ADVERTISEMENT
home / आरोग्य
excessive-exercise-effects

अतिव्यायाम आणि स्टिरॉईडच्या सेवनाने प्रजनन क्षमतेवर होतोय दुष्परिणाम

व्यायामाच्या आरोग्यविषयक फायद्यांविषयी असलेल्या ज्ञानाचा विस्तार तसेच व्यायाम, जिमिंग आणि प्रजननक्षमतेस पूरक आहार त्यांचा परिणाम याविषयी पुरेशी माहिती, प्रशिक्षण या सा-यांची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. स्टेरॉइडच्या इंजेक्शनमुळे महिलांच्या चेहऱ्यावर केस येणे, तर युवकांचे हाड ठिसुळ होणे, किडणीवर परिणाम होणे तर त्यांची जननेंद्रीय कमजोर होण्यासारखे घातक परिणाम होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.   हार्मोन्स, प्रजननावर प्रतिकूल परिणाम!  स्टेरॉइडचे इंजेक्शन आणि कॅप्सुलच्या स्वरूपात घेतले जातात आणि काहीवेळा तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार औषध म्हणून देखील वापरले जाऊ शकते. परंतु बॉडी बनवण्यासाठी युवकांना स्टेरॉइडकडे आकर्षित केल्या जात आहे. अ‍ॅनाबॉलिक स्टेरॉइडचा जितका लवकर परिणाम दिसून येईल, तितक्या लवकर त्याचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. त्याचा वारंवार वापर केल्याने पुरुष हार्मोन्स आणि प्रजनन यावर प्रतिकूल परिणाम होतो. परिणामी पुरुष नपुंसकदेखील होऊ शकतो. याबाबत अधिक माहिती आम्ही घेतली आहे, डॉ. रितू हिंदुजा, फर्टिलिटी कन्सल्टंट, नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटी, मुंबई यांच्याकडून 

अतिव्यायमाचे परिणाम 

हल्लीच्या तरुणाईमध्ये बांधेसूद शरीराचे फॅड दिसून येते. त्याकरिता व्यायामावर अधिक भर दिला जाऊन जिमला जाणे (Gym), वजन उचलणे आदी माध्यमातून शरीराला योग्य आकारात आणण्याचा प्रयत्न केले जात आहे. मात्र याचे जसे फायदे आहेत तसेच अतिव्यायामाने आरोग्यावर दुष्परिणाम देखील होऊ शकतात. पुरुषांनी वजनं उचलण्याचा आणि कार्डिओचा (Cardio) अति व्यायाम केला तर शरीराचं तापमान वाढतं. शरीराचं तापमान वाढल्यामुळे शुक्राणूंच्या वाढीवर आणि दर्जावर परिणाम होतो. परिणामी वंध्यत्वाच्या तक्रारी वाढू शकतात. महिलांनी नाजूक बांधा मिळवण्यासाठी अति ताण देणारा व्यायाम आणि त्याच्या जोडीला डाएट अंगीकारला तर त्यांच्या शरीरातील चरबी प्रमाणापेक्षा कमी होते. त्यामुळे शरीरातील एस्ट्रोजेनची पातळी कमी होते. परिणामी, ऑलिगोमेनोऱ्हिया आणि अॅमेनोऱ्हिया होऊ शकतो. केवळ महिलांनीच नाही तर पुरुषांनीदेखील जास्त अतिव्यायाम आणि शारीरिक हालचाली टाळल्या पाहिजेत परंतु त्याच वेळी बैठी जीवनशैली देखील निवडू नये. स्पर्धात्मक युगात खेळाडू विजय मिळविण्यासाठी कुठल्याही मार्गाचा वापर करण्यास तयार होतात. यासाठी अनेक खेळाडू डोपिंगला बळी पडतात. स्टेरॉईड्‌स, स्टिम्युलंट्‌स, नार्कोटिक्स, डायुरेटिक्‍स, पेप्टाईड हार्मोन्स आणि ब्लड डोपिंग अशा प्रकारे क्रीडा क्षेत्रात डोपिंग केले जाते. हे देखील प्रजनन क्षमतेवर दुष्परिणाम करते.

या गोष्टींचे पालन करा

– शरीरावर अतिरिक्त ताण निर्माण करणारे व्यायामप्रकार करू नका.

– अतिरिक्त वजन उचलू नका. शरीराला झेपेल इतकेच वजन उचला

ADVERTISEMENT

– आपल्या तब्येतीनुसार व्यायामाचे कोणते प्रकार उपयुक्त ठरतील याची माहिती करून घ्या.

– कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास किंवा दुखणे असेल, तर त्याची कल्पना प्रशिक्षकांना द्या.

– वैद्यकीय उपचार सुरू असतील, तर याची माहिती प्रशिक्षकांना द्या

– व्यक्तीनुसार आणि त्याच्या शारीरीक क्षमतेनुसार व्यायामाची निवड करावी. एखादी व्यक्ती करत असलेला व्यायाम दुसऱ्या व्यक्तीला जमेलच असे नाही.

ADVERTISEMENT

तसंच व्यायाम करण्याआधी तुम्ही तुमच्या प्रशिक्षकांचा योग्य सल्ला घ्या. त्याच्या सल्ल्यानुसारच आपल्या व्यायामामध्ये आणि आहारामध्ये बदल करा. कोणतेही व्हिडिओ पाहून अथवा थोडीथोडकी माहिती घेऊन स्वतःच्या मनाने कोणत्याही प्रकारची औषधे घेऊ नका अथवा व्यायाम करू नका. याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो याची तुम्ही माहिती घेणे आवश्यक आहे. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

28 Feb 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT