प्राईम व्हिडीओने पुन्हा एकदा मनोरंजनाचा पेटारा उघडला आहे. या पेटाऱ्यातून नुकताच बहुप्रतीक्षित भय-थरारपट ‘डीबक – द कर्स इज रिअल’ चा टीझर प्रदर्शित करण्यात आला. ज्यात पहिल्यांदाच इम्ररान हाश्मी आणि निकाता दत्ता एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती पॅनोरामा स्टुडिओ आणि टी सिरीज एकत्र येऊन करत आहेत. शिवाय या चित्रपटाच्या माध्यमातून इम्ररान हाश्मी त्याच्या डिजिटल डेब्यू करण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट अमेझॉन प्राईमवर प्रेक्षकांना 29 ऑक्टोबरला पाहता येईल. पण नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरवरून या भयपटाचा अंदाज तुम्हाला नक्कीच लावता येऊ शकतो.
Bigg Boss 15: अनुषाच्या येण्याने करणला बसणार झटका की राकेशच्या येण्याने शमिता होणार आनंदी
काय आहे हा डीबक – द कर्स इज रिअल
डीबक – द कर्स इज रिअल हा चित्रपट जय के लिखित आणि दिग्दर्शित आगामी अमेझॉन ओरिजनल फिल्म म्हणजे 2017 ची मल्याळम ब्लॉकबस्टर फिल्म – एझ्रा ‘चा रिमेक आहे. या कलाकृतीला क्लिंटन सेरेजो याचे संगीत लाभले आहे. हा टीझर पाहताना भीतीने तुमच्या अंगावर अक्षरशः काटे निर्माण होतील. पुढे काय घडणार हे पाहण्यासाठी तुमच्या मनात या टीझरमुळे अधिक उत्सुकता लागून राहील. कारण टीझर पाहतानाच तुमच्या मनात या चित्रपटाविषयी अनेक प्रश्न निर्माण होतील ज्याची उत्तरं तुम्हाला फक्त चित्रपटाच्या शेवटीच मिळू शकतील. बऱ्याच दिवसांनी चाहत्यांना अशी उत्कंठा वाढवणाऱ्या चित्रपटाची मेजवानी मिळणार आहे. त्यामुळे पाहता पाहता या टीझरमुळे चित्रपटाची चर्चा रंगू लागली आहे.
6 बॉलीवूड कलाकार हॉलीवूड प्रोजेक्ट्समध्ये काम करण्यासाठी सज्ज
इम्ररानच्या खात्यात आणखी एक भयपट
इम्ररान हाश्मी या चित्रपटातून पहिल्यांदाच डिजीटल माध्यमात पदार्पण करत असला तरी भयपट हा त्याच्यासाठी नवा विषय नक्कीच नाही. इम्ररानने याआधीदेखील अनेक भटपट आणि रहस्यमयी चित्रपटांमधून त्याच्या अभिनयाची झलक दाखवली आहे. आता पुन्हा एकदा तो या चित्रपटातून निकिता दत्ता (Nikita Dutta) आणि मानव कौल (Manav Kaul) यांच्यासोबत मुख्य भूमिका साकारत आहे. भयाण वातावरण निर्मिती करणाऱ्या या चित्रपटाच्या टीझरमध्ये निकिताची व्यक्तिरेखा डीबक बॉक्स उघडते. पण तिला हे माहीत नाही की हा बॉक्स संकटाला आमंत्रण देणारा ठरणार आहे. कारण त्यानंतर एका-मागून एक थरकाप उडवणारे प्रसंग या टीझरमध्ये घडत जातात. टीझरप्रमाणेच चित्रपटातही प्रेक्षकांना पुढे नेमकं काय घडतं हे पाहण्याची उत्सुकता धरून ठेवणार आहे.
सांड की आंखच्या निर्मातीने 100 लीटर ब्रेस्ट मिल्क केलं अनाथ मुलांना दान