बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT) सुरू झालेल्या पहिल्या दिवसापासून कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत आहे. मग प्रतिक सहजपाल (Pratik Sehjpal) आणि नेहा भसीनमधील (Neha Bhasin) जवळीक असो, मुस्कान (Moose Jattana) आणि निशांतमधील (Nishant Bhatt) मैत्री असो अथवा दिव्या (Divya Aggarwal) आणि शमिताची (Shamita Shetty) भाडणं असोत. पण सर्वात जास्त चर्चा यावेळी झाली ती म्हणजे राकेश बापट (Raqesh Bapat) आणि शमितामधील वाढत्या मैत्रीची. या शो चा फिनाले विक सुरू झाला असून स्पर्धक जीव तोडून सध्या टास्क करत आहेत. तर नुकताच या दोघांचा एक व्हिडिओ व्हायरल दिसून येत आहे. शो च्या सुरूवातीपासूनच राकेश आणि शमितामध्ये एक वेगळा बाँड दिसून येत होता. शमिताने काही दिवसांपूर्वीच राकेश आपल्याला आवडत असल्याची कबुली करणकडेही दिली आहे. काही वेळा दोघांमध्ये भांडणंही होताना दिसली आहेत. मात्र बाहेर येऊन पुन्हा नवी सुरूवात करू असे दोघेही म्हणाले आहेत.
अधिक वाचा – ‘परशा’ अर्थात आकाश ठोसरचा नवा लुक करतोय चाहत्यांना घायाळ, फोटो व्हायरल
I Love You म्हटल्याचा व्हिडिओ व्हायरल
दरम्यान शमिता शेट्टी आणि राकेशचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये राकेशने आपल्याला शमिता आवडत असल्याचे कबूल केले आहे. राकेशच्या तोंडून असे शब्द ऐकून शमिताची बोलती बंद झाल्याचे दिसून आले आणि त्यानंतर शमिता या व्हिडिओमध्ये लाजली असल्याचेही दिसून आले आहे. व्हिडिओमध्ये शमिता आणि राकेश बेडवर बसले असून मस्ती करत असताना दिसून आले. तेव्हा शमिताने राकेशला काही चांगल्या गोष्टी बोल असं म्हटलं. तर शमिताच्या या शब्द ऐकून राकेश खूप वेळ शांत बसतो आणि तिला चिडविण्यासाठी आपल्यात काहीही चांगलं नाही असं सांगतो. यावर शमिता चिडते आणि त्याने काहीतरी बोलायचा हवं असा आग्रह करते. त्यानंतर राकेश खूप वेळ विचार करतो आणि शमिताला म्हणतो ‘Je t’aime’. हे ऐकल्यानंतर शमिता एकदम शांत बसते आणि लाजते. ‘Je t’aime’ हा फ्रेंच शब्द असून याचा अर्थ माझं तुझ्यावर प्रेम आहे अर्थात I Love You असा होतो. त्यामुळे आता घराबाहेर आल्यानंतरही या दोघांची केमिस्ट्री तशीच राहते का याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. पाहा दोघांचा क्यूट व्हिडिओ
अधिक वाचा – ज्ञानेश्वर माउली’ – ज्ञानेश्वरांची चरित्रगाथा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
शमिताच्या आईलाही आवडला आहे राकेश
काही दिवसांपूर्वीच शमिताची आई शमिताला भेटायला आली होती. सुनंदा शेट्टी (Sunanda Shetty) यांनी आपल्या मुलीला धीर दिला आणि राकेशची मनापासून प्रशंसा करत तो एक अत्यंत उत्तम माणूस असल्याचे सांगितले. शो मध्ये पोहल्यावर सुनंदा शेट्टीने शमिताच्या खेळाची प्रशंसा केली होती. इतकंच नाही तर शमिताला राकेश अत्यंत गोड माणूस आहे असंही सांगितले. शमिताच्या आईने सर्व स्पर्धकांची प्रशंसा केली. मात्र नेहा आणि राकेशबाबत त्यांनी आपले प्रेम व्यक्त केले. तसंच शमिता आणि राकेशची जोडी बाहेर सर्वांना आवडत आहे आणि चर्चेत आहे असंही तिने शमिताला यावेळी सांगितले. तर राकेशला जसा आहेस तसाच राहा कोणाहीसाठी बदलू नकोस असा सल्लाही शमिताच्या आईने दिला. खेळामध्ये कोणतीही संधी गमावू नकोस असंही सांगितलं. त्यामुळे आता शमिता आणि राकेशचा हा बाँड बाहेर आल्यावरही तसाच राहील का हे पाहावं लागेल.
अधिक वाचा – विशाल भारद्वाजच्या ‘खुफिया’मध्ये तब्बू आणि अली फजलची जोडी
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक