ADVERTISEMENT
home / मनोरंजन
farhan-akhtar-shibani-dandekar

फरहान आणि शिबानीच्या लग्नाची तयारी सुरू, मार्चमध्ये अडकणार लग्नबंधनात

बॉलीवूडमध्ये सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. नुकतेच विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांनी लग्न केले आहे. तर आता बॉलीवूडमधील अजून एक प्रसिद्ध जोडी लग्न करणार असल्याचे सुत्रांकडून कळले आहे. फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) हे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मात्र आता दोघांनीही लग्नाची तयारी सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. ही जोडी यावर्षी मार्च महिन्यात लग्नबंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे. गेले तीन वर्ष ही जोडी नात्यात असून आता पुढचा टप्पा गाठणार असल्याचे आता सांगण्यात येत आहे. 

अधिक वाचा – जीव लावणारं कुणी असलं तर, होतोच आपण प्रेमात लागिरं

मार्चमध्ये होणार लग्न 

एका मीडिया रिपोर्टनुसार, फरहान आणि शिबानी यांचे मार्च 2022 मध्ये मुंबईत लग्न होणार आहे. सध्या देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या (increasing corona cases) केस वाढत आहेत. हे लग्न ग्रँड करण्याची आधी तयारी सुरू होती. मात्र आता फरहान आणि शिबानी अत्यंत जवळच्या माणसांच्या उपस्थितीत हे लग्न करणार असल्याचे सांगितले जात आहे. हा सोहळा अत्यंत इंटिमेट सेरेमनी (Intimate Ceremony) असेल असंही म्हटलं जातंय. बॉलीवूड अनेक कलाकारांना सध्या कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे हा सोहळा अत्यंत जवळच्या आणि कुटुंबाच्या उपस्थितीत करण्याचा निर्णय दोघांनी घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. या लग्नासाठी मुंबईतील एक फाईव्ह स्टार हॉटेल बुक करण्यात आल्याचेही आता समोर आले आहे. तर इतर सगळ्या गोष्टी अंतिम टप्प्यात आल्या असल्याचेही सुत्रांकडून कळत आहे. याशिवाय सध्या बॉलीवूडचा सर्वात आवडता असणारा डिझाईनर अर्थातच सब्यासाची याच्याकडूनच लग्नाचा ड्रेस मागविण्यात येणार असल्याचेही आता समोर आले आहे. 

अधिक वाचा – स्वप्नील जोशी दिसणार नव्या भूमिकेत, ‘अश्वत्थ’ चित्रपटाची घोषणा

ADVERTISEMENT

शिबानी आणि आपली आवड एकच असल्याचे फरहानने सांगितले

एका मुलाखतीमध्ये यापूर्वी फरहानने शिबानीबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. ‘आम्ही दोघेही एकत्र वर्कआऊट करतो. चित्रपट एकत्र पाहतो. आमच्या कुत्र्याशी खेळण्यासह अनेक गोष्टी आम्ही एकत्रच करतो. महत्त्वाचं म्हणजे एकत्र वेळ घालवतो. घरातील कामं करून आम्ही आपापल्या कामाला निघून जातो. आम्हा दोघांचीही आवड सारखीच असल्याने आम्हाला एकत्र राहायला आवडतं’ दरम्यान शिबानीनेही आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून अनेकदा फरहानसह आपले अनेक फोटो पोस्ट करत प्रेम व्यक्त केले आहे. तसंच नेहमीच दोघे एकमेकांबाबत भावना व्यक्त करत असतात. शिबानी नेहमी फरहानबरोबरचे सुट्टीमधील फोटो शेअर करत असते. तर आता त्यांच्या लग्नाच्या चर्चेमुळे त्यांचे चाहते नक्कीच आनंदी असतील. तसंच यावर्षी अनेक बॉलीवूडमधील जोड्या लग्न करणार असल्याची चर्चा आहे आणि त्यामध्ये आता या दोघांचेही नाव सामील झाले आहे. दरम्यान आता महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागणार असेल तर त्यापूर्वी या जोडीने लग्न करावे अशीच त्यांच्या चाहत्यांचीही नक्कीच अपेक्षा असेल आणि शिबानी आणि फरहानला एकत्र पाहण्यासाठीही त्यांचे चाहते उत्सुक आहेत. 

अधिक वाचा – अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’वर ओमिक्रॉनचं संकट, या महिन्यात नाही होणार प्रदर्शित

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

05 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT