दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण आहे. आपल्या जवळच्या नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना भेटून आनंद द्विगुणित करण्याचा हा सण आहे. या दिवशी प्रत्येक जण आपल्या येणाऱ्या काळासाठी मंगलकामना करत आपल्या उंबरठ्यावर दिवा लावतो. ज्यामुळे त्याच्या घरातील संकटांचा अंधकार कायमचा दूर होऊन घर प्रकाशमय व्हावं. शास्त्रानुसार सांगण्यात आलं आहे की, कार्तिक अमावस्येच्या दिवशी साजरी करण्यात येणारी दिवाळी यासाठी खास आहे कारण याच दिवशी समुद्र मंथनादरम्यान लक्ष्मी देवीचा जन्म झाला होता. तसंच हा दिवस मनोकामना पूर्ण होण्यासाठी सर्वश्रेष्ठ दिवस मानला जातो. याच कारणामुळे लोकं या दिवशी महालक्ष्मीच्या आगमनाची आराधना करतात. ज्यामुळे तिची कृपा तुमच्या घरावर आणि कुटुंबावर कायम राहील. एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जातात. यापाठोपाठ भाऊबीजेचं महत्त्व असल्याने भाऊबीज शुभेच्छा ही दिल्या जातातच. पण यासोबतच हेही जाणून घेणं आवश्यक आहे की, या दरम्यान आपण कोणती चूक करता कामा नये. ज्यामुळे नंतर आपल्याला नुकसान होईल. चला तर मग जाणून घेऊया वास्तूनुसार दिवाळी कशी साजरी करावी आणि दिवाळीच्या दिवशी काय करू नये. म्हणजे आपल्याला लक्ष्मी मातेचा आशिर्वाद नक्कीच मिळेल.
वास्तूनुसार दिवाळीच्या दिवशी काय करावं –

1- दिवाळीमध्ये लक्ष्मी आणि गणपतीची स्थापना करू पूजा करण्याचं सांगण्यात आलं आहे.
2- गणपतीच्या मूर्तीच्या उजव्या हाताला नेहमी लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करावी.
3- घराच्या अंगणात आणि पूजा करण्याच्या ठिकाणी रांगोळी काढावी किंवा शुभ चिन्ह रांगोळीने काढावीत. असा प्रयत्न करा की, रांगोळी काढण्यासाठी तुम्ही गेरू किंवा तांदूळाच्या पीठाचा वापर करा.
4- या दिवशी विषम संख्येत पणत्या लावाव्या जसं 11, 21, 51 किंवा 101 अशी संख्या शुभ मानली जाते.
5- पूजेच्या वेळी दोन मोठे दिवे किंवा निरांजन लावावी. एक तूपाचं आणि एक तेलाचं.
6- पूजेच्या वेळी ‘ॐ श्रीं हृीं श्रीं महालक्ष्म्यै नम:’ मंत्राचं सतत उच्चारण करावं.
7- महालक्ष्मी पूजनाच्या दिवशी पिवळ्या कवड्या ठेवाव्या. यामुळे घरात कधीही कोणत्याही वस्तूची कमतरता जाणवणार नाही.
8- लक्ष्मी मातेला बेलपत्र किंवा कमळाचं फूल आणि गणपतीला दूर्वा जरूर वाहाव्यात.
9- लक्ष्मीपूजन करताना हळकुंड ठेवावं. जे नंतर तुमच्या तिजोरीत किंवा पैसे ठेवण्याच्या ठिकाणी ठेवा.
10- दिपावली पूजेनंतर संपूर्ण घरात शंखनाद किंवा घंटी वाजवा. असं केल्याने घरातील नकारात्मक उर्जैचा नाश होतो.
वास्तूनुसार दिवाळीच्या दिवशी काय करू नये –
1- शास्त्रांनुसार जे लोकं दिवाळीच्या शुभ दिवशी मद्यपान करतात ते सदैव दरिद्री राहतात. त्यांच्या घरात नेहमी दारिद्रय वास करते. त्यामुळे दिवाळीमध्ये मद्यपान करणं टाळा.
2- या दिवशी बऱ्याच ठिकाणी लोकं अंधश्रद्धेतून जादू-टोणा करतात. त्यामुळे या दिवशी चौकातून जाताना कोणतीही गोष्ट पाहून मगच ओलांडा. तसंच कोणत्याही बेवारस वस्तूला हात लावू नका.
3- या दिवशी घरातील झाडू कोणच्याही दृष्टीस पडेल असा ठेवू नका. लपवून ठेवा.
4- असं म्हणतात की, दिवाळीच्या रात्री चुकूनही नवरा-बायकोने शारीरिक संबंध ठेवू नये.
5- तसंच दिवाळीत काढण्यात येणाऱ्या रांगोळीत काळा आणि करड्या रंगाचा वापर करू नये.
6- घरामध्ये कोणतीही तुटलेली किंवा टाकाऊ वस्तू ठेवू नये. खासकरून ज्या ठिकाणी पूजा करण्यात येणार आहे तिकडे.
7- दिवाळीच्या दिवशी लोक एकमेकांना भेटवस्तू देतात. पण लक्षात ठेवा की, या वस्तूमध्ये कोणतीही चामड्याची वस्तू नसावी. यामुळे आर्थिक नुकसान होण्याची भीती असते.
8- दिवाळीची पूजा करताना काळे कपडे घालणं टाळावं. वास्तुनुसार, कोणत्याही शुभ प्रसंगी किंवा पूजा करताना काळे कपडे घालू नये. असं केल्याने देवी लक्ष्मी रूसते.
9- या दिवशी कोणाशीही वादविवाद करू नये. यामुळे घरातील वातावरण बिघडतं आणि घरात आनंद येण्याऐवजी संकट येण्याची भीती निर्माण होते. त्यामुळे या काळात मन शांत ठेवावं आणि आनंद वाटावा.
10- दिवाळीच्या रात्री झोपू नये असं म्हणतात. असं मानलं जातं की, दिवाळीच्या रात्री लक्ष्मी माता आपल्या घरात आगमन करते.
या गोष्टी जाणून घेतल्यानंतर दिवाळी सणाची माहिती पूर्णपणे तुम्हाला माहीत असणेही गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही दिवाळीची माहिती ही घ्या
हेही वाचा –
Diwali Special : धनत्रयोदशीच्या दिवशी चुकूनही खरेदी करू नका या वस्तू