ADVERTISEMENT
home / Festival
गौरीपूजनासाठी यंदा चॉकलेटपासून तयार करा हे पारंपरिक पदार्थ

गौरीपूजनासाठी यंदा चॉकलेटपासून तयार करा हे पारंपरिक पदार्थ

गौरीगणपतींचे आगमन म्हणजे गोड गोड नैवेद्याची चंगळच. गणपतींच्या आगमनानंतर गौरी घरी येतात. काही लोकांकडे एक गौरी असते तर कुणाकडे दोन गौरींची पूजा केली जाते. गौरीपूजनासाठी विविध नैवेद्याची आरासच मांडली जाते. कारण असं म्हणतात गौरी या माहेरवाशिणीच्या रूपात येतात. त्यामुळे त्यांचा पाहुणचार करण्यासाठी विविध पदार्थ केले जातात. यात तळलेले पदार्थ, गोडाधोडाचे अनेक पदार्थ असतात. यंदा तुम्ही  गौरीपूजनासाठी पांरपरिक पदार्थ हर्षीज चॉकलेटचा वापर करून करू शकता. यासाठी आम्ही पाच सोप्या रेसिपिज तुमच्यासोबत शेअर करत आहोत. विशेष म्हणजे या रेसिपिज अगदी झटपट होतात. 

चॉकलेट नट्स बर्फी

साहित्य:

  • 1 कप काजूची पूड 
  • ½ कप तिळाची पेस्ट (भाजलेल्या तिळाची) 
  • 1½ टेबलस्पून कापलेले बदाम 
  • 1½ टेबलस्पून कापलेले पिस्ते 
  • 1½ टेबलस्पून कापलेले काजू 
  • 1/3 कप हर्षीज स्ट्रॉबेरी फ्लेवर सिरप 

 

कृती:

ADVERTISEMENT
  • एक जाड बुडाचा पॅन घ्या व त्यामध्ये गरम करण्यासाठी तूप टाका 
  • तुपामध्ये काजू पूड, तिळाची पेस्ट व कापलेले नट्स टाका. वाफ उडून जाईपर्यंत हे सर्व शिजवा, परंतु हे मिश्रण तपकिरी होणार नाही याची काळजी घ्या 
  • त्यामध्ये हर्षीज स्ट्रॉबेरी फ्लेवर सिरप टाका आणि मिश्रण एकजीव व मध्यम कोरडे होईपर्यंत शिजवा 
  • ओट्यावर बर्फी ट्रे ठेवा आणि त्यामध्ये हे मिश्रण एकसारख्या प्रमाणात ओता 
  • सजावटीसाठी ट्रेमध्ये पिस्ते टाका. ट्रे ओट्यावर उलटा करा आणि हलव्यावर पिस्ते चिकटण्यासाठी ट्रे पुन्हा सरळ करा 
  • 3 – 4 तास हलवा तसाच राहू द्या 
  • चौकोनी आकारामध्ये हलवा कापा आणि आणखी पिस्ते टाकून सजवा

चॉकलेट अॅपल पाय गुजिया

साहित्य:

  • 1 कप रिफाइन्ड फ्लोअर
  • चिमूटभर मीठ 
  • 1½ टेबलस्पून तूप
  • अॅपल पाय स्टफिंगसाठी
  • 1 टेबलस्पून बटर
  • 2 सफरचंद, कापलेली
  • 1 टीस्पून दालचिनी पूड 
  • ½ टीस्पून अॅपल सायडर व्हिनेगर 
  • 2 टेबलस्पून रोस्टेड कापलेले बदाम 
  • 3 टेबलस्पून हर्षीज कॅरामल फ्लेवर्ड सिरप 
  • तळण्यासाठी तेल

कृती: 

अॅपल पाय स्टफिंगसाठी

ADVERTISEMENT
  • पॅनमध्ये बटर टाका आणि गरम करा. त्यामध्ये कापलेले सफरचंद टाका व नीट हलवा. 
  • आता दालचिनी पूड, अॅपल सायडर व्हिनेगर, बदाम, हर्षीज कॅरामल फ्लेवर्ड सिरप टाका आणि मिश्रण घट्ट होईपर्यंत एकजीव करा.
  • मिश्रण थंड होऊ द्या.

पीठ तयार करण्यासाठी

  • रिफाइन्ड फ्लोअर, मीठ व तूप एका बाउलमध्ये घ्या. ते ब्रेडक्रमसारखे दिसू लागेपर्यंत बोटांनी एकजीव करा.
  • गरजेनुसार पाणी घाला आणि घट्ट पण मऊ असे पीठ मळा. मऊ कापड ओले करून मिश्रण झाकून ठेवा आणि 15 मिनिटे ठेवा. 
  • गुजिया तयार करण्यासाठी
  • थोडेसे पीठ घेऊन त्याचा गोळा करा. गोळ्याच्या मध्यभागी सारण ठेवा, नंतर ते दुमडा आणि त्यास गुजियाचा आकार द्या.
  • तपकिरी रंग येईपर्यंत गरम तेलामध्ये तळा.

चॉकलेटी शिरा

साहित्य:

  • 3 टेबलस्पून तूप
  • 100 ग्रॅम रवा
  • 200 मिली पाणी
  • 2 टेबलस्पून हर्षीज चॉकलेट फ्लेवर्ड सिरप 
  • ¼ कप साखर

कृती:

ADVERTISEMENT
  • सॉसपॅन मध्यम आचेवर ठेवा, त्यामध्ये तूप टाका व ते वितळू द्या
  • तूप वितळले की रवा टाका व त्याचा रंग सोनेरी-तपकिरी होईपर्यंत भाजा 
  • हळूहळू पाणी घाला, त्यानंतर हर्षीज चॉकलेट फ्लेवर्ड सिरप टाका
  • हलवत राहा
  • पॅनवर झाकण ठेवा आणि मिश्रण 2 मिनिटे मंद आचेवर ठेवा
  • त्यावर बदाम टाकून सजवा आणि गरम सर्व्ह करा 

 

 

 

चॉको-नट कलाकंद

ADVERTISEMENT

साहित्य:

  • 1 कप कंडेन्स्ड मिल्क 
  • 1 कप पनीर, कुचकरलेले
  • ¼ टीस्पून वेलची पूड 
  • ¼ कप मिक्स्ड नट्स, कापलेले पिस्ते, बदाम 
  • ¼ कप हर्षीज चॉकलेट फ्लेवर्ड सिरप 

कृती:

  • जाड बुडाचा पॅन मध्यम आचेवर ठेवा 
  • कन्डेन्स्ड मिल्क टाका आणि गरम होईपर्यंत शिजवा 
  • आता कुचकरलेले पनीर, वेलची पूड, हर्षीज चॉकलेट फ्लेवर्ड सिरप टाका आणि चांगले एकजीव करा
  • मिश्रण लागू नये म्हणून सतत हलवा 
  • काही मिनिटांनी, मिश्रण घट्ट होईल आणि पॅनमधून सुटू लागेल. आता गॅस बंद करा. 
  • एक ग्रीस्ड ट्रे घ्या आणि त्यामध्ये कलाकलंदचे मिश्रण ओता, ते ¾ इंचाच्या थरामध्ये पसरा
  • रबराच्या स्पॅच्युलाने मिश्रण एकसमान करा आणि त्यावर कापलेले नट्स टाका, मिश्रण घट्ट दाबा 
  • कलाकंद 2-3 तास फ्रिजमध्ये ठेवा. ते थंड झाल्यावर हव्या त्या आकारामध्ये कापा आणि सर्व्ह करा 

 

 

ADVERTISEMENT

चॉकलेट पायसम

साहित्य:

  • 2 ¼ कप दूध 4 टेबलस्पून तांदूळ (धुतलेले) 
  • ¼ कप साखर 100 मिली 
  • नारळाचे दूध 50 मिली
  • हर्षीज चॉकलेट फ्लेवर्ड सिरप 
  • 75 ग्रॅम हर्षीज स्प्रेड्स कोको 
  • 50 ग्रॅम चारोळी, 50 ग्रॅम काजू  

कृती: 

  • एका भांड्यात दूध गरम करा, दुधाला उकळी आल्यावर आच मंद करा. 
  • त्यामध्ये तांदूळ टाका आणि तांदूळ मऊ होईपर्यंत शिजू द्या. 
  • मिश्रण घट्ट होऊ लागले की त्यामध्ये साखर, नारळाचे दूध टाका व काही मिनिटे शिजवा.
  • आता हर्षीज चॉकलेट फ्लेवर्ड सिरप, हर्षीज स्प्रेड्स कोको टाका आणि मिश्रण चांगले एकजीव करा. 
  • शेवटी, चारोळ्या व काजू टाका आणि चांगले हलवा. गॅस बंद करा. 
  • सजावटही तितकीच महत्त्वाची असल्याने एखाद्या सुंदर बाउलमध्ये हर्षीज चॉको पायसम ओता आणि वर थोडे नट्स टाका. 
  • गरम किंवा गार सर्व्ह करा. 
      

अधिक वाचा –

ADVERTISEMENT

अक्रोडचा वापर करून तयार करा या स्वादिष्ट रेसिपीज

मैद्याचे पदार्थ रेसिपी मराठीत, बनवा विविध प्रकारच्या ‘या’ डिश (Maida Recipes In Marathi)

गणेशोत्सवात बनवा हे ‘5’ प्रकारचे चविष्ट नैवेद्य

24 Aug 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT