ADVERTISEMENT
home / आरोग्य
हळदीच्या अतीसेवनामुळे वाढू शकतो Miscarriage चा धोका

हळदीच्या अतीसेवनामुळे वाढू शकतो Miscarriage चा धोका

‘हळद’ एक आयुर्वेदिक औषध आणि मसाल्यांच्या पदार्थांमधील प्रमुख घटक आहे. कारण हळदीशिवाय अनेक भारतीय पदार्थ तयारच होऊ शकत नाहीत. एवढंच नाही तर भारतीय आयुर्वेद शास्त्रातदेखील हळदीला अगदी महत्त्वाचं स्थान आहे. एखादी गंभीर जखम हळदीमुळे भरून निघू शकते तर हळदीचं दूध प्यायल्यामुळे सर्दी,खोकल्यासारखे आजार पटकन बरे होतात. मात्र असं असलं तरी जर तुम्ही गरोदर असाल तर मात्र हळदीचा वापर जपूनच करायला हवा. कारण हळद कितीही गुणकारी असली तरी ती गरोदर महिला आणि तिच्या गर्भासाठी योग्य नाही. एवढंच नाही तर एका संशोधनानुसार हळदीचा अती वापर केल्यामुळे Miscarriage चा धोका वाढण्याची शक्यता असल्याचं सिद्ध झालं आहे. यासाठीच गरोदर महिलांनी आहारात हळदीचा वापर बेतानेच करावा. 

Shutterstock

हळदीचा अती वापर गरोदरपणात का करू नये ?

हळद एक आयुर्वेदिक औषध आहे हे आपण सारे जाणतोच. हळदीमध्ये Curcumin हा घटक पदार्थ असतो. ज्यामुळे तुमच्या शरीरातील दाह कमी होण्यास मदत होते अथवा एखादी जखम लवकर बरी होते. मात्र याच घटकामुळे गरोदर महिलांना मात्र आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. गर्भाच्या योग्य पोषणासाठी हा घटक मुळीच फायदेशीर नाही. यासाठीच गरोदरपणाच्या काळात आहारात कमीतकमी हळदीचा वापर करावा. वास्तविक दररोजच्या आहारात देखील हळद प्रमाणातच वापरली जाते. स्वयंपाक करताना अगदी चिमूटभर हळद आपण वापरतो. ज्यामुळे पदार्थांना एक छान रंग आणि स्वाद येतो. अती प्रमाणात हळद वापरल्या पदार्थाची चव खराब होण्याची शक्यता असते. सहाजिकच आहारातून थोड्या प्रमाणात हळद घेण्यास काहीच हरकत नाही. गरोदर महिलांनीदेखील आहारात नेहमीरप्रमाणे थोडासा वापर करण्यास काहीच हरकत नसते. मात्र आजकाल अनेक औषधे आणि फूड सप्लीमेंट्समध्ये हळदीचा वापर केला जातो. जर गरोदरपणात तुम्ही अशा प्रकारचे एखादे औषध अथवा फूड सप्लीमेंटचे सेवन केले तर तुमच्या आहारातील हळदीच्या सेवनाचे प्रमाण वाढू शकते. ज्यामुळे तुमच्या शरीरातील  Curcumin चे प्रमाणदेखील नक्कीच वाढू शकते. तज्ञांच्या मते Curcumin हे तुमच्या शरीरात एस्ट्रोजीन हॉर्मोनप्रमाणे कार्य करते. ज्यामुळे तुमच्या गर्भांचे आकुंचन होते आणि Miscarriage अथवा Premature delivery चा धोका वाढतो. यासाठी गरोदरपणात या समस्या न होण्यासाठी आहारात हळदीचा वापर कमी प्रमाणात करा. शिवाय तुम्ही खात असलेली औषधे अथवा फूड सप्लीमेंटमध्ये असलेले घटक तपासून घ्या.

ADVERTISEMENT

Shutterstock

हळदीमुळे अशाप्रकारे वाढू शकतात गर्भारपणातील समस्या

जर तुम्हाला अथवा तुमच्या गर्भाला  हळदीची अॅलर्जी असेल तर तुम्हाला नक्कीच सावध राहायला हवं. कारण कधी कधी हळदीचा अती वापर केल्यामुळे तुम्हाला आरोग्यसमस्या सहन कराव्या लागू शकतात. बऱ्याचदा गरोदरपणाच्या काळात तुम्हाला काही विशिष्ठ औषधे दिली जातात. जी तुमच्या गर्भाच्या वाढीसाठी आणि पोषणासाठी महत्त्वाची असतात. मात्र हळदीच्या अती वापरामुळे या औषधांच्या कार्यात अडथळा निर्माण होऊ शकतो. जर हळद वापरलेले पदार्थ खाण्यामुळे तुमच्या त्वचेवर पुरळ उठत असेल, डोकेदुखी जाणवत असेल तर हळदीची तुम्हाला अॅलर्जी आहे हे ओळखा. जर तुम्हाला अशा प्रकारची लक्षणे जाणवली तर त्वरीत तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण वेळीच जर तुम्हाला यामागचं कारण कळलं तर तुमच्या गरोदरपणातील धोका नक्कीच टाळता येऊ शकतो.  

अधिक वाचा

ADVERTISEMENT

‘अशी’ लक्षणं जाणवत असतील तर तुम्ही गरोदर आहात हे समजा

नोकरी करणाऱ्या महिलांनी गरोदरपणी अशी घ्यावी स्वतःची काळजी

डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये जाताना या ‘25’ गोष्टी तुमच्या मॅटर्निटी बॅगमध्ये अवश्य ठेवा

फोटोसौजन्य –  शटरस्टॉक

ADVERTISEMENT
16 Aug 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT