क्लस्टर डोकेदुखी ही एक गंभीर आरोग्य समस्या आहे. या डोकेदुखीमध्ये मायग्रेनपेक्षाही तीव्र स्वरूपाच्या वेदना डोक्यात जाणवतात. विशेष म्हणजे महिलांपेक्षा पुरूषांना ही डोकेदुखी जास्त प्रमाणात जाणवते. असं असलं तरी आजकाल महिलांमध्ये आणि विशेषतः तिशीच्या आतील तरूण मुलामुलींमध्ये ही डोकेदुखी जास्त प्रमाणात जाणवते. कस्टर डोकेदुखी अचानक सुरू होते आणि पंधरा मिनिटे ते तीन – चार तास याचा सलग त्रास होतो. अचानक तीव्र तर काही वेळाने कधी सौम्य प्रकारच्या वेदना तुम्हाला यामुळे जाणवतात. तुम्हाला हा त्रास लागोपाठ एक आठवडादेखील होऊ शकतो. कधी कधी तर महिनाभर ही डोकेदुखी जाणवते. या गंभीर स्वरूपाच्या डोकेदुखीपासून वाचण्यासाठी तुम्हाला क्लस्टर डोकेदुखीची लक्षणं आणि उपचार माहीत असायला हवे.
क्लस्टर डोकेदुखीची कारणे
क्लस्टर डोकेदुखी ही अचानक होणारी एक डोकेदुखी आहे आणि ती दिवसभरात कितीही वेळा जाणवू शकते. क्लस्टर डोकेदुखी होण्याचं मुख्य कारण हायपोथेलेमस असण्याची शक्यता आहे. हायपोथेलेमस हा आपल्या मेंदूचा एक लहान भाग असते. क्लस्टर डोकेदुखीमागे अणुवंशिकता आणि जेनेटिक कारणंही असू शकता. बऱ्याचदा हॉर्मोनल असंतुलनामुळेही ही डोकेदुखी जाणवते. अति प्रमाणात व्यसनांच्या आहारी जाण्यामुळेही क्लस्टर डोकेदुखी जाणवू शकते. सतत तीव्र सुर्यप्रकाशात काम करणारे अथवा एखाद्या प्रखर दिव्याखाली काम करणाऱ्या लोकांनाही क्लस्टर डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. त्याचप्रमाणे या कारणांमुळेही दुखू शकतं तुमचं डोकं
क्लस्टर डोकेदुखीची लक्षणे
जर तुमचं सतत डोकं दुखत असेल तर तुम्हाला कोणत्या प्रकारच्या डोकेदुखीचा त्रास होत आहे हे जाणून घेतलं पाहिजे. यासाठीच जाणून घ्या लक्षणे
- एकाच डोळ्यात वेदना जाणवणे
- एका डोळ्याच्या खाली सूज येणे
- डोळ्यातून सतत पाणी वाहणे
- डोळे लाल होणे
- एकाच बाजूचे डोके दुखणे
- सतत नाक गळणे
- चेहऱ्यावर (डोके आणि डोळे) खूप घाम येणे
- दर पाच मिनिटांनी डोके दुखणे
- वरच्या पापण्या खाली वाकणे
- चेहरा लाल होणे
- खूप घाम येणे
सर्वसामान्यपणे ब्रेन ट्यूमरची ही लक्षणे
क्लस्टर डोकेदुखी कशी ओळखावी
जर तुम्हाला वरील लक्षणे जाणवत असतील तर तुम्ही यासाठी त्वरीत तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. हेल्थ चेकअप केल्यावरच तुम्हाला क्लस्टर डोकेदुखी आहे का याचे निदान केले जावू शकते. डॉक्टर तुम्हाला यासाठी जाणवत असलेली लक्षणे आणि फॅमिली हिस्ट्री विचारू शकतात. यासोबत तुम्हाला एमआरआय अथवा सिटी स्कॅन करावे लागू शकते. क्लस्टर डोकेदुखीवर केले जाणारे वैद्यकीय उपचार हे प्रत्येक रूग्णाच्या शारीरिक प्रकृतीनुसार वेगवेगळे असू शकतात. शिवाय हा त्रास कमी करण्यासाठी थोडा वेळ लागण्याची शक्यता असते. कारण या रोगावर उपचार केले जात नाहीत. तर योग्य काळजी आणि औषधोपचारांनी त्याचा प्रभाव कमी केला जातो. त्यामुळे आधीच ही डोकेदुखी होऊ नये यासाठी योग्य जीवनशैलीचा अवलंब प्रत्येकाने करायला हवा.
क्लस्टर डोकेदुखीपासून वाचण्याचे सोपे उपाय
क्लस्टर डोकेदुखीपासून वाचण्यासाठी तुम्हाला काही खास गोष्टींची काळजी घ्यायला हवी.
- प्रखर उन्हात प्रवास करू नये
- अती दगदग टाळणे
- मद्यपान अथवा धुम्रपान टाळणे
- नियमित संतुलित आहार घेणे
- पुरेशी झोप घेणे
- नियमित व्यायाम करणे
त्याचप्रमाणे वाचा त्वरीत डोकेदुखी दूर करण्याचे घरगुती उपाय (Home Remedies For Headache In Marathi)
फोटोसौजन्य – इन्साग्राम
अधिक वाचा –
जाणून घ्या जलनेतीची योग्य पद्धत, डोकेदुखी, सायनस होईल दूर