Advertisement

Weight Loss

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो वांग्याचा रस

Dipali NaphadeDipali Naphade  |  Nov 12, 2020
वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो वांग्याचा रस

Advertisement

वांग्याची भाजी म्हटली की कितीतरी जणांची नाकं मुरडतात ना? पण तुम्हाला वांग्याच्या भाजीचा आहारात समावेश  करून घेण्याचे फायदे माहीत आहेत का? तुम्ही तुमच्या नियमित डाएटमध्ये वांग्याच्या भाजीचा समावेश  करून घ्यायला पाहिजे. वांग्याचा रस वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतो म्हटलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे. कारण तुम्हाला हा प्रश्न पडेल की अरे वांग्याचा रस कसा काय प्यायचा? नुसतं वांगं खायलासुद्धा कसंतरी होतं मग वांग्याचा रस तरी कसा पिणार? तुम्हाला वजन कमी करायचं असेल अथवा मधुमेह आणि कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण आणायचे असेल तर तुम्ही हा प्रयोग नक्की करून पाहा.

जाडेपणा आणि वजन कमी करण्यास उपयुक्त

instagram

वांगं मेटाबॉलिजममध्ये अधिक वेग आणण्यास आणि शरीरातील चरबी कमी करण्यासाठी मदत करते. रोज केवळ 1 कप वांग्याचा रस पिऊन तुम्ही वजन कमी करू शकता. वांग्यातील फायबर तुम्हाला पोटामध्ये कमी भूक निर्माण करून पोट भरलेले असल्याचा आभास निर्माण करते. त्यामुळे तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर हा उत्तम उपाय आहे. तसंच यामध्ये सॅपोनिन असते जे चरबीचे अवशोषण करून तुम्हाला बारीक होण्यास फायदा करून देतात. तुम्ही तुमच्या डाएटमध्ये वांग्याचा समावेश करून घेतल्यास, तुम्हाला याचा फायदा मिळेल. पण त्याआधी तुम्ही डॉक्टरांचा सल्लादेखील घेणे गरजेचे आहे.

हृदयरोगी असणाऱ्यांसाठी चांगले

Shutterstock

वांग्यामध्ये विटामिन सी, बी6, फायबर, पोटॅशियम आणि फायटोन्यूट्रिएंट्स भरपूर प्रमाणात असते. हे सर्व तत्व आपल्या हृदयासाठी महत्त्वपूर्ण असतात. यामध्ये असणारे फ्लेवोनॉईड्सच्या संख्येमुळे वांग्याचा रस हा स्ट्रोक आणि हृदयाच्या झटक्याला कमी करण्यासाठी मदत करतात. आजकाल सतत बाहेरचे खाणे आणि बदलत्या लाईफस्टाईलमुळे सर्वात जास्त परिणाम होतो तो हृदयावर. त्यामुळे तुम्ही स्वतःला चांगले आणि निरोगी ठेवण्यासाठी याचा उपयोग करून घेऊ शकता.

कोलेस्ट्रॉल

वांगं आपल्या रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी उत्तम आहे. वांग्याच्या पानांचा रस यासाठी फायदेशीर ठरतो. त्यामुळे तुम्ही नियमित याचे सेवन केल्यास तुम्हाला त्रास होणार नाही.  कोलेस्ट्रॉल वाढल्यास, शरीरावर त्याचा वाईट परिणाम होतो. त्यामुळे तुम्ही वांग्याचा रस घेऊन याचा त्रास कमी करून घेऊ शकता.

मधुमेह

Shutterstock

मधुमेह ही हल्ली खूपच कॉमन समस्या झाली आहे. अगदी लहान वयातही मधुमेह असणाऱ्या व्यक्ती हल्ली जास्त प्रमाणात दिसू लागल्या आहेत. वांग्याने तुम्ही आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण तुम्हाला नियंत्रणात ठेवायचे असेल तर सेवन केल्यास, फायदेशीर ठरते. यामध्ये फायबर अधिक प्रमाणात असते. त्यामुळे मधुमेही रूग्णांना याचा फायदा मिळतो. हे रक्तात मिसळल्याने कार्ब्स मिळतात. तुम्हाला मधुमेह असेल तर कारल्याच्या रसाप्रमाणे तुम्ही वांग्याचा रसही रोज पिऊ शकता. पण तुम्हाला नेहमी याचा वापर आपल्या आहारात करून घेता यायला हवा.

ब्लड प्रेशर अर्थात रक्तदाब

वांग्यामधले असलेले पोटॅशियम हे योग्य प्रमाणात घेतल्यास, रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींना फायदेशीर ठरते. रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी तुम्हाला पोटॅशियमयुक्त आहार घेण्याचा सल्ला देण्यात येतो. त्यामुळे वांग्याचा  रस नियमित स्वरूपात तुम्ही पिऊन रक्तदाबाचा त्रास कमी करू शकता.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक