बाळाची पहिली चाहुल आईबाबांच्या कायम स्मरणात असते. बाळाच्या आगमनाची चाहुल लागताच त्याच्या भविष्याची स्वप्न रंगवली जाऊ लागतात. पुढे बाळाच्या जन्मानंतर सर्वात महत्त्वाचा संस्कार केला जातो तो म्हणजे नामकरण विधी. बाळाला नाव देण्याच्या विधीला बारसं असंही म्हणतात. बाळाला बारश्यात एक छान गोंडस नाव दिलं जातं. बारशासाठी मुलगा असेल तर मुलांची नावे आणि मुलगी असेल तर मुलींची नावे इंटरनेटवर शोधली जातात. पुढे हे नावच त्याची प्रथम ओळख बनतं. तुमच्या बाळाने मोठं झाल्यावर भविष्यात चांगलं नाव कमवावं असं वाटत असेल तर त्याला बारशाला एक छान, युनिक आणि अर्थपूर्ण नाव द्या. बारशाआधी बाळाची पत्रिका बनवली जाते. बाळाच्या जन्मराशीवरून जे आज्ञाक्षर मिळते त्यावरून बाळाचं नाव ठरवलं जातं. जर तुमच्या बाळाचं नावराशीवरून द आज्ञाक्षर आलं असेल तर बाळाला नाव देण्यासाठी फायदेशीर आहेत ही द वरून मुलांची नावे. शिवाय नातेवाईकांना पाठवा बाळाच्या नामकरण विधीसाठी सुंदर मेसेज
"द" वरून मुलांची नावे, बाळाला द्या अर्थपूर्ण नाव (Names Beginning With "D" In Marathi)
“द” वरून मुलांची नावे – “D” Varun Mulanchi Nave Marathi
बाळाला नाव ठेवण्यासाठी जन्मराशीवरून आज्ञाक्षर काढण्याची पद्धत आहे. तुमच्या बाळाच्या जन्मपत्रिकेवरून आलेलं आज्ञाक्षर द असेल तर त्याच्यासाठी अनेक नावे तुमच्या मनात असतील. सध्या पारंपरिक आणि धार्मिक अर्थ असलेली नावे मुलांना देण्याचा ट्रेड आहे. त्यामुळे तुम्ही ही अर्थपूर्ण नावे तुमच्या मुलाला देऊ शकता. यासाठीच द वरून मुलांची नावे पाहून निवडा तुमच्या मुलासाठी योग्य नाव.
नावे | अर्थ |
दीपेंद्र | प्रकाशाचा अधिपती |
दिलराज | ह्रदयराज |
दिलरंजन | मनोरंजन करणारा |
दिव्यकांत | तेजस्वी |
दिवाकर | सूर्य |
दिव्यांशू | दिव्यकिरण असलेला |
दिव्येंद्रु | चंद्र |
दुर्गादत्त | दुर्गेने दिलेला |
दुर्गादास | दुर्गेचा दास |
दुर्गेश | किल्ल्याचा राजा |
दामोदर | कृष्णाचे नाव |
द्रुमन | वृक्ष |
द्रुमिल | डोंगर |
द्रुलिप | सुर्यवंशातील राजा |
दत्तप्रसन्न | दत्तगुरू ज्याच्यावर प्रसन्न झाले आहेत |
दत्तप्रसाद | दत्तगुरूंची कृपा असलेला |
दत्ताजी | दत्तगुरूंचा दास |
दत्तात्रेय | दत्तगुरूंचे नाव |
दिलीप | सूर्यवंशातील राजा |
दयासागर | प्रेमाचा सागर |
द्वारकादास | द्वारकेचा दास |
द्वारकाधीश | द्वारकेचा राजा |
द्वारकानाथ | श्रीकृष्णाचे नाव |
द्वारकेश | श्रीकृष्णाचे नाव |
प वरुन मुलींची युनिक नावे अर्थासह
"द" वरून मुलांची युनिक नावे (Unique Names From "D" In Marathi)
“द” वरून मुलांची युनिक नावे – “D” Varun Mulanchi Nave New
आजकाल मुलांना थोडी हटके आणि युनिक नावं देण्याची पद्धत आहे. त्यामुळे आपल्या बाळाला दिलेलं नाव सामान्य असावं असं अनेक पालकांना वाटत नाही. मात्र लक्षात ठेवा बाळाचं नाव युनिक असायालच हवं पण त्या नावाला योग्य असा अर्थही असायला हवा. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत द अक्षरावरून मुलांची नावे शेअर करत आहोत. ज्यांचे अर्थ नक्कीच हटके आणि युनिक आहेत.
नावे | अर्थ |
दार्शिक | लाजाळू |
दिव्येंद्रु | चंद्र |
दक्षेश | शिवशंकराचे नाव |
दर्शन | दृष्टी |
दर्पण | आरसा |
दानेश | शहाणपण, ज्ञान |
दैविक | दिव्य, देवाची कृपा |
दिव्य | दैवी सामर्थ्य असलेला |
दिव्यांश | दिव्य अंश असलेला |
दक्ष | सक्षम |
दक्षेस | भगवान शंकराचे नाव |
दक्षि | तेजस्वी |
दक्षिण | दक्षिण दिशा |
दक्षिणमूर्ती | शिव अवतार |
दक्षित | शंकराचे नाव |
दलजित | गटावर विजय मिळवणारा |
दालभ्य | चक्राशी सबंध असणारा |
दलपती | संघनायक |
दमन | नियंत्रण ठेवणारा |
दनक | जंगल |
दंता | हनुमानाचे नाव |
दया | करूणा असलेला |
दयाघन | प्रेमळ |
दयानंद | एक प्रसिद्ध स्वामी |
दयानिधी | प्रेमळ |
दयार्णव | प्रेमाचा सागर |
दयाराम | प्रेमळ |
दयाळ | एक पक्षी |
द्विजेश | राजा |
द्विजेंद्र | ज्याने द्वैत भावावर विजय मिळवलेला आहे |
दामाजी | पैसा |
दीनदयाळ | गरीबांचा कनवाळू |
दिनदीप | सूर्य |
दिना | सूर्याचे नाव |
दिनानाथ | दीनांचा स्वामी |
दिनार | सुवर्णमुद्रा |
दिनेश | सूर्य |
दिनेंद्र | सूर्य |
दीप | दिवा |
वाचा – च आणि छ वरून मुलामुलींची नावे
"द" वरून मुलांची नावे, बाळासाठी रॉयल नावे (Royal Names From "D" In Marathi)
“द” वरून मुलांची नावे – “D” Varun Mulanchi Nave
युनिक नावाप्रमाणेच देवांची, राजा महाराजांची अथवा राजेशाही दर्शवणारी रॉयल नावे देखील मुलांना आजकाल दिली जातात. तुम्हाला जर तुमच्या मुलासाठी असं रॉयल नाव हवं असेल तर द अक्षरावरून मुलांची नावे निवडताना या नावांचा करा विचार. ज्यामुळे तुमच्या मुलाचे नाव ऐकल्यावर सर्वांच्या मनात निर्माण होतील आदरयुक्त भावना.
नावे | अर्थ |
दुष्यंत | शंकुतलेचा पती |
देव | ईश्वर |
देवकीनंदन | श्रीकृष्ण |
देवदत्त | देवाने दिलेला |
देवदास | देवाचा दास |
देवदीप | देवाच्या चरणी प्रकाशित असलेला |
देवव्रत | भीष्म, कार्तिकेय |
देवर्षी | देवाचा ऋषी |
देवराज | देवाचा राजा |
देवरंजन | देवाचे मनोरंजन करणारा |
देवाशीष | देवाचा आशिर्वाद |
देवानंद | देवाचा आनंद |
देवीदास | देवाचा दास |
देवेन | ईश्वर |
देवेश | देवांचा राजा |
देवेंद्र | इंद्र राजा |
देवेंद्रनाथ | देवांच्या राजाचा स्वामी |
देशपाल | देशाचे संरक्षण करणारा |
दौलत | श्रीमंत |
दोलतराम | श्रीमंतीचा अधिपती |
दर्शल | प्रार्थना |
दर्शिंद्र | चौकस |
दर्शिश | शक्तीशाली |
याचप्रमाणे वाचा स वरून मुलांची नावे, तुमच्यासाठी खास नावे
"द" वरून मुलांची नावे, बाळासाठी अर्थपूर्ण नवी नावे (New Names With "D" In Marathi)
“द” वरून मुलांची नावे – “D” Varun Mulanchi Nave New
आपल्या बाळाचे नाव सर्वांपेक्षा वेगळं आणि हटके असावं असं तुम्हाला नक्कीच वाटू शकतं. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत द अक्षरावरून मुलांची नावे ती देखील आधुनिक आणि नवीन असलेली शेअर करत आहोत. ज्यामुळे तुम्ही तुमच्या बाळाला यातील एखादं नवं आणि आधुनिक नाव नक्कीच देऊ शकता. यासाठीच द अक्षरावरून मुलांची नावे नक्कीच पाहा ज्यांचे आहेत अर्थदेखील आवडतील असे.
नावे | अर्थ |
दानवीर | दान करणारा |
दर्मण | औषधी उपाय |
दर्मेंद्र | धर्माचा राजा |
दर्मिक | दयाळू |
दर्पद | शकंराचे एक नाव |
दर्शक | प्रेक्षक, पाहणारा |
दर्शनगीत | धर्माभिमानावरील गाणी |
दर्शिल | जे सुंदर दिसते ते |
दर्शित | जो पवित्र देवतेचे दर्शन घेतो |
दारूका | देवदार वृक्ष |
दारूणा | लाकडाप्रमाणे मजबूत |
दारूयात | इच्छा, आकांक्षा |
दशरथ | अयोध्येचा राजा |
दशरणा | दहा तलावांची जमीन |
दानिश | ज्ञान असलेला |
दबंग | शूर व्यक्तिमत्व |
दाबित | योद्धा |
दाभीती | युद्धासाठी सज्ज असलेला |
दाबिर | मूळ, गाभा |
दाफिक | आनंदी |
द्रोण | पानांपासून बनवलेले पात्र |
दीपक | दिवा |
दीपंकर | दिवा लावणारा |
दिपांजन | काजळ |
You Might Like These:
त वरून मुलांची नावे, आधुनिक आणि युनिक (“T” Varun Mulanchi Nave)
थ वरून मुलांची नावे