लग्नसराईचे दिवस म्हणजे नुसती धमाल-मस्ती. लग्नाची तारीख जवळ आली की नववधू आणि नववरांच्या मनात जणू फुलपाखरंच उडू लागतात. साखरपुडा ते लग्नाचा काळ म्हणजे अगदी अविस्मरणीय क्षण असतात. याकाळात मनात प्रेमाचे अक्षरशः तरंग उसळत असतात. आजकाल डेस्टिनेशन वेडिंगचा जमाना आहे. त्यामुळे मराठी संस्कृतीदेखील आजकाल लग्नसोहळा अगदी आठवडाभर सरू असतो. प्रि-वेडिंग सेलिब्रेशनसाठी मेंदी, संगीत अशा अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. या समारंभांत लग्नातील गाणी अधिकच रंगत आणतात. पूर्वी लग्नसोहळ्यांमध्ये घरातील महिला गाणी म्हणत असत. मात्र आता चित्रपटातील गाण्यांच्या रेकॉर्ड्स लावल्या जातात. साखरपुडा, हळद, संंगीत अशा अनेक विधींसाठी खास गाणी आहेत. अनेक चित्रपटांमध्ये तर नववधूसाठी खास गाणी रचण्यात आली आहेत. नववधूसाठी लग्नाआधीचा काळ हा अगदी रोमांचक आणि थोडासा हळवादेखील असतो. नवीन संसाराची सुरूवात करण्याची हुरहूर तर मनात असतेच पण त्यासोबतच माहेरच्या लोकांपासून दूर जाण्याचं दुःखही असतं. अशा हळव्या आणि नाजूक क्षणांना प्रफुल्लित करण्यासाठी ही गाणी तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील. लग्नसोहळ्यादरम्यान नववधू अथवा नववर त्यांच्या भावी जीवनातील सुखकर स्वप्न रंगवत असतात. भावी जोडीदारासोबत वैवाहिक जीवनात प्रवेश करतानाचे हे क्षण या गाण्यांमुळे अधिकच स्मरणीय होऊ शकतात. शिवाय घरामधील वातावरण अधिक फुलविण्यासाठी ही गाणी तुम्हाला नक्कीच मदत करतील. कारण लग्न जरी दोन व्यक्तींचे होत असले तरी या सोहळ्यामुळे दोन कुटुंब एकत्र येत असतात. कुटुंबातील नातेसबंध अधिक दृढ होण्यासाठी आणि लग्नसोहळा अधिक आकर्षक करण्यासाठी या लग्नाची गाणीमुळे (marathi wedding songs) पूरक आणि पोषक वातावरण निर्मिती होऊ शकते.
Table of Contents
वाचा – Engagement Wishes In Marathi
15 सर्वोत्तम मराठी लग्नाची गाणी (List Of Marathi Wedding Songs)
1. बॅंड बाजा वरात घोडा (मुंबई- पुणे- मुंबई 2) (Band Baja Barat)
मुंबई-पुणे-मुंबई या चित्रपटाचे एकूण तीन भाग प्रदर्शित झाले आहेत. या तिन्ही चित्रपटांना चाहत्यांनी चांगली पसंती दर्शवली होती. मुंबई-पुणे-मुंबईच्या दुसऱ्या भागातील हे गाणं आहे. या चित्रपटात अभिनेता स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे प्रमुख भूमिकेमध्ये आहेत. या चित्रपटातील पहिल्या भागात नायक आणि नायिका म्हणजेच गौतम आणि गौरीची भेट होते तर दुसऱ्या भागात त्यांच्या लग्नाचा सोहळा रंगतो. लग्नसोहळ्याची लगबग सुरू असतानाचे हे गाणं आहे. गौरी लग्नासाठी मनाची तयारी करत असते तर गौतम गौरीसोबत लग्न करण्यासाठी अधीर झालेला असतो अशी परिस्थिती यात रंगविण्यात आली आहे. सतीश राजवाडे यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. संगीता बर्व, श्रीरंग गोडबोल आणि विश्वजीत जोशी यांनी या गाण्याचे बोल लिहीले आहेत. अविनाश-विश्वजीत यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे. बेला शेंडे, आनंदी जोशी, सुरेश वाडकर आणि ऋषीकेश रानडे यांनी हे गाणं गायलं आहे.
लग्न असो वा साखरपुडा, ट्रेंडमध्ये आहे ग्लिटरी मेकअप
2. वाजंत्री वाजती रूणझूण वाजती (यंदा कर्तव्य आहे) (Vajati Vajati Runzun Vajati)
2006 साली प्रदर्शित झालेल्या यंदा कर्तव्य आहे या चित्रपटातील गाणं लग्नसोहळ्यासाठी अगदी उत्तम आहे. कारण या गाण्यात सर्व लग्नविधी दाखविण्यात आले आहेत. मराठी चॉकलेट हिरो अंकुश चौधरी आणि स्मिता शेवाळे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या गाण्यामध्ये लग्न लागण्याआधी आणि नंतर नववधू आणि नववराच्या मनातील हळव्या भावनांचा वेध घेतलेला आहे. दिवंगत अभिनेत्री रसिका जोशी हिच्या जीवनावर हा चित्रपट बेतलेला होता. दिग्दर्शक केदार शिंदे यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता.
3. नवा गडी अन नवं राज्य (टाईमप्लीज) (Nava Gadi Ana Rajya Nava)
2013 साली प्रदर्शित झालेल्या टाईमप्लीज या चित्रपटातील नवा गडी अन नवं राज्य हे गाणं देखील लग्नसोहळ्यावर आधारित आहे. या चित्रपटातील उमेश कामत आणि प्रिया बापट यांच्या प्रमुख भूमिका होता. शिवाय यामध्ये सिद्धार्थ जाधव आणि सई ताम्हणकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. समीर विध्वंस दिग्दर्शित या चित्रपटामध्ये लग्नानंतर होणाऱ्या हासू आणि रडू अशा दोन्ही घटनांचा आढावा घेण्यात आला होता. या चित्रपटाचे लेखन क्षितीज पटवर्धन यांनी केलं होतं. नवा गडी अन नव राज्य या गाण्यामध्ये नायक ऋशीकेश आणि नायिका अमृता यांच्या लग्नसोहळ्याची तयारी , लग्नसोहळा आणि लग्नानंतरचे गुलाबी दिवस दाखविण्यात आले आहे. त्यामुळे लग्नाच्या उंबरठ्यावर असलेल्या प्रत्येक नववधूला या गाण्यामुळे भविष्याची स्वप्ने पाहण्यासाठी मदत मिळू शकेल.
4. गोऱ्या गोऱ्या गालावरी (तुझ्या माझ्या संसाराला) (Gorya Gorya Galavari)
अजय-अतुलच्या चाहत्यांसाठी हे गाणं नक्कीच महत्त्वाचं असू शकेल. 2008 साली प्रदर्शित झालेल्या तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या चित्रपटातील हे गाणं आहे. अभिनेता उपेद्र लिमये आणि अभिनेत्री तृप्ती भोईर यांच्या या चित्रपटात प्रमख भूमिका होत्या. या चित्रपटातील गोऱ्या गोऱ्या या गाण्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. लग्न आणि लग्नाच्या आधीच्या नववधूच्या मनातील हळूवार भावना या गाण्यातून दाखविण्यात आल्या आहेत.
ज्वेलरी ट्रेंड 2019: सोनं आणि हिऱ्यांच्या दागिन्यांसह ट्रेंडिंग आहे पेपर आणि फ्लोरल ज्वेलरी
5. गुलाबाची कळी कशी हळदीने माखली ( तू ही रे) (Gulabachi Kali)
तु ही रे या चित्रपटातील गुलाबाची हळदी हे गाणं लग्नसोहळ्यातील असून ते अभिनेता स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री तेजस्विनी पंडीत यांच्यावर चित्रीत करण्यात आलेलं आहे. वास्तविक या चित्रपटामध्ये प्रेमाचा त्रिकोण दाखविण्यात आला होता. स्वप्निल जोशी, तेजस्विनी पंडीत आणि सई ताम्हणकर यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या. लग्नाआधीची आणि लग्नानंतरची लव्हस्टोरी यावर हा चित्रपट बेतलेला आहे.भारतीय लग्नव्यवस्था आणि अरेंज मॅरेजमध्ये लग्नानंतर जुळणारं नातं किती मजबूत असू शकतं हे यावरून दिसून येतं. गुलाबाची कळी हे नायक आणि नायिकेच्या लग्नाच्या आधीच्या घटनेवर आधारित एक गाणं आहे. मात्र या गाण्यातून लग्नाआधीच्या गोड जाणिवा जागृत करण्यात आल्या आहेत. तू ही रे चित्रपट संजय जाधव दिग्दर्शित आहे. गुलाबाची कळी हे गाणं लोकप्रिय गायिका वैशाली सावंत,अमित राज आणि ऊर्मिला धनगर यांनी गायलेलं आहे. लग्नाआधीच्या हळदी समारंभात हे गाणं आवर्जून लावलं जातं.
6. नवरी नी नवऱ्याची स्वारी ( वन्स मोअर मंगलाष्टक) (Navri Ni Navryachi Swaari)
2013 साली प्रदर्शित झालेल्या वन्स मोअर मंगलाष्टक या चित्रपटातील नवरी नी नवऱ्याची स्वारी हे गाणं नववधूच्या मनाला हळूवार फुंकर घालणारं एक गाणं आहे. हा मराठीतील एक प्रणयपट असून त्यात अभिनेता स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटात सई ताम्हणकर आणि कादंबरी कदम यांच्यादेखील भूमिका होत्या. समीर जोशी दिग्दर्शित या चित्रपटामध्ये लग्न आणि त्यानंतरचं सहजीवन दाखविण्यात आलं आहे. कधी कधी लग्नानंतर होणारं भांडण, गैरसमज, हलके-फुलके रुसवे फुगवे, लग्नानंतर असणारी एकमेकांची काळजी, करिअरची धडपड आणि एकमेकांबाबत असलेला आदर दिसून आला होता. नवरी नी नवऱ्याची स्वारी हे गाणं टायटल सॉंग्ज असून या गाण्यानेच चित्रपटाला सूरूवात होते. हे गाणं अवधूत गुप्ते आणि वैशाली सावंत यांनी गायिलेलं आहे. टायटल सॉंग असल्यामुळे या गाण्याचं मेकिंग ऑफ बघणं तुम्हाला नक्कीच आवडू शकेल. गाणं रेकॉर्ड करतानाची धमाल मस्ती देखील यात चित्रीत करण्यात आली आहे.
वाचा – लग्नसोहळ्यासाठी आकर्षक मंडप डिझाईन्स
7. नवराई माझी लाडाची लाडाची गं (इंग्लिश विग्लिश) (Navrai Majhi)
इंग्लिश विग्लिश या हिंदी चित्रपटातील नवराई माझी लाडाची लाडाची गं… हे गाणं देखील मराठी लग्नसोहळ्यांमध्ये आवर्जून लावलं जातं. या चित्रपटात दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची प्रमुख भूमिका होती. या गाण्याचे बोल हिंदी आणि मराठी असे मिश्र स्वरूपाचे असले तरी या गाण्याला एक मराठी टच नक्कीच आहे. सुनिधी चौहान आणि स्वानंद किरकिरे यांच्या आवाजातील या गाण्याचे संगीत अतिशय सुंदर आहे. त्यामुळे या गाण्याच्या तालावर लग्नातील समारंभांमध्ये नक्कीच रंगत येऊ शकते.
8. मेंदीच्या पानावर मन अजून झुळतंय गं (Mehndicha Panavar)
जर तुम्हाला जुन्या गाण्यांची आवड असेल तर मेंदी समारंभासाठी मेंदीच्या पानावर हे लता मंगेशकर यांच्या आवाजातील गाणंदेखील तुम्हाला नक्कीच आवडेल. या गाण्याच्या बोलांमध्ये नववधूच्या मनातील भावनांचा अचूक ठाव घेण्यात आलेला आहे. या अल्बममधील सर्वच गाणी अजरामर आहेत. कोणत्याही क्षणी ही गाणी तुमच्या मनाला शांत आणि निवांत करू शकतात. त्यामुळे ही लग्नाची गाणी (marathi wedding songs) आजही अनेकांच्या आवडीची आहेत.
ब्रेकअप झाल्यानंतर हमखास रडवतात ही ११ ब्रेकअप गाणी
9. फुललेले क्षण माझे (Phulale Re Kshan Majhe)
फुललेले क्षण माझे हे गाणं देखील लग्नसोहळ्याची मेंदी समारंभासाठी अगदी परफेक्ट आहे. या गाण्याचे बोल नितीन आखवे यांचे असून श्रीधर फडके यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले आहे. मूळ गाणं आशा भोसले यांनी गायलं असून या गाण्यामुळे नववधूच्या मन नक्की मोहरून निघू शकेल. खाली शेअर केलेलं गाणं विभावरी जोशी- आपटे यांनी गायलेलं आहे.
10. रसिकाच्या लग्नात (Rasikechya Lagnat)
एकेकाळी या गाण्याने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. कृणाल म्युजिक कंपनीच्या या अल्बममध्ये कोळी बांधवाच्या लग्नाचा समारंभ रंगविण्यात आला आहे. नॉन स्टॉप रसिकाच्या लग्नात असे या अल्बमचे नाव असून बाबुलनाथ नाईल यांनी हे गाणं लिहीलेलं आहे. नरेंद्र पाटील यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं जगदीश पाटील यांनी गायलं आहे.
11.स्वप्नात हरवून (सरकारनामा) (Swapnat Harvun)
सरकारनामा या चित्रपटातील स्वप्नात हरवून हे गाणं देखील लग्नसोहळ्यासाठी परफेक्ट आहे. या चित्रपटात प्रतिक्षा लोणकर यांची प्रमुख भूमिका केली होती. प्रतिक्षा लोणकर नवरीच्या भूमितकेत असताना तिच्या मैत्रिणीं तिच्या भोवती फेर धरून तिला चिडवा चिडवी करीत असतानाचे प्रसंग या गाण्यात रंगविण्यात आले आहेत. हा चित्रपट राजकारणावर आधारित असला तरी या गाण्यामधील प्रसंग वधूच्या घरातील मंडळींचे मन हेलावून टाकणारे आहेत.
12. नवरी नटली अंग बाई सुपारी फुटली (Navri Natli)
लग्नाच्या वरातीमध्ये हे गाणं आवर्जून लावलं जातं. या गाण्यामुळे वधू आणि वर अशी दोन्हीकडची मंडळी नक्कीच वरातीत ताल धरू शकतात. हे गाणं लावलं की अंगामध्ये नाचण्याचा जणू उत्साहच संचारू लागतो. त्यामुळे हे गाणं लग्नघरात नक्कीच लावता येईल.
तसेच मराठीतील सर्वोत्कृष्ट मराठी ब्रेकअप गाणी वाचा
13. साजरी गोजिरी (तुझं तू माझं मी) (Sajiri Gojiri)
तुझं तू माझं मी या चित्रपटातील साजिरी गोजिरी गाणं लग्नसोहळ्यामध्ये नक्कीच रंगत आणू शकेल.या चित्रपटात ललित प्रभाकर आणि नेहा महाजन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. कुलदीप जाधव दिग्दर्शित या चित्रपटातील हा प्रसंग तुमच्या लग्नसोहळ्यासाठी अगदी परफेक्ट आहे. कारण लग्नाच्या आधीची तयारी आणि लग्नाचा गोंधळ यांचा उत्तम मेळ या गाण्यात करण्यात आला आहे. त्यामुळे आजच्या काळातील नववधू आणि नववर यांच्या मनाला या गाण्यातून हळूच फुंकर घातली जाईल
14. नवरोजी नवरोजी सिंपल साधे नवरोजी( शुभ लग्न सावधान) (Nawroji Shubh Lagna)
शुभ लग्न सावधान या चित्रपटातील नवरोजी नवरोजी हे गाणं देखील लग्नसोहळ्यासाठी नक्कीच मस्त आहे. या चित्रपटात अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री श्रुती मराठे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. समीर सर्वे दिग्दर्शित या चित्रपटात लग्न पद्धतीचे महत्व पटविण्याचा उत्तम प्रयत्न केला आहे. लग्नाचे बंध किती मजबूत असतात हे पटविण्यासाठी नायिका नायकाला एका लग्नाला येण्यासाठी गळ घालते. या लग्नसोहळ्यातील हे गाणं असून त्यामध्ये नवरा आणि नवरीला चिडविण्याचे प्रसंग रंगविण्यात आले आहेत.
15. रंग माळियेला (आनंदी गोपाळ) (Ranga Maliyela)
या वर्षी प्रदर्शित झालेला आनंदी गोपाळ हा चित्रपट भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांच्या जीवनावर आधारित होता. आनंदीबाई आणि गोपाळराव यांच्या जीवनाचा खडतर प्रवास या चित्रपटात दाखविण्यात आला होता. या चित्रपटातील ‘रंग माळिलेया’ या गाण्यामध्ये गोपाळराव आणि आनंदीबाईच्या लग्नाचा सोहळा दाखविण्यात आला आहे. या चित्रपटात भाग्यश्री मिलिंद हिने आनंदीबाईंची भूमिका साकारली होती तर ललित प्रभाकरने गोपाळरावांची भूमिका केली होती. केतकी माटेगावकर आणि शरयू दाते यांनी हे गाणं गायलं आहे. नव्या नात्याची सुरूवात करताना या गोड क्षणांच्या साक्षीला हे गाणं नक्कीच चांगली साथ देऊ शकतं.
मराठी देशभक्तीपर गीतं आणि त्याचा अर्थ
लग्नसोहळ्यासाठी आम्ही तुम्हाला सूचवलेली गाणी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला जरूर कळवा.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
देखील वाचा –
Lata Mangeshkar Marathi Songs – तुमच्या प्ले लिस्टमध्ये असालाच हवी ही लता मंगेशकर मराठी गाणी