोणता? तुमच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये जे जोक्स (Funny Jokes In Marathi For Friends) पाठवा आणि मित्रांना हसवा.  

Funny Jokes In Marathi For Friends
Funny Jokes In Marathi For Friends

सोनू त्याचा मित्र रवीला ज्ञान देत होता.

परीक्षेत पेपर अवघड असेल तर….

डोळे बंद करा,

एक दीर्घ श्वास घ्या,

आणि मोठ्याने म्हणा-

हा विषय खूपच मजेशीर आहे. पुढच्याही वर्षी पुन्हा हाच विषय शिकेन.

समुद्राच्या लाटांसारखे आयुष्यात अनेक मित्र येतात आणि जातात, पण खरे मित्र तेच जे आपल्या चेहऱ्यावर ऑक्टोपससारखे चिकटून राहतात. 

चिंटू: आई, आता आंब्याचा रस फार महाग होईल, मग आपण काय करायचं?

 आई : loanचं  बघा… 

राजू: आई, हा आंबा नाय पिकणार, याचं काय करायचं?

आई : Pickle  

अरे माझ्या मित्रांना कुणीतरी सांगा खोटं बोलायची पण काही लिमिट असते….

काल एका मित्राला पैसे परत मागण्यासाठी घरच्या लँडलाईन वर फोन केला तर तो म्हणतो,

“अरे यार, थोड्यावेळाने फोन करतो,  मी आता गाडी चालवतोय…..” 

वाचा – नात्यांची फिरकी घेणारे मराठी सुविचार टोमणे

लेटेस्ट मराठी जोक्स मित्रांसाठी | Latest Marathi Jokes For Friends In Marathi

Funny Jokes In Marathi For Friends
Funny Jokes In Marathi For Friends

मित्र म्हणजे आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग, आपल्या कुटुंबाचाच एक हिस्सा असतात. अशा मित्रांना हसवत ठेवणे म्हणजे आपली जबाबदारीच नाही का? मग वाट कसली बघताय हे पीजे (पांचट जोक्स- Funny Jokes In Marathi For Friends) वाचून तुमच्या मित्रांच्या ओठांवर हास्याची लकेर नक्कीच उमटेल. 

एक वेळेस हरवलेले प्रेम परत मिळेल पण,

मित्रांना दिलेले पेन कधीच परत मिळत नाही..

-अखिल भारतीय पेन दे ना, पाच मिनिटात परत देतो संघटना !!!

पगारवाढ मागितली की बॉस म्हणतो “तू काय काम करतोस “;

आणि रजा मागितली की म्हणतो “तुझं काम कोण करणार ”

-अखिल भारतीय एक काहीतरी ठरवा संघटना 

परीक्षेचा पेपर लिहीत असताना..

चिंटू: पिंट्या, दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर दाखव

पिंटू: मी नाही लिहिले. 

चिंटू: मग तिसऱ्या प्रश्नाचं दाखव 

पिंटू: नाही लिहिलं. 

चिंटू : बरं ४, ५, ६ ?

पिंटू: नाही लिहिलं काही, 

चिंटू: आईशप्पथ पिंट्या तू जर का पास झालास ना तर तुला कसा मारला ते सावधान इंडिया मध्ये दाखवतील.

संता : काय रे, कुठे पळतो आहेस?

बंता : अरे काल गर्लफ्रेंडला मस्करीत म्हणालो..“दिल चीर के देख, तेरा ही नाम होगा”

तर कालपासून ती येडी, चाकू घेऊन माझ्या मागे लागलीये!!!

Funny Jokes In Marathi For Friends

वाचा – वाढदिवसाला पाठवण्यासाठी भन्नाट विनोद

कॉलेज च्या मित्रांसाठी लेटेस्ट मराठी जोक्स – Marathi Jokes For College fridends

शाळेच्या मित्रांच्या किंवा कॉलेजच्या मित्रांच्या whatsapp ग्रुपवर शांतता पसरली आहे? मग यापैकी कुठला जोक (Funny Jokes In Marathi For Friends) त्या ग्रुपवर पाठवा आणि ग्रुपवर सगळ्यांना जागं  करा. 

Funny Jokes In Marathi For Friends
Funny Jokes In Marathi For Friends

होस्टेलच्या रुम‬ वर राहणारी मुलं तोपर्यंत भांडी घासत नाहीत जोवर … 

‪चहा‬ कढईत करायची वेळ येत नाही 

अखिल भारतीय जुगाडू संघटना 

एक मुलगा देवाला विचारतो,

मुलगा – देवा, ‘तिला गुलाबाचं फूल का आवडतं??? ते तर एका दिवसात मरून जातं….!

मग तिला मी का आवडत नाही ??? मी तर तिच्यासाठी रोज मरत असतो…….!

देव-‘भारी रे! एकच नंबर! व्हॉट्सऍपवर स्टेट्स टाक पटकन!

पिंटू: अरे चिंट्या, हे आंब्याचे झाड अचानक बोलू लागले तर काय मज्जा येईल ना!

चिंटू: हो ना मजाच येईल ! कारण, ते बोलू लागल्यावर आधी तुला म्हणेल…गाढवा, मी वडाचे झाड आहे.

ज्योतिषी: तुझे नाव गणपत आहे?

गणपत: हो..

ज्योतिषी: तुला एक मुलगा आहे?

गणपत: हो महाराज!

ज्योतिषी: तू काल कोपऱ्यावरच्या दुकानातून पाच किलो गहू ,चार किलो तांदूळ व दोन किलो डाळ घेतलीस?

गणपत: चमत्कार… अद्भुत.. महाराज तुमचे चरण दाखवा..तुम्ही इतके अचूक कसे काय ओळखले?

ज्योतिषी: कारण तू पत्रिकेऐवजी तुझे रेशनकार्ड दाखवायला आणले आहेस. 

बॉसला त्याचा आधीचा एम्प्लॉयी अचानक भेटतो. 

बॉस: अरे रमेश तू इथे वडापाव विकतो आहेस, गेल्या वर्षीच तर तू चांगल्या कंपनीत जॉईन झालास ना?

रमेश : (हळू आवाजात) ..काय करणार सर, महागाईच इतकी आहे. ते बघा जे वडापाव आणि भजी तळत आहेत ना ते माझे बॉस आहेत. 

बॉस- बास कर यार! रडवतोस का? कधी ये बायकापोरांना घेऊन माझ्या पावभाजीच्या गाडीवर! इथे मागच्याच गल्लीत सेकण्ड शिफ्ट करतो मी. 

Funny Jokes In Marathi For Friends

वाचा – Marathi Jokes Sms | Jokes Marathi Sms

शाळेतल्या मित्रांसाठी लेटेस्ट मराठी जोक्स – Marathi Jokes For School Friends In Marathi

शाळेतल्या बालमित्रांबरोबरचे साधे संभाषण सुद्धा जोकसारखेच असते नाही का? त्या वर्गातल्या शिक्षेच्या आठवणी, मधल्या सुट्टीत शेअर केलेला जेवणाचा डबा, यासारख्या आठवणी आयुष्यभर पुरतात. हे वाचून आली ना तुम्हालाही मित्रांची आठवण? मग चला तुमच्या त्या बालमित्रांना हे जोक्स (Funny Jokes In Marathi For Friends) पाठवा आणि त्यांच्या चेहेऱ्यावर हसू फुलवा. 

जेव्हा कोणी म्हणेल की “या जगात प्रेमापेक्षा कठीण दुसरं काहीच नाही….”

तेव्हा लगेच त्याच्या तोंडावर गणिताचं पुस्तक फेकायचं आणि म्हणायचं,

जरा हा इंटिग्रेशनचा प्रश्न सोडवून दाखव बरं”

आजी: चिंटू तुला माहितेय का आमच्या काळी भाज्या, ब्रेड, दूध, साबण, मसाले, अंडी, मांस, सर्व काही एका रुपयात विकत घेता यायचं!

चिंटू : पण आजी आता तसं करता येत नाही कारण सगळ्या दुकानांत सीसीटीव्ही कॅमेरे असतात. 

संता – मला आज बँकेतील नोकरीवरून काढून टाकण्यात आले. 

बंता- आता काय केलंस तू? 

संता – काही नाही रे, एक म्हातारी आजी आली आणि मला तिने तिचा बॅलन्स तपासायला सांगितला, म्हणून मी तिला ढकलून दिले. तिचा बॅलन्स अजिबात चांगला नव्हता!

हॉस्पिटलमध्ये एका व्यक्तीला नर्स म्हणते 

नर्स- तुम्हाला फार वेळ थांबावे लागले त्यासाठी आम्ही दिलगीर आहोत. 

मी – काही हरकत नाही. मी पेशन्ट (Patient) आहे. 

एक शिंपी बसमध्ये चढला, बसमध्ये खूप गर्दी होती. 

तेवढ्यात त्याला फोन आला, त्याने फोन उचलला आणि म्हणाला…

तू आधी हात कापून टाक, नंतर मी येऊन गळा कापतो.

हे ऐकून संपूर्ण बस रिकामी झाली. 

Funny Jokes In Marathi For Friends

घरातल्या रोजच्या कटकटी, ऑफिसचा ताण यापासून जर कुठे चार क्षण निवांतपणा मिळत असेल तर तो मित्रांना भेटल्यावर ,मित्रांशी बोलताना मिळतो. समजा मित्रांना भेटायला जमले नाही तरी त्यांना मेसेज तर करूच शकतो ना? मग पाठवा तुमच्या मित्रांना हे मजेदार विनोद – (Funny Jokes In Marathi For Friends) 

Funny Jokes In Marathi For Friends
Funny Jokes In Marathi For Friends

बायको – तू खूप स्वार्थी आहेस. 

नवरा – परमेश्वरा! आता काय झालंय?

पत्नी – तुझ्या लॅपटॉपमध्ये जे फोल्डर आहे, त्याचे नाव तू अवर डॉक्युमेंट्स असेही ठेवू शकला असतास.

आता नवऱ्याने मायक्रोसॉफ्टला मॉडिफिकेशन सजेशन करण्यासाठी मेल केला आहे.

12 वर्षांनंतर तो तुरुंगातून बाहेर आला

घाणेरड्या कपड्यांमध्ये खूप थकलेला असा तो घरी पोहोचला. घरी पोहोचल्यावर बायको ओरडली. 

इतका वेळ कुठे फिरत होतात? तुमची सुटका होऊन 2 तास उलटून गेले. कुठे शेण खायला गेला होतात?

तो माणूस पुन्हा तुरुंगात गेला.

बायको – ऐका ना! आजकाल चोऱ्या खूप वाढल्या आहेत. 

बाहेर वाळत असलेले आपले दोन टॉवेल कुणीतरी चोरले. 

नवरा – कोणते टॉवेल?

बायको – अहो तेच जे आपण मनालीच्या हॉटेलमधून आणले होते.

नवरा – ऐक ना!  माझ्यात असं तू काय पाहिलंस जे बघून तू माझ्याशी एक शब्दही न विचारता लग्न केलेस?

बायको – मी फक्त तुम्हाला तीन चारदा बाल्कनीतून भांडी घासताना बघितले होते. 

सासू: काय जावई बापू पुढच्या आयुष्यात काय व्हायला तुम्हाला आवडेल?

जावई: सासूबाई, पुढच्या जन्मात मला पाल व्हायला आवडेल. 

सासू : शी! पाल का? 

जावई : कारण तुमची मुलगी जगात फक्त पालीलाच घाबरते. 

मित्रांसाठी खास मराठी जोक्स – New Funny Marathi jokes For Friends

भावंडं आणि मित्र यांच्या बरोबर आपण लहानपणापासून जी मजा करतो ती आठवणींची शिदोरी आपल्याला आयुष्यभर पुरते. भावंडं , मित्र यांच्याशी रोज भेटणं बोलणं होत नसलं तरी त्यांची आठवण आपल्या मनात ताजीच असते. त्यांचा एक मेसेज किंवा फोन म्हणजे आपल्यासाठी थंडगार हवेची झुळूक असते. त्यांनाही तुमच्याबाबतीत असेच वाटत  असणार. मग वाट कसली बघताय, जिवलग मित्रांना हे जोक्स (Funny Jokes In Marathi For Friends) पाठवा. 

Funny Jokes In Marathi For Friends
Funny Jokes In Marathi For Friends

आई – बाळा, इतकं मन लावून काय वाचतोस?

मुलगा – मी एका महत्वाच्या विषयाचा अभ्यास करतोय आई!

आई – शाब्बास! काय वाचतो आहेस? 

मुलगा – तुझ्या भावी सुनेचे एसएमएस वाचतोय!

आईने चप्पलास्त्राने हल्ला चढवला. 

संता गाडी चालवत असताना सिग्नल तोडतो आणि त्याला पोलीस पकडतात. 

पोलीस – काय रे, लाल सिग्नल दिसत नाही का? चल लायसन्स दाखव आणि दंड भर. 

संता – काय हो, तुम्हाला आम्ही सामान्य नागरिकच दिसतो का? तिकडे तो मल्ल्या आणि निरव मोदी घोटाळे करून पळून जातात त्यांना बरं सोडून देता तुम्ही!

पोलीस- आधी गप दंड भर आणि मग हे सगळं ज्ञान तिकडे फेसबुकवर पाजळ!

शिक्षक- बंड्या, उद्या गृहपाठ करून आणला नाहीस तर कोंबडा बनवेन! 

बंड्या- ओके सर, पण जरा झणझणीत बनवा, मी वडे घेऊन येतो. 

चिंटू- अरे वा! काय भारी मोबाईल आहे राव तुझा! कुठून घेतलास?

पिंटू – विकत नाही घेतला. धावण्याच्या शर्यतीत मिळाला!

चिंटू- किती जण होते शर्यतीत?

पिंटू – तीन! मी, पोलीस आणि दुकानाचा मालक!

एकदा नवरा बायको टीव्ही बघत असतात. टीव्हीवर म्हैस दिसते. 

नवरा- ती बघ तुझी नातेवाईक आहे टीव्हीवर!

बायको- अय्या… सासूबाई! 

बाबा- बंड्या , गाढवा, पुन्हा नापास झालास! जरा त्या शेजारच्या पिंकीकडे बघ. नव्वद टक्के मिळवले तिने!

बंड्या- बाबा, वर्षभर तिच्याकडेच बघत राहिलो, म्हणून तर नापास झालो. 

मित्रांच्या ग्रुपवर टाका हे मजेदार जोक्स (Funny Jokes In Marathi For Friends)

शिक्षक – काय रे झम्प्या, गाढवा वर्गात जरा अभ्यासाकडे लक्ष दे की! काय सारखा मुलींशी बोलत असतोस?

झम्प्या- सर मी गरीब घरचा आहे. मला स्मार्टफोन आणि whatsapp परवडत नाही. 

चिंटू – आजी, नमस्कार करतो. 

आजी- कुठे चाललास रे चिंट्या?

चिंटू- पळण्याच्या शर्यतीत भाग घ्यायला जातोय. 

आजी – सावकाश पळ रे बाबा!

आई – झम्प्या, जरा ते वाढलेले केस काप नाहीतर मी भादरून देईन. 

झम्प्या – काय आई, ही तर नवीन स्टाईल आहे. 

आई- गाढवा, काल तुझ्या ताईला पाहून गेलेल्या पाहुण्यांचा निरोप आलाय

लहान मुलगी पसंद आहे म्हणून, आता जा नांदायला.

ज्योतिषी- अरे वा गण्या, तुझं नशीब तर जोरावर आहे. पत्रिकेत पैसाच पैसा दिसतोय. 

गण्या- पण काका पत्रिकेतला पैसा अकाउंटमध्ये कसा ट्रान्सफर करायचा?

एक सरळ साधा पण गहन प्रश्न –

उन्हाळ्यात अगदी सूर्यासारख्या तापणाऱ्या शहराचं नाव ‘चंद्रपूर’ कोणी ठेवलं देव जाणे! 

Photo Credit – istockphoto

अधिक वाचा – बेस्ट आणि मजेशीर मराठी फिशपाँड

10 May 2022

Read More

read more articles like this
good points logo

good points text