आदित्य चोप्रा दिग्दर्शित ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटाला या वर्षी तब्बल पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत. 20 ऑक्टोबर 1995 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. दोन दशकांपूर्वी डीडीएजेने बॉलीवूडच्या रोमॅंटिक चित्रपटाची संकल्पनाच बदलून टाकली होती. कारण हा चित्रपट त्या काळी बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. यावर्षी या चित्रपटाला प्रदर्शित होऊन पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत मात्र आजही तरूणांच्या मनात राज-सिमरनविषयी तेच क्रेझ कायम आहे. डीडीएजे मध्ये राज आणि सिमरनची भूमिका शाहरूख खान आणि काजोल यांनी साकारली होती. या चित्रपटाला वीस वर्षे पूर्ण झाल्यावर मुंबईतील मराठी मंदीरमध्ये एक खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्या कार्यक्रमला प्रेक्षकांनी दोन दशकांनंतरही भरघोस प्रतिसाद दिला होता. विशेष म्हणजे या चित्रपटाची लोकप्रियता फक्त भारतातच नाही तर संपूर्ण विश्वात आजही कायम आहे. म्हणूनच पंसवीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल लंडनमधील प्रसिद्ध लिसेस्टर स्वेअरमध्ये राज आणि सिमरनचा कास्य पुतळा आता उभारला जाणार आहे.
.@iamsrk and @itsKajolD's #DDLJ Statue to be unveiled in Leicester Square Statue to mark the film’s 25th Anniversary. #DDLJ25
Read more – https://t.co/7aLxUOVAmr pic.twitter.com/eUF0cfWN9P— Yash Raj Films (@yrf) October 19, 2020
भारतीयांसाठी खुशखबर!
बॉलीवूडचे चित्रपट समीक्षक तरूण आदर्शनेही ट्विटरवर ही खुशखबर भारतीयांना दिलेली आहे. तरूण आदर्श यांनी त्यांचा ट्विटर अकाऊंटवर शेअर केलं आहे की, “दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे च्या 25 व्या वाढदिवसानिमित्त लंडनमध्ये लीसेस्टर स्वेअरमध्ये शाहरूख आणि काजोलचे कास्यं पुतळे उभारले जाणार. ज्यामधून या चित्रपटाचा एक सीन रिक्रिएट केला जाईल शिवाय तो सीन ‘इन दी स्वेअर’ म्हणून आता जगभरात ओळखला जाईल. याचे उद्धाटन 2021 च्या स्प्रिंगमध्ये केले जाणार आहे. बॉलीवूड चित्रपटाबाबत पहिल्यांदा असं घडतंय की बॉलीवूड कलाकारांचा पुतळा लंडनमध्ये उभारला जात आहे. डीडीएलजे आदित्य चोप्राने दिग्दर्शित केलेला चित्रपट आहे. “
इतिहासात राज-सिमरन होणार अजरामर
दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे मध्ये शाहरूख आणि काजोलने साकारलेले राज आणि सिमरन प्रेक्षकांच्या मनात कायम राहतील. या चित्रपटात शाहरूख, काजोलसोबतच अनुपम खेर, अमरिश पूरी, फरिदा जलाल, परमीत शेठी, मंदिरा बेदी यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटातील सर्वच कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक झाले होते. या चित्रपटाचे सर्व संवाद आणि गाणी अनेकांची तोंडपाठ आहेत. हा चित्रपट पंचवीस वर्षापूर्वी सुपरहिट ठरला होताच पण आजही अनेक रेकॉर्ड तोडतच आहे. आता पंचविसाव्या वर्षी या शाहरूख आणि काजोलचा पुतळा लंडनमध्ये उभारलं जाणं हे भारतील चित्रपटसृष्टीसाठी नक्कीच अभिमानास्पद आहे. भारताप्रमाणेच विश्वभरात लोकप्रिय ठरलेला हा एक पहिली भारतीय चित्रपट आहे. ज्यामळे विश्वभरातील अनेक आयकॉनिक चित्रपटांमध्ये या चित्रपटाची गणना आता केली जाणार आहे. गेल्याच महिन्यात लिसेस्टर स्वेअरमध्ये हॅरी पॉटरचा पुतळा उभारण्यात आला होता. यापूर्वी तिथे लॉरेल अॅंड हार्डी, बग्ज बन्नी, सिंगिग इन दी रेन, जीन केली, मेरी पॉपपिन्स, मिस्टर बीन, बॅटमेन, वंडर वूमेन यांचे पुतळे उभारण्यात आलेले आहेत. अशा दिग्गजांच्या यादीत आता बॉलीवूड चित्रपट जाऊन बसणं ही एक ऐतिहासिक गोष्ट आहे. कारण यातून आता अनेक पिढ्यांपर्यंत बॉलीवूड चित्रपटाची ख्याती आणि महती पोहचवली जाणार आहे.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
बधाई होनंतर आता येणार ‘बधाई दो’ राजकुमार आणि भूमी असणार मुख्य भूमिकेत
Good News: ‘विवाह’फेम अमृता राव लवकरच होणार आई, बेबी बंपसह फोटो व्हायरल
रिंकू राजगुरू करणार सुव्रतवर ‘छूमंतर’, लंडनमध्ये दोघेही रवाना