ADVERTISEMENT
home / मनोरंजन
bigg boss 15 karan kundrra and tejasswi prakash

Bigg Boss15: अखेर तेजस्वी आणि करणने व्यक्त केले प्रेम

बिग बॉसचा (Bigg Boss 15) हा सीझन म्हणावा तसा गाजला नाही. पण सर्वात जास्त गाजले ते म्हणजे करण कुंद्रा (Karan Kundrra) आणि तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash). पहिल्या दिवसापासून या दोघांमध्ये अत्यंत घट्ट मैत्री झाली आणि करणला सर्वात पहिल्यांदा तेजस्वीबाबत प्रेम वाटू लागले. त्याने ते नेहमीच शब्दांमधून व्यक्त केले नसले तरीही त्याच्या कृतीमधून तेजस्वी त्याला खूपच आवडत आहे हे दिसून येत आहे. अखेर TejRan च्या चाहत्यांसाठी तो दिवस उगवलाच आहे जेव्हा तेजस्वी आणि करणने एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त केले आहे. तेजस्वी आणि करण या दोघांच्याही वयात 8-9 वर्षांचं अंतर आहे. मात्र याचा कोणताही फरक पडत नसल्याचे दिसून येत आहे. करण आणि तेजस्वी हे दोघेही अगदी पहिल्या दिवसांपासून एकमेकांना साथ देत असून खेळातही तगडे असल्याचे दिसून आले आहे

तेजस्वी आणि करण एकमेकांच्या आले जवळ 

करण आणि तेजस्वी या दोघांचंही नाते खरं नसून दोघे जण नाटक करत असल्याचं नेहमी बोलण्यात आलं. मात्र इतका वेळ नाटकं करत राहू शकत नाही असं स्पष्टपणे तेजस्वी आणि करण यांनी वेळोवेळी सांगितलं आहे. तर अनेकांनी त्यांना खोटारडे ठरवलं असलं तरीही करण आणि तेजस्वीचा एक वेगळा फॅन फॉलोईंग आहे आणि त्यांच्या चाहत्यांना या दोघांनी एकमेकांकडे आपल्या प्रेमाच्या भावना व्यक्त केल्याचा आनंदच झाला आहे. #TejRan हा अगदी सुरूवातीपासूनच ट्रेंड होत असून आता दोघांनीही आपल्या भावना एकमेकांकडे व्यक्त केल्या असून घराच्या बाहेरदेखील आपण असेच एकमेकांना साथ देऊ असं दोघांनाही सांगितलं आहे. 

अधिक वाचा – पहिल्या दोन आठवड्यांमध्ये ‘झिम्मा’ने गाठला सहा करोडचा टप्पा

करणच्या भूतकाळाबद्दल तेजस्वीला आहे कल्पना

करणचा भूतकाळ हा सर्वांनाच माहीत आहे. मात्र त्याबाबत तेजस्वीला पूर्ण कल्पना आहे. तसंच करण आणि तेजस्वी यांच्यामध्ये खुलेपणाने चर्चा होत नसली तरीही अगदी पूर्वीच्या जोड्यांप्रमाणे डोळ्यांच्या खुणा आणि मनातल्या भावना यावरच दोघेही एकत्र आल्याचेही सर्वांना दिसून येत आहे. कधीही अंगचटीला न जाता अगदी सहजपणाने हे दोघे एकत्र आल्याने त्यांचे चाहतेही आनंदी आहेत. तसंच ही जोडी बाहेर आल्यानंतरही तशीच टिकून राहावी असंही म्हटलं जात आहे. सिद्धार्थ (Siddharth Shukla) आहे शहनाज गिल (Shehnaz Gill) #sidnazz या जोडीनंतर जर कोणत्या जोडीला अधिक प्रेम मिळत असेल तर ती म्हणजे तेजस्वी आणि करणची जोडी.  तर तेजस्वी आणि करणची जोडीही अनेकांना आवडत असल्याचे दिसून येत आहे.

ADVERTISEMENT

अधिक वाचा – कतरिना आणि विकीच्या लग्नात कोणाकोणाला आहे खास आमंत्रण

करणने वेळोवेळी व्यक्त केले प्रेम 

करणपेक्षा तेजस्वी लहान आहे. मात्र तिच्याबरोबर आपल्याला आयुष्य जगायला आवडेल असं वेळोवेळी करणने सांगितलं आहे. तर तेजस्वी आपल्यासाठी एक उत्तम जोडीदार असेल असंही करणने म्हटलं आहे. तर इथे घरात आल्यानंतर तेजस्वी आणि उमर रियाझ (Umar Riaz) यांच्यासह आपल्या मनाच्या तारा जुळल्या असल्याचंही त्याने छातीठोकपणे सांगितलं आहे. घराबाहेर गेल्यानंतरही या दोघांबरोबर आपलं नातं असंच राहील असंही करणेन सांगितलं. मात्र करणला सतत त्याच्या रागाबाबत या सीझनमध्ये टोकण्यात येत आहे. तर करणचे चाहते मात्र त्याला मनापासून पाठिंबा देताना दिसून येत आहे. तेजस्वी, करण आणि उमर या तिघांची मैत्री सर्वांनाच आवडत असून तेजस्वी आणि करण यांची जोडी अशीच टिकून राहावी असंही आता त्यांच्या चाहत्यांना वाटत आहे. 

अधिक वाचा – Bigg Boss Marathi: स्नेहा वाघची धमाकेदार एंट्री,जयची केली पोलखोल

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
07 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT