ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
ice water facial

कोरियन मुलींसारखी ग्लास स्किन हवी, तर घरी अशी करा क्रायोथेरपी

हल्ली प्रसिद्ध झालेल्या के ड्रामामध्ये सुंदर कोरियन मुली आपल्याला दिसतात. या मुली सुंदर तर असतातच पण त्यांची त्वचा जितकी सुंदर असते तितकी आपल्याकडे बघायला मिळत नाही. अशी नितळ, ग्लासी, चमकदार त्वचा हे कोरियन लोकांचे वैशिष्ट्य असते. आपल्यालाही तशी त्वचा असावी असे वाटते. कोरियन लोक म्हणे त्यांचे खास टेन स्टेप स्किन केअर रुटीन फॉलो करतात म्हणून त्यांची त्वचा इतकी सुंदर असते. अर्थात इतके टेन स्टेप स्किन केअर रुटीन प्रत्येकाला फॉलो करणे जमेलच असे नाही. पण त्या करतात ते एक सोपे काम मात्र आपण नक्कीच करू शकतो ज्याने आपलीही त्वचा सुंदर होण्यास आपण हातभार लावू शकतो. हल्ली सोशल मीडियावर बरेच इन्फ्ल्यूएंसर्स आईस वॉटर फेशियल करताना दिसत आहेत. सगळीकडे सध्या क्रायोथेरपी किंवा आईस वॉटर फेशियलची चर्चा आहे. बघूया काय आहे हे आईस फेशियल आणि त्याचे त्वचेला खरंच फायदे होतात का! 

आईस फेशियल म्हणजे काय 

क्रायोथेरपी किंवा कोल्ड वॉटर थेरपीची सध्या बरीच चर्चा होते आहे. मनावरचा ताण हलका करण्यासाठी आणि त्वचेतील रक्ताभिसरण वाढवण्यासाठी आईस बाथ करणे किंवा थंड पाण्यात पोहण्यापासून, त्वचा निरोगी करण्यासाठी आईस मास्क वापरण्यापर्यंत अनेक लोक ही कोल्ड वॉटर थेरपी करून बघत आहेत. 

Ice Water Facial | Cryotherapy At Home
Ice Water Facial

बर्फ ठेवलेल्या मोठ्या भांड्यात किंवा बर्फाळ पाण्यात 30 सेकंदांपर्यंत आपला चेहरा बुडवणे, ही सर्वात नवीन स्किन केअर थेरपी उजेडात आली आहे. अमेरिकन सुपरमॉडेल बेला हदीदने अलीकडेच एका फोटोशूटमध्ये आईस डंक करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच प्रसिद्ध अमेरिकन नेत्या अलेक्झांड्रिया ओकासिओ-कॉर्टेझ यांनीही शेअर केले की त्या व त्यांचे पार्टनर तणावाचा सामना करण्यासाठी ही थेरपी करतात. बर्फाच्या पाण्यात तुमचा चेहरा बुडवून ठेवल्याने तुमच्या शरीरातील पॅरासिम्पेथेटिक मज्जासंस्था रिसेट होते. 

आईस फेशियल कसे करतात 

आईस वॉटर फेशियल करण्यासाठी आपल्याला कुठे पार्लर किंवा सलोनमध्ये जाण्याची गरज नाही. ते आपल्याला घरीही सहज करणे शक्य आहे.  हे फेशियल करण्यासाठी एक मोठे पसरट भांडे किंवा टोपले  घ्या. त्यामध्ये बर्फाचे थंड पाणी व बर्फ घाला. त्यानंतर या पाण्यात चेहरा बुडवा. आपला चेहरा 30 सेकंद पाण्यात बुडवून ठेवा. चेहेरा या पाण्यात संपूर्ण बुडवताना फार खोल श्वास घेण्याची गरज नाही. नेहेमीसारखा श्वास घेऊन बर्फाच्या पाण्यात चेहेरा बुडवा. तीस सेकंदांनंतर चेहरा बाहेर काढा. त्यानंतर सुती नॅपकिन किंवा टॉवेलने चेहरा स्वच्छ पुसून घ्या. आता पुन्हा एकदा चेहरा थंड पाण्यात तीस सेकंद बुडवा. ही प्रक्रिया तुम्ही तीन ते चार वेळा करू शकता. याशिवाय बर्फाचे तुकडे कापडात गुंडाळून चेहऱ्यावर स्क्रब देखील करू शकता.

ADVERTISEMENT
Ice Water Facial | Cryotherapy At Home
Ice Water Facial

क्रायोथेरपी त्वचेसाठी कशी उपयुक्त ठरते 

जेव्हा आपली त्वचा थंड पाण्याच्या संपर्कात येते तेव्हा आपल्या चेहऱ्याच्या केशिका (कॅपिलरिज) आकुंचन पावतात आणि लिम्फच्या कार्याला चालना मिळते, ज्यामुळे त्वचा शांत होते, लालसरपणा कमी होतो आणि चेहऱ्याचे टिश्यूज घट्ट होतात. या सुरुवातीच्या संकुचित अवस्थेनंतर, थंड पाण्यामुळे त्वचेतील रक्ताभिसरण सुधारते. यामुळे त्वचेला ऑक्सिजन आणि पोषक तत्वे मिळतात ज्यामुळे चेहेऱ्यावर इन्स्टंट ग्लो येतो. तुमचा चेहरा डल आणि सुजलेला असेल तर तुम्ही हे आईस वॉटर फेशिअल ट्राय करून बघा. तुमच्या चेहेऱ्यावरची सूज नक्कीच लवकर कमी होईल. बर्फ एक चांगला नैसर्गिक एक्सफोलिएटर आहे. बर्फाचे खडे चेहऱ्याला लावल्यामुळे त्वचेच्या मृतपेशी निघून जातात आणि नवीन पेशींच्या उत्पादनास उत्तेजन मिळते. 

त्यामुळे ग्लासी स्किनसाठी आईस फेशियल नक्की करून बघा. 

फोटो क्रेडिट – istockphoto

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
20 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT