ब़ॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियावर तिचा एक खास चाहतावर्ग आहे. बॉलीवूडप्रमाणेच फॅशन इंडस्ट्रीमध्येही दीपिकाने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे चाहत्यांना दीपिकाचं डेली रूटिन जाणून घेण्यात नक्कीच रस आहे. यासाठीच दीपिकाने एक व्हिडओ नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये तिन ती सकाळी उठल्यापासून ते अगदी दिवसभरात नेमकं काय काय करते याचा दिनक्रम मांडला आहे. या व्हिडिओतून दीपिकाने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरंही दिली आहेत. हा व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शन दिली आहे की, “माय डेली रूटिन व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा”
असं आहे दीपिका पादुकोणचं डेली रुटिन
दीपिकाने शेअर केलेल्या या माय डेली रूटिन व्हिडिओमध्ये ती मुंबईतील रस्त्यावर बिनधास्त फिरताना दिसत आहे. तर कधी कधी शूटिंगसाठी जाताही दिसत आहे. शूटिंग दरम्यान घडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टीही यात तिने दाखवल्या आहेत. या व्हिडिओत तिला विचारण्यात आलं की सकाळी उठल्यावर तुझं डेली रूटिन काय असतं? या प्रश्नाचं उत्तर देताना तिने शेअर केलं आहे की,”असं सांगणं नक्कीच कठीण आहे कारण प्रत्येक दिवस सारखा नसतो, मात्र मी दररोज सकाळी उठल्यावर ब्रश करते, ब्रेकफास्ट करते. मला असं वाटतं की माझी सकाळ नेहमी शांत आणि प्रसन्न असावी. मग मी वर्कआऊट करते. तिला विचारण्यात आलं की ती प्रत्येक दिवसांचं व्यवस्थित प्लॅनिंग करते का? यावर तिने शेअर केलं की, होय आणि नाहीपण, कारण माझ्या जीवनाचा एक भाग आहे प्लॅनिंग करणं आणि दुसरा भाग आहे काही गोष्टी होत आहेत तशा होऊ देणं, त्यामुळे माझं प्लॅनिंग काहिसं अशा प्रकारचं असतं. शेवटी असं वागणं हा पण माझ्या प्लान आणि रूटिनचा एक भागच आहे.
दीपिकाचे आगामी चित्रपट
दीपिका लवकरच पठाण या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर येत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत शाहरूख खान, जॉन अब्राहिम यांच्या मुख्य भूमिका असतील. यासोबत तिची आणि रणविर सिंहची जोडी असलेला 83 हा स्पोर्टस ड्रामा पाहण्यासाठीही प्रेक्षक नक्कीच उत्सुक आहेत. हा चित्रपट भारतीय क्रिकेट टीमचे माजी कॅप्टन कपिल देव यांची बायोपिक आहे. रणवीर या चित्रपटात कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. तर कपिल देव यांची पत्नी रोमी भाटिया यांची भूमिका दीपिका साकारणार आहे. दीपिकाने काही दिवसांपूर्वीच तिच्या आगामी चित्रपट फायटरची घोषणा केली आहे. या चित्रपटात ती ह्रतिक रोशनसोबत मुख्य भूमिकेत असेल. ह्रतिक आणि दीपिकाचा एरिअर अॅक्शन ड्रामा फायटर अंदाजे 250 कोटीच्या घरात जाण्याची शक्यता आहे. ज्यामुळे हा चित्रपट बॉलीवूडचा सर्वात महागडा चित्रपट ठरणार आहे. याशिवाय तिच्याकडे शकुन बत्राचाही एक चित्रपट आहे. ज्यामुळे या वर्षी दीपिका पादुकोणच्या अभिनयाचा जलवा प्रेक्षकांना नक्कीच अनुभवता येईल. छपाकनंतर दीपिका कोणत्याच चित्रपटात दिसली नव्हती. शिवाय लॉकडाऊनमुळे तिचे काही चित्रपट रखडले होते
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
‘अग्गंबाई सासूबाई’ चा नवा सीझन, तेजश्री प्रधानच्या जागी येतेय नवी सूनबाई
आदर्श जावई अशी ओळख असलेला शशांक दिसणार व्हिलन रुपात
प्रिया प्रकाश वॉरिअरला दुखापत, शूटिंग दरम्यान झाली जखमी