साधारण उन्हाळा सुरु झाला की, बाजारात कैरी, आंबे, फणस, काजू दिसू लागतात. कोकणातील हा खास मेवा चाखण्याची हीच तर एक संधी असते. ओले काजू ही कोकणातील खासियत. या ओल्या काजूपासून बनवली जाणारी उसळ ही चिकन आणि मटणाच्या रस्स्यालाही मागे टाकेल अशी असते. जर ओल्या काजूपासून तुम्हाला बनवायची असेल अशीच चमचमीत उसळ तर काही टिप्स आणि ट्रिक्स येतील कामी. ओले काजू कसे ओळखावे? ते कसे सोलावे आणि कुठे कुठे वापरता येतील हे जाणून घेण्यासाठीच हे खास आर्टिकल
काजू खाण्याचे फायदे करतील आश्यर्यचकित (Kaju Benefits In Marathi)
ओले काजू म्हणजे काय?
घरी असलेले काजू पाण्यात भिजवले की, ते ओले काजू होतात असे तुम्हाला वाटत असेल तर असे मुळीच नाही. कारण असे ओले काजू तयार होत नाही. काजूचे बोंडू काढल्यानंतर हिरवे गार काजूचे हे फोडले जातात. ते भाजले की, भाजके काजू म्हणजे आपण जे रोज खातो ते काजू तयार होतात. तर ते तसेच ठेवले की, भाजीचे ओले काजू म्हणून वापरले जातात. हे काजू चवीला कोवळे असतात. म्हणूनच त्याची चव खूप छान लागते.
असे करा काजू स्वच्छ
ओले काजू थेट वापरता येत नाही. जर तुमच्याकडे काजू सालं काढून आणि स्वच्छ करुन दिले असतील तर ठीक. पण जर काजू साफ करुन दिले नसतील तर मात्र तुम्हाला काजू साफ करुन घ्यावे लागतात. साल काढून काजू स्वच्छ करुन ते आधी गरम पाण्यात उकडले तरी चालतात. त्यामुळे ते पटकन शिजतात आणि छान लागतात.
कोकणातील या पदार्थांमुळे येईल तुम्हाला ‘गावची आठवण’
अशी करा काजूची भाजी
कोकणात कांदा-खोबऱ्याचे वाटप घालून ही भाजी करण्याची पद्धत आहे. पण तुम्हाला थोड्या वेगळ्या पद्धतीने ही करायची असेल तर त्यामध्ये थोडे बदल केले तरी चालू शकतात.
साहित्य: 2 वाटी सोललेले ओले काजू, अर्धा कप कांदा, ¼ वाटी ओलं खोबरं, आलं-लसूण पेस्ट, एक टोमॅटो, लाल तिखट, गरम मसाला पावडर, कडिपत्ता, मीठ, तेल, हिंग
कृती :
- टोमॅटो चिरुन घ्या. तव्यावर तेल गरम करुन त्यामध्ये कांदा, आलं-लसूण पेस्ट, टोमॅटो आणि खोबरं छान खरपूस होईपर्यंत परतून घ्या.
- जर तुम्हाला टोमॅटो आवडत नसेल तर तो काढून टाकला तरी चालेल. पण टोमॅटोमुळे एक छान चव त्याला येते.
- वाटप चांगले वाटल्यानंतर आता फोडणी देण्यासाठी भांडे गरम करा. त्यामध्ये तेल गरम करुन कडिपत्ता आणि हिंगाची फोडणी द्या.
- वाटप घालून ते चांगले परतून घ्या. त्याला छान तेल सुटू द्या. त्यामध्ये काजू घालून छान फिरवून घ्या. आता काजू शिजणे हे फार महत्वाचे आहे त्यामुळे काजू छान शिजू द्या. त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर घालून छान परतून घ्या. तुम्हाला पाणी हवे तेवढे घाला आणि मग आमटी मस्त भात किंवा चपातीसोबत खा.
आता घरीच करुन बघा अशी चमचमीत काजूची भाजी
दिवाळीत उरलेल्या मिठाईचे काय करायचे असा पडलाय प्रश्न, तर वाचा (Recipes With Mithai)