ADVERTISEMENT
home / बिग बॉस
bigg boss ott

पहिल्याच दिवशी पेटले भांडण, दिव्या – प्रतीकचे घमासान

बिग बॉस (Bigg Boss OTT) हा शो नेहमीच अगदी दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणाने वादग्रस्त ठरला आहे. नुकत्याच सुरू झालेल्या या शो चा पहिलाच दिवस गाजला आहे तो भांडणाने. पहिल्याच दिवशी मुळात शो मध्ये पुन्हा एकदा शमिता शेट्टी (Shamita Shetty) ला घेतल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज कुंद्रा प्रकरणात शमिता शेट्टी आणि शिल्पा शेट्टीची इमेज चांगली राहावी यासाठी आणि सध्या प्रसिद्धीत असलेल्या शमिताचा टीआरपीसाठी उपयोग करून घेता यावा म्हणून शमिता आली आहे असं अनेकांचं सोशल मीडियावर म्हणणं आहे. पण आता पहिलाच दिवस गाजवला आहे तो अभिनेता प्रतीक सहजपाल आणि अभिनेत्री दिव्या अगरवाल यांनी. दोघांनाही मुळातच रियालिटी शो चा अनुभव आहे. त्यामुळे पहिल्याचा दिवशी एकीकडे गॉसिप सुरू झालं असून दुसरीकडे भांडण आणि हल्लाबोल सुरू झाल्याचे दिसून आले आहे. प्रतीक सहजपालच्या (Pratik Sehjpal) वागण्याबोलण्यामुळे पहिल्याच दिवसापासून सर्वांनाच त्रास होत असल्याचे दिसून आले आहे. 

अधिक वाचा – बिग बॉस OTT’ ची जबरदस्त सुरूवात, काय होणार पुढे याची चाहत्यांना उत्सुकता

स्पर्धकांचे पहिल्याच दिवशी दिसले रंग 

पहिल्या दिवशीच्या लाईव्ह फीडमध्ये नक्कीच प्रेक्षकांना मजा आली असणार. कारण घरातील पहिलंच भांडण पाहायला मिळालं आहे. याची सुरूवात तर स्टेजवरूनच झाली होती. पण त्याचा शेवट दिव्या आणि प्रतीकच्या मोठ्या भांडणामध्ये झालेला दिसून आला आहे. तर दुसरीकडे मूसमुळे अक्षरा रडताना दिसून आली आहे. प्रत्येक स्पर्धकाने आपापले रंग दाखवण्यास सुरूवात केली आहे. पहिल्याच टास्कमध्ये सगळ्यांच्या कुरबुरींना सुरूवात झाली आहे. घरातील स्पर्धकांना जोपर्यंत ड्युटी मिळत नाही तोपर्यंत सर्वांनी आपापली कामे करावीत असे सांगण्यात आल्यानंतर प्रतीक आणि दिव्या यांच्यामध्ये चांगलीच जुंपली असल्याचे पाहायला मिळाले. मागच्या वर्षी ज्याप्रमाणे संपूर्ण घर निक्की तांबोळीच्या विरोधात गेले होते. तसंच पहिल्याच दिवशी प्रतीकच्या विरोधात संपूर्ण घर पाहायला मिळालं आहे. यामध्ये शमिता शेट्टी, अक्षरा सिंह, उर्फी, करण नाथ हेदेखील प्रतीकच्या विरोधात उभे राहिलेली दिसून आले आहेत. तर शमिताने फुटेजसाठी उगीच प्रतीक भांडण करत असल्याचेही सांगितले. 

अधिक वाचा – सोनाली कुलकर्णी येतेय परत…चित्रपटाचे पोस्टर रिलीज

ADVERTISEMENT

सदस्यांना मिळाला पहिला टास्क 

पहिल्याच दिवशी सदस्यांना टास्क देण्यात आले. लाईव्ह नाईटमध्ये सगळ्या स्पर्धकांना परफॉर्मन्स द्यावा लागला. नेहाने बाजरे का सिट्टा या गाण्यावर परफॉर्मन्स दिला तर मिलिंद गाबानेदेखील अप्रतिम गाणे गात सर्वांचे मनोरंजन केले. या लाईव्ह नाईटचे निवेदन दिव्याने केले. तर ऊर्फी आणि झिशानला एकमेकांच्या डोळ्यात पाहण्याचा टास्क देण्यात आला. झिशान आणि प्रतीकमध्ये पुशअपचा टास्क रंगला असतानाही दिव्या आणि प्रतीकमध्ये खटके उडाल्याचे पाहायला मिळाले आहे. तर दुसऱ्या बाजूला मूस आपल्या भोजपुरी गाण्याबाबत खिल्ली उडवत असून आपल्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श केला अशी तक्रार करत भावूक होत रडत असल्याचे दिसून आले आहे. दिव्या अक्षराला समजावत असतानाच तिला रडू कोसळते. त्यामुळे पहिल्याच दिवशी ओटीटीवर बिग बॉसच्या स्पर्धकांनी धुमाकूळ घातल्याचे दिसून आले आहे. हा तर पहिलाच दिवस होता. अजून दीड महिना हे स्पर्धक नक्की काय काय करणार आणि कोणत्या थराला पोहचणार याबाबत आता चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. विशेषतः प्रतीक सहजपाल आणि दिव्याचे भांडण आता कुठपर्यंत पोहचणार हेदेखील पाहावे लागणार आहे. 

अधिक वाचा – एतशा संझगिरी साकारणार किशोरवयीन आहिल्याबाईंची भूमिका

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

10 Aug 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT