ADVERTISEMENT
home / मनोरंजन
जेव्हा ‘जलेभी’ फेम दिगांगना सूर्यवंशीवर मोराने अचानक केला हल्ला

जेव्हा ‘जलेभी’ फेम दिगांगना सूर्यवंशीवर मोराने अचानक केला हल्ला

अभिनेत्री दिगांगनाने टेलिव्हिजन मालिकांमधून अगदी लहानपणापासूनच अभिनयाला सुरूवात केली मात्र जलेभी चित्रपट आणि ‘एक वीर की अरदास… वीरा’ या मालिकेतून तिला खरी ओळख मिळाली. पुढे तिने अनेक चित्रपट आणि बिग बॉसमध्ये स्वतःचा ठसा उमटवला. मात्र आता ही बॉलीवूड अभिनेत्री एका वेगळ्याच कारणासाठी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. सध्या जिकडे तिकडे  तिच्या एका मजेशीर व्हिडिओची चर्चा सुरू आहे. नुकताच सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यात एका पार्कमध्ये मोरासोबत फोटो काढता काढता दिगांगना सोबत एक मोठा किस्साच घडला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला देखील तुमचं हसू नक्कीच थांबवता येणार नाही. 

जाणून घ्या नेमकं काय घडलं ‘दिगांगना सूर्यवंशी’सोबत

दिगांगना एका पार्कमध्ये मोरासोबत छान फोटोसेशन करत होती. या व्हिडिओत दिगांगनाने वेकेशनवर असताना निळ्या रंगाचा सूट घातला आहे. शिवाय तिच्याबाजूला मस्त पिसारा फुलवण्याच्या तयारीत असलेला मोरही दिसत आहे. दिगांगना फोटो काढण्याच्या तयारीत असून ती मोराकडे खूप आश्चर्यांना पाहत होती. मोरही तिला छान पोझ देत होता. मात्र अचानक पिसारा फुलवता फुलवता असं काही झालं की मोराने दिगांगनाच्या अंगावरच हल्ला केला. मोराचा असा अचानक झालेला हल्ला पाहून दिंगागना पुरती घाबरून गेली आणि जोरजोरात ओरडू लागली. तिच्याशेजारी एक महिला दिसत आहे. मोराकडून वाचण्यासाठी शेवटी दिगांगना त्या महिलेची मदत घ्यावी लागली. दिगांगनावर मोराने एवढया जोरात हल्ला केला की तिच्या हातावर त्यामुळे जखमदेखील झाली. मात्र लगेचच ती या हल्लातून सावरली आणि पुन्हा हसू लागली. हा व्हिडिओ थोडासा मजेशीर असल्याने हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे. शिवाय नेटकऱ्यांनी यावर मजेशीर कंमेट्सदेखील दिल्या आहेत. या पोस्टवर झालेल्या कंमेटमुळे दिगांगना चांगलीच ट्रोल झाली आहे. ज्यामुळे हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होत आहे. 

दिगांगनाचे आगामी चित्रपट

दिगांगनाने अनेक मालिकांमध्ये काम केलेलं आहे. तिने तिच्या करिअरची सुरुवात अगदी लहान असताना केली होती. मात्र तिला ‘एक वीर की अरदास… वीरा’ या मालिकेतून खरी ओळख मिळाली. या मालिकेत तिने 2012 ते 2015 पर्यंत काम केलं होतं.  पुढे तिने गोविंदासोबत ‘फ्रायडे’ आणि ‘रंगीलाा राजा’ या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या. जलेभीमध्येही तिने मु्ख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटात तिच्यासोबत रिया चक्रवर्ती आणि वरूण मित्रा मुख्य भूमिकेत होते.  बिग बॉसच्या नवव्या सीझनमध्येही दिगांगना खूप चर्चेत होती. या शिवाय दिगांगनाने ‘हिप्पी’ या तेलुगू आणि धनुसू  रासी नेयरगले या तमिळ चित्रपटात काम केलेलं आहे. आता लवकरच ती ‘दी बेटल ऑफ भीमा कोरेगांव’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्यासमोर येणार आहे. आता मात्र दिगांगनाच्या या व्हायरल व्हिडिओचीच  सगळीकडे चर्चा आहे. मोराने हल्ला केल्यावर ती बरी आहे का असं विचारण्याऐवजी नेटकऱ्यांनी मजेशीर कंमेट करत तिला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

महात्मा जोतीराव फुलेंचा ‘सत्यशोधक’ रुपेरी पडद्यावर

ही अभिनेत्री प्रेग्नंसीमध्येही ठेवतेय स्वत:ला फिट

या मराठमोळ्या अभिनेत्रीचा मुंबईला ‘बाय बाय’, कारण गुलदस्त्यात

ADVERTISEMENT
11 Apr 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT