तुमचंही लग्न ठरलं आहे का, मग आता काय शॉपिंगची घाई आणि लग्नासाठीची जमवाजमव नक्कीच सुरू झाली असेल. पण हे इथेच थांबत नाही. लग्न म्हटलं की, आजकाल प्री-वेडिंग शूटही आवर्जून केलं जातं. मग त्यासाठी सुरू होतो लोकेशनचा शोध. जर तुम्हीही प्री-वेडिंगसाठी लांब न जाता कमी वेळात करायचं प्लॅनिंग करत असाल तर बेस्ट ऑप्शन म्हणजे आपली मुंबई.
Table of Contents
प्री-वेडींगसाठी परफेक्ट आपली मुंबई (Perfect For Pre-wedding Your Mumbai)
आपली मुंबई…स्वप्नांचं जग असणारी मुंबई. जिथे सगळं आहे सुंदर समुद्रकिनारे, ऐतिहासिक वारसा असलेली स्थळं, गर्दीने गजबजणारे बाजार आणि काही मॉर्डन काळातील आश्चर्यकारक स्थळं. अशा या मुंबईला सोडून कशाला बाहेर जायचं pre-wedding शूटसाठी. ज्यामुळे तुमचं बजेटही कमी होईल आणि वेळही नक्कीच वाचेल.
प्री-वेडिंगसाठी परफेक्ट असलेली मुंबईतील लोकेशन्स (Perfect For Pre-Wedding Locations In Mumbai)
मुंबईतल्या या ठिकाणी गर्दीच्या वेळा टाळून पोचा. दिवसभर पोझ द्या आणि तुमच्या पार्टनरसोबतची तुमची केमिस्ट्री फोटोजमध्ये नक्की दिसू द्या.
1. व्हिटेंज प्रेमींसाठी (Asiatic Library)
Location Address Town Hall, Shahid Bhagat Singh Road Horniman Circle, near RBI, Fort, Mumbai, Maharashtra 400023
Speciality मुंबईतील टाऊन एरिया म्हणजेच सीएसटी किंवा फोर्टमध्ये तुम्ही प्री-वेडिंग वीकेंडला प्लॅन करू शकता. कारण या दिवशी इथे गर्दीही कमी असते आणि ट्रॅफिकही. त्यामुळे इथल्या अनेक ऐतिहासिक आणि व्हिटेंज लुक असणाऱ्या मुंबईतील लँडमार्क्ससमोर तुम्ही प्री-वेडिंग फोटोशूट करू शकता. जसं अनेक बॉलीवूड चित्रपटात दिसलेली एशियाटीक लायब्ररी. ज्याच्या पायऱ्यावर बसून तुम्हाला छान बॅकग्राऊंड मिळेल. ब्लॅक आणि व्हाईट कॉम्बिनेशनला मॅच होणाऱ्या कपड्यांमध्ये पेअरअप करून तुम्ही छान व्हिटेंज लुकही मिळवू शकता.
How to reach इथे तुम्ही टॅक्सी किंवा बसने पोचू शकता. याशिवाय खाजगी वाहनानेही इथे जाता येईल.
2) पोस्टकार्ड मूमेंट देणारं मरीन ड्राईव्ह (Iconic Marine Drive)
Location Address Netaji Subhash Chandra Bose Road, South Mumbai
Speciality दक्षिण मुंबईची शान असलेलं मरीन ड्राईव्ह हे जगभरात प्रसिद्ध आहे. ज्याचा लुक अगदी फ्लोरिडातील मिआमीसारखा आहे. जर तुमचं लव्ह मॅरेज असेल तर तुम्हीही हमखास इथे डेटवर आला असालच. मग त्या आठवणीही या निमित्ताने पुन्हा एकदा अनुभवता येतील किंवा फोटोशूटची थीमही तशी ठेवता येईल. इथे तुम्ही दिवसातल्या कोणत्याही वेळी प्री-वेडिंग शूट केलं तरी फोटो छानच येतील. मग ती अगदी पहाटेची वेळ असो वा संध्याकाळी अनेक दिव्यांनी चमचमणारा मरीन ड्राईव्ह असो.
How to reach मरीन ड्राईव्ह चर्चगेट स्टेशनपासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर आहे. त्यामुळे तुम्ही इथेही चालही पोचू शकता.
3) इतिहासाचा टच (Fort Of Vasai)
Location Address Killa Rd, Police Colony, Vasai West, Vasai-Virar, Maharashtra 401201
Speciality जर तुम्हाला दक्षिण मुंबईतील गजबज किंवा गर्दीची ठिकाणं टाळायची असतील तर तुमच्यासाठी बेस्ट पर्याय म्हणजे वसईचा किल्ला. इथे तुम्ही शांततेत तुम्हाला हवं तसं पोज करू शकता. तुम्ही जर गेम ऑफ थ्रोन्सचे फॅन असाल तर ती थीम ठेवूनही इथे तुम्ही प्री-वेडिंग करू शकता किंवा अगदी शिवकालीन थीम ठरवून पारंपारिक वेषातही शूट करू शकता.
How to reach वसई स्टेशनला ट्रेनने पोचून तुम्ही तिथून रिक्शाने वसईच्या किल्ल्याला जाऊ शकता किंवा खाजगी वाहनानेही इथे पोचू शकता.
वाचा – मुंबईची शान असलेला वडापाव खायचाय, तर ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या
4) मुंबईप्रेमींसाठी (Gateway Of India)
Location Address Apollo Bandar, Colaba, Mumbai, Maharashtra 400001
Speciality रोजच्या रोज अनेकजण मुंबईत येऊन या आयकॉनिक ठिकाणाला भेट देतात. मुंबईतील हे लँडमार्क सगळ्यांना माहीतच आहे. येथील व्हिक्टोरियन आर्किटेक्चर, मागे वाहणारा अथांग सागर, त्यावर तरंगणाऱ्या असंख्य बोटी आणि ताजमहाल हॉटेल या सर्व गोष्टी तुमच्या प्री-वेंडिग शूटला नक्कीच अविस्मरणीय बनवतील.
How to reach गेटवेला जाण्यासाठी तुम्ही सीएसटीहून शेअर टॅक्सी किंवा बसने पोचू शकता.
5) प्रेमिकांचं आवडतं (Bandstand)
Location Address Bandstand, Bandra, West
Speciality जर तुम्हाला फक्त खळाळता समुद्र आणि खडक असा नजारा हवा असेल तर बेस्ट ठिकाण म्हणजे रॉकी बीच असलेलं बँड स्टँड. इथे जुन्या पद्धतीचे लँपपोस्ट, बँचेस, भिंती आणि सी स्केप आहे. त्यामुळे इथे तुम्ही मस्तपैकी रोमँटीक आणि क्लासिक थीममधील प्री-वेडिंग फोटोशूट करू शकता.
How to reach बँडस्टँडला पोचण्यासाठी तुम्ही बस, रिक्षा किंवा खाजगी वाहनाचा वापर करू शकता.
6) निर्सगाच्या सान्निध्यात (Sanjay Gandhi National Park)
Location Address Western Express Hwy, Borivali East, Mumbai, Maharashtra 400066
Speciality जर तुम्ही अगदी पावसाळा संपताना आणि थंडीच्या सुरू होण्याआधी शूट करणार असाल तर निसर्गाचं वरदान लाभलेल्या नॅशनल पार्कमध्येही शूट करू शकता. तुम्ही जर पर्यावरणप्रेमी असाल तर यासारखी सुंदर जागा तुम्हाला मुंबईत क्वचितच मिळेल. कारण मुंबईच्या कुशीत वसलेलं हे हिरवंगार ठिकाण तुमच्या प्री-वेडिंगसाठी अगदी परफेक्ट आहे.
How to reach बोरिवलीला उतरून तुम्ही बस किंवा रिक्षाने इथे पोचू शकता किंवा हे अगदी हायवे टच असल्याने खाजगी वाहनाचा पर्यायही सोपा आहे.
7) अॅडव्हेंचर लव्हर्ससाठी (Imagica Theme Park)
Location Address 30/31 Sangdewadi, Khopoli-Pali Road, Near Lonavala, Khopoli, Maharashtra 410203
Speciality तुम्ही दोघंही अॅडव्हेंचर राईड्स चाहते आहात का? मग तुमच्यासाठी बेस्ट लोकेशन म्हणजे इमॅजिका थीम पार्क. जे मुंबईजवळही आहे आणि प्री-वेडिंग शूटसाठी हटकेही आहे. फोटोशूटनंतर कंटाळा आल्यावर तुम्हीही एखादा राईडही एन्जॉय करू शकता. आयुष्यातील खरं रोल-कॉस्टर राईड सुरू होण्याआधी थोडी मस्ती-मजा तो बनती है.
How to reach इमॅजिकाला पोचण्यासाठी खाजगी वाहनाचा पर्याय उत्तम आहे किंवा तुम्ही त्यांचं डे पॅकेज घेतल्यास तुमच्यासाठी पिक अँड ड्रोपची सोय केली जाते.
8) हटके असं (Central Park)
Location Address Sectors 23,24 and 25 at Kharghar, Navi Mumbai.
Speciality हे ठिकाणं अजून फारसं परिचित नाही. त्यामुळे तुम्हालाही तुमचं प्री-वेडिंग वेगळं वाटेल. हो…नवी मुंबईतील सेंट्रल पार्क तुम्हाला प्री-वेडिंगसाठी नक्कीच आवडेल. दूरवर पसरलेलं हिरवंगार आणि सुंदर लँडस्केपिंग केलेलं सेंट्रल पार्क फोटोशूटसाठी एकदम छान आहे. मग तुमच्या आयुष्यातील हे सुंदर क्षण टिपण्यासाठी यापेक्षा चांगलं ठिकाण काय असेल.
How to reach नवी मुंबईतील खारघरला पोचण्यासाठी तुमच्याकडे ट्रेन, बस, रिक्शा किंवा खाजगी वाहनाचा पर्याय आहे.
9) धावत्या मुंबईतील (Azad Maidan)
Location Address Mahapalika Marg, Azad Maidan, Fort, Mumbai, Maharashtra 400001
Speciality जर तुम्हालाही गर्दीतला भाग होऊन एखादं फोटोशूट करायचं असेल तर मुंबईतील आझाद मैदान ही जागा तुमच्यासाठी योग्य आहे. इतरवेळी जागा नसणाऱ्या मुंबईत तब्बल 22 एकरावर पसरलेलं हे आझाद मैदान अनेक घडामोडींच साक्षीदार आहे. मग मुंबईच्या अनेक चळवळींच्या प्रतीकाला तुमच्या ट्रू मुंबईकर फोटोशूटमध्ये नक्की जागा द्या. मस्तपैकी पहाटे इकडे पोचून तुम्ही छान पॅनोरमिक शूट करू शकता. ऑफिसला जायच्या आधी एखाद्या लुकमधील फोटो शूट कंप्लीट करायचं असल्यास ही जागा परफेक्ट आहे. बॅकग्राऊंडसाठी छत्रपती शिवाजी टर्मिनसची वास्तूही तुम्ही घेऊ शकता.
How to reach आझाद मैदानला तुम्ही सीएसटी स्टेशनहून चालत जाऊ शकता.
वाचा – मुंबईतील ‘10’ कमी बजेटमधील बॅंक्वेट हॉल
10) ऐतिहासिक (Horniman Circle)
Location Address Kala Ghoda, Fort, Mumbai, Maharashtra 400001
Speciality या ठिकाणाला इतिहासकालीन संदर्भ आहे. आता हे मुंबईचं आर्ट आणि फेस्टिव्हल्सचं माहेरघर बनलं आहे. असं म्हणायला हरकत नाही. इथे दरवर्षी सुफी म्युझिक फेस्टीव्हल्स आणि काला घोडासारखे फेस्टिव्हल्स आयोजित केले जातात. इथल्या सुंदर वास्तूशिल्पकलेला तुम्ही तुमच्या प्री-वेडिंग फोटोशूटसाठी वापरू शकता. तुमच्या फोटोशूटला ऐतिहासिक टच देण्यासाठी हॉर्निमन सर्कल उत्तम ठिकाणं आहे.
How to reach इथे तुम्ही अगदी चालत सीएसटी स्टेशनहून पोचू शकता किंवा बस व शेअर टॅक्सीचा पर्यायही आहे.
11) सन अँड सँड (Juhu Beach)
Location Address Juhu Beach, Santacruz, West
Speciality मुंबईतील प्रसिद्ध बीच म्हणजे जुहू बीच. येथे तुम्ही लग्न ठरण्याआधी अनेक रोमँटीक संध्याकाळ स्पेंड केल्या असतीलच. सध्या स्वच्छता अभियानामुळे हा बीच पुन्हा एकदा छान दिसू लागला आहे. मग पहाटे लवकर किंवा अगदी रात्री उशिरा पोचून तुम्ही एखादं हटके थीम फोटोशूट करू शकता. म्हणजे तुम्हाला गर्दीचा त्रासही होणार नाही. मस्त समुद्रकिनारा उगवणारा किंवा मावळता सूर्य आणि सोबतीला ती असं फोटोशूटही तुम्ही करू शकता. क्लासिक शॉट्ससाठी जुहू बीच परफेक्ट आहे.
How to reach जुहू बीचला जाण्यासाठी तुम्ही खार रेल्वेस्टेशनला उतरून बस किंवा रिक्षाने इथे पोचू शकता किंवा खाजही वाहनाचाही वापर करू शकता.
12) मॉर्डन आर्टचं साक्षीदार (Kala Ghoda)
Location Address Near Horniman Circle
Speciality दरवर्षी होणारा काळा घोडा फेस्टिव्हल आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. पण फेस्टिव्हल नसल्यावरही इथे काही ठिकाणं आहेत जी तुमचं लक्ष वेधून घेतात. ब्लू सिनेगॉग, घोड्याचं चित्र असलेली खैबर वॉल, मोठे फुटपाथ आणि आर्ट गॅलरीज इ. इथे काही फोटोज काढून त्याच्या मेमरीज तुम्ही नक्कीच कैद करू शकता.
How to reach इथे तुम्ही शेअर कॅब, बस किंवा खाजगी वाहनाने पोचू शकता.
13) रूपेरी वाळूतील (Madh Island)
Location Address Christian Wada, Madh, Mumbai, Maharashtra 400061
Speciality जर तुम्हाला जुहू किंवा गिरगाव चौपाटीसारखा समुद्रकिनारा हवा असेल आणि गर्दी टाळायची असेल तर मढ आयलंड तुमच्यासाठी आयडियल आहे. मढ आयलंड हे मुंबईतील गोवा आहे असं म्हणायला हरकत नाही. तुमच्या कँडीड प्री-वेडिंग फोटोशूटसाठी मढ आयलंड मस्ट आहे.
How to reach मढला जाण्यासाठी तुम्ही मालाडहून बस, रिक्षा किंवा खाजगी वाहनाचा पर्याय वापरू शकता. तसंच मढ जेट्टीहून तुम्हाला बोटीतून इथे पोचता येईल.
14) मुंबईचं मॅनहॅटन (BKC)
Location Address Plot No: RG1A, G Block, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai, Maharashtra 400051
Speciality हो…बीकेसी हे मुंबईच मॅनहॅटन आहे, असं म्हणायला हरकत नाही. इथेही भलेही काँक्रिटचं जंगल असलं तरी मॉर्डन वास्तूकलेचेही अनेक मार्व्हल्स तुम्हाला इथे दिसतील. इथे पोचणंही अगदी सोपं आहे आणि जर या भागात तुमचं ऑफिस असेल तर मग एकदमचं सोयीस्कर होईल. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या इथे तुम्हाला नैसर्गिक सुंदरता दिसणार नाही पण मानवनिर्मित मास्टरपीस नक्कीच दिसतील.
How to reach बीकेसीला तुम्ही कुर्ला किंवा ब्रांद्र्याहून रिक्षा, बस किंवा खाजगी वाहनाने पोचू शकता.
15) चौपाटीच्या परफेक्ट व्ह्यूसाठी (Hanging Garden)
Location Address Ridge Rd, Simla Nagar, Malabar Hill, Mumbai, Maharashtra 400006
Speciality तुम्हाला धमाल-मस्ती करत प्री-वेडिंग करायचं असेल तर तुमच्यासाठी अजून एक पर्याय म्हणजे हँगिंग गार्डन. इथल्या म्हातारीच्या बूटासोबत छानपैकी बालपणीच्या आठवणी आणि आत्ताचे तुम्ही अशी थीम ठेवून फोटोशूट करा. नेपियन सी रोडवरही काही फोटो काढायला विसरू नका. पहाटे किंवा संध्याकाळी उशिरा येथे तुम्हाला सुंदर फोटोज घेता येतील. तसंच इथली हिरवळही तुमच्या फोटोजना सुंदरच बनवेल.
How to reach इथे तुम्ही सीएसटी किंवा चर्चगेटला उतरून टॅक्सी, बस किंवा खाजगी वाहनाने येऊ शकता.
हेही वाचा –
लग्नाच्या दिवशी तुमच्या सौंदर्याला बहारदार बनवतील मुंबईतील