ADVERTISEMENT
home / Care
केसांच्या बाबतीत प्रत्येकजण करतात या चुका

केसांच्या बाबतीत प्रत्येकजण करतात या चुका

केस हा प्रत्येक महिलेचा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. केस सुंदर आणि मजबूत करण्यासाठी आपण केसांवर अनेक प्रयोग करतो. पण हे प्रयोग करताना काही चुका देखील केल्या जातात. केसांवर प्रयोग करताना खूप जण केसांच्या बाबतीत काही common चुका करतात. या चुका तुम्हीही करत असाल तर तुम्ही आताच या चुका टाळायला हव्यात .

ओले केस झटकणे

shutterstock

खूप जणांना ओले केस झटकण्याची सवय असते. केसांवरुन आंघोळ केल्यानंतर केसांमधी पाणी शोषून घेण्यासाठी आपण केसाला टॉवेल बांधतो. पण केसांवरील पाणी झटपट काढण्यासाठी केस झटकण्याची अनेकांना सवय असते. कपडे झटकल्याप्रमाणे केसांना झटकायला अनेकांना आवडते. पण तुमच्या अशा करण्यामुळे तुमचे केस तुटू शकतात. ओल्या केसांच्या मुळापर्यंत हा फटका बसतो आणि केस कमजोर होतात. तुम्हाला अगदी पटकन केस वाळवायचे असतील तर तुम्ही जाड टर्कीश टॉवेल वापरा. केसांमधील पाणी टिपून घ्या आणि केसांना हलके हलके जोर देऊन वाळवा.

ADVERTISEMENT

 

फाटे फुटलेले केस न कापणे

shutterstock

काहींना त्यांचे केस कापायला अजिबात आवडत नाही. म्हणजे त्यांच्या केसांची अगदी शेपटी झाली तरी ते केस लांब ठेवणेच पसंत करतात. पण असे करु नका. तुम्हाला चांगले मजबूत केस हवे असतील तर तुम्ही केस योग्यवेळी कापायला हवे. जरी तुमच्या केसांना फाटे फुटले नसतील तरी दर दोन महिन्यांनी तुमचे केस किमान ट्रिम करा. जर तुम्ही फाटे फुटलेले केस वाढू दिले तर तुमचे केसांचे फाटे हे वाढत जातात. ते दिवसेंदिवस पातळ दिसू लागतात.

ADVERTISEMENT

केस धुताना करु नका या 7 चुका

केसांना कडकडीत पाण्याचे धुणे

shutterstock

कडकडीत पाण्याची आंघोळ करायला अनेकांना आवडते. पण केसांना कडकडीत पाण्याची आंघोळ तुम्हाला भारी पडू शकते. कारण केसांना सतत गरम पाण्याचा मारा बसला तर तुमचे केस कोरडे होऊ लागतात. केसांसाठी आवश्यक असलेल्या तेलग्रंथीचे काम बिघडते. त्यामुळे केसांमधील तजेला जाऊन ते राठ आणि कोरडे वाटू लागतात. केसांसाठी कायमच कोमट पाणी वापरा. कडकडीत गरम पाण्यामुळे तुमच्या केसांना लवकर फाटे फुटणं, ते तुटणं असे त्रास होऊ शकतात. 

ADVERTISEMENT

केसांना तेल लावून ठेवणे

shutterstock

तेलामुळे केसांच्या वाढीला नक्कीच चालना मिळत असेल. पण तेलांना केस लावून ठेवणे हे देखील चांगले नाही. तुमच्या केसांच्या ठिकाणीही पोअर्स असतात. म्हणजेच तुमची स्काल्पही श्वास घेत असते. तेल जर तुम्ही स्काल्पवर तसेच ठेऊन दिले. तर स्काल्प ब्लॉक होऊन जातात. त्यामुळे केसांची वाढ तर दूर पण तुमच्या केसांच्या गळतीचे प्रमाण  वाढते. तुम्ही कोणत्याही डॉक्टरांकडून सल्ला घेतला तर तुम्हाला ते आंघोळीपूर्वी तासभर आधी तेल लावण्याचा सल्ला देतील. 

या tricks ने तुमचे केस दिसतील लांबसडक

ADVERTISEMENT

जोरजोरात ओले केस विंचरणे

shutterstock

ऑफिसला जायचे म्हणून सकाळी केस धुतल्यानतर ते विंचरण्याची घाईही अनेकांना असते. ही घाई इतकी असते की, केसांमधून गुंता न सोडवता कंगवा केसांवर जोरजोरात फिरवला जातो. यामुळे तुमचे केस तुटतात. तुटलेल्या केसांना मॅनेज करणे कठीण होऊन जाते. त्यामुळे तुम्ही जर ओले केस विंचरत असाल तर असे करु नका.

केसांचा गुंता न सोडवणे

ADVERTISEMENT

shutterstock

काहींना केस विंचरण्याची घाई असते. तर काहींना केस विंचरण्याचा कंटाळा असतो. म्हणजे ते काही केल्या केस विंचरत नाही. त्यामुळे त्यांच्या केसांचा गुंता होतो. गुंता झालेले केस विंचरणे हे त्याहून अधिक त्रासदायक असते त्यामुळे किमान रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर ब्रशने अलगद केसांचा गुंता सोडवून घ्या. 

केस आणि त्वचेचे सौंदर्य वाढविण्यासाठी ‘अंड’आहे उपयुक्त

जर तुम्ही वरील काही चुका करत असाल तर तुम्ही त्या आताच टाळायला हव्यात. म्हणजे तुम्हाला हवे असलेले केस तुम्हाला नक्कीच मिळतील.

ADVERTISEMENT
05 Aug 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT