ADVERTISEMENT
home / Weight Loss
बेली फॅट कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत हे व्यायामाचे सोपे प्रकार

बेली फॅट कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत हे व्यायामाचे सोपे प्रकार

आधुनिक जीवनशैली, चुकीचा आहार, अपुरी झोप, व्यायामाचा अभाव अशा अनेक गोष्टींमुळे तुमच्या वजनात आणि पोटाच्या घेरात बदल होतात. वाढत चाललेली पोटाची चरबी हा अनेकांच्या फिटनेसमधील मोठा अडथळा असतो. वजन कमी करण्याची पहिली पायरी म्हणजे पोटावर जमा झालेली चरबी अथवा बेली फॅट कमी करणे. वाढलेल्या पोटामुळे तुम्ही बेढब आणि लठ्ठ दिसता. मात्र जीवनशैलीत थोडासा बदल, योग्य आहार आणि नियमित व्यायाम करून तुम्ही तुमच्या पोटावरील चरबी लवकर कमी करू शकता. इतर व्यायामांप्रमाणेच  कार्डिओ एक्सरसाईजमुळे तुमचे वजन तर कमी होईलच शिवाय तुमच्या पोटातील चरबीदेखील कमी होऊ शकेल. कारण हे व्यायाम प्रकार तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी आणि कॅलरीज कमी करतात. नियमित कार्डिओ एक्सरसाईज करणाऱ्या लोकांना ताण-तणावापासून देखील मुक्तता मिळते. कारण या व्यायामामुळे तुमचे फुफ्फुसे स्वस्थ राहतात. शिवाय तुम्हाला झोपही चांगली लागते.

चालणे (Walking)

कार्डिओ एक्सरसाईजमध्ये चालणे हा व्यायाम सर्वात उत्तम प्रकारचा व्यायाम आहे. यासाठी आठवड्यातून कमीतकमी चार ते पाच दिववस अर्धा ते पाऊण तास जलद चालण्याचा व्यायाम करा. संतुलित आहार आणि पंचेचाळीस मिनीटे चालल्यामुळे तुम्ही स्वस्थ आणि निरोगी राहाल. तुमचे मेटाबॉलिझम सुधारेल. ह्रदय निरोगी राहील आणि तुमचे वजन देखील कमी होईल.म्हणूनच पोट कमी करण्यासाठी भरपूर चाला. 

Shutterstock

ADVERTISEMENT

धावणे (Running)

शरीर स्वस्थ आणि निरोगी ठेवण्यासाठी सतत नवनवीन प्रयोग करत राहणं गरजेचं आहे. चालण्यासोबत जर तुम्ही आठवड्यातून एक किंवा दोन दिवस धावण्याचा व्यायाम केला तर तुम्हाला चांगला परिणाम दिसून येऊ शकेल. कारण धावल्यामुळे तुमच्या जास्त कॅलरीज बर्न होतील. ज्यामुळे पोट आपोआप कमी दिसू लागेल. 

जॉगिंग (Jogging)

जर तुम्हाला धावण्यास जमत नसेल तर तुम्ही जॉगिंग करू शकता. जॉगिंग हा एरोबिक्स व्यायामातील एक प्रकार असून त्यामुळे तुमचे शरीर निरोगी राहू शकते. जॉगिंग केल्यामुळे तुमचे पोट हळूहळू कमी दिसू लागते.

साइकलिंग (Cycling)

सायकल चालवणे हा एक अतिशय चांगला कार्डिओ व्यायाम आहे. सायकलिंगमुळे आपल्या पोटाची चरबी कमी होते.

ADVERTISEMENT

Shutterstock

पोहणे (Swimming)

पोहणे हा देखील एक उत्तम व्यायाम आहे. कारण पोहल्यामुळे तुमचे वजन संतुलित राहते शिवाय पोटही कमी होते. पोहण्याच्या व्यायामामुळे तुमचे शरीर सुडौल दिसू लागते. यासाठी आठवड्यातून कमीत कमी एक ते दोन वेळा स्विमिंग करा.

क्रंचेस (Crusches)

क्रंचेस हा पोट कमी करण्याचा अगदी उत्तम उपाय आहे. या व्यायामासाठी जमीनीवर पाठीवर झोपा आणि गुडघे दुमडून तळवे जमिनीला समांतर असतील असे ठेवा. पाय जमीनीपासून 90 अंशाच्या कोनामध्ये वर उचला. त्याचवेळी तुमचे दोन्ही हात मानेखाली घ्या आणि मान वर उचला. मान आणि पायाकडचा भाग  वर उचलताना श्वास बाहेर सोडा आणि पुन्हा जमिनीवर झोपताना श्वास आत घ्या. सुरूवातीला कमीतकमी दहा वेळा असे करा. हळूहळू क्रंचेसचे प्रमाण वाढवत न्या.

ट्विस्ट क्रंचेस (Twisted Crunches)

तुम्ही क्रंचेस काढण्यात एकदा का पारंगत झालात की तुम्ही हा पुढील व्यायाम प्रकार नक्कीच करू शकता. ट्विस्ट क्रंचेस काढण्यासाठी जमीनीवर झोपा आणि हात तुमच्या मानेखाली ठेवा. पाय गुडघ्यातून दुमडून घ्या. तुमच्या डाव्या खांद्याला उजव्या बाजूला वर उचला आणि उजव्या खांद्याला डाव्या बाजूने वर उचला. सुरूवातीला तुम्ही अशा दहा क्रंचेस नक्कीच काढू शकता. 

ADVERTISEMENT

साईड क्रंचेस (Side Crunches)

क्रंचेसचा हा प्रकार अगदी ट्विस्ट क्रंचेसप्रमाणे आहे. फक्त या प्रकारामध्ये तुम्हाला खांद्यासोबत तुमच्या पायाकडील भाग देखील वर उचलायचा आहे. साईड क्रंचेसमुळे तुमच्या कंबरेच्या साईडचे स्नायू बळकट होतात.

रोलिंग प्लॅंक – (Rolling Plank)

रोलिंग प्लॅंकमुळे तुमच्या पोट, मांड्या आणि नितंबाकडील स्नायू बळकट होतात. यासाठी गुडघा आणि हाताच्या मनगट आणि मुठीवर उपडी झोपा. मान सरळ ठेवून समोर बघा. गुडघा वर उचला आणि पायाची बोटे जमीनीवर सरळ ठेवा. श्वास रोखून न धरता मंद वेगात चालू ठेवा. या स्थितीत कमीत कमी तीस सेंकद स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर एकदा डावीकडे  आणि एकदा उजवीकडे कंबर ट्विस्ट करा. या प्रकाराला रोलिंग प्लॅंक असे म्हणतात.

स्टमक व्हॅक्युम (Stomach vacuum)

श्वास घ्या आणि पोट सैल सोडा. श्वास बाहेर टाकल्यावर पोट आतल्या दिशेला खेचून घ्या. या स्थितीत कमीतकमी पंधरा ते तीस सेंकद स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. दिवसभरात दोन वेळा असे करा. 

 

ADVERTISEMENT

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

हे ही वाचा –

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

अधिक वाचा –

ADVERTISEMENT

वजन कमी करण्यासाठी फॉलो करा हा डाएट प्लॅन

#WeightLoss : वजन कमी करण्यासाठी करा बर्फाचा वापर

भुईमूगाच्या शेंगांचे अफलातून फायदे, वजन ठेवते नियंत्रणात

26 Feb 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT