ADVERTISEMENT
home / Fitness
उन्हाळ्यात येणाऱ्या घामोळ्या उपाय (Home Remedies On Prickly Heat)

उन्हाळ्यात येणाऱ्या घामोळ्या उपाय (Home Remedies On Prickly Heat)

उन्हाळा सुरु झाला की, अनेक आजार डोकं वर काढू लागतात. एकतर उन्हाची काहिली आणि त्यामध्ये होणारे हे त्रास फारच तापदायक असतात.उन्हाळे लागणे, डिहायड्रेशन, सर्दी, ताप आणि साथीचे आजार होऊ लागतात. शरीर या दिवसात जास्त थकल्यामुळे प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे हे आजार होऊ लागतात. त्वचा विकाराशी संबंधित असा आजार म्हणजे ‘घामोळ्या’ तो देखील या दिवसात अनेकांना होतो. घामोळे येणे त्रास सुरु झाला की, त्वचेला खाज सुटते. जर याकडे लक्ष दिले नाही. तर संपूर्ण शरीर बारीक पुळ्यांनी भरते. तुम्हालाही घामोळ्यांचा त्रास होत असेल तर तुम्ही योग्य वेळी त्वचेची काळजी घ्यायला हवी. घामोळ्या म्हणजे काय? त्यावरील घामोळे उपायकोणते ते जाणून घेत माहीत करुन घेऊया.

घामोळे म्हणजे काय ? (What Is Prickly In Marathi)

घामोळे येणे

Instagram

ADVERTISEMENT

घामोळे अर्थात Prickly Heat. यामध्ये शरीरावर बारीक बारीक पुरळ.उन्हाळ्यात घामाचे शरीरातून जास्त उत्सर्जन होते. हा घाम त्वचेत तसाच मुरला तो स्वच्छ केला नाही तर मात्र ही हिट त्वचेवरील पुरळ बनून राहते. या पुरळ लाल रंगाच्या आणि बारीक असतात. याला बारीक बारीक काटे असतात. म्हणून त्याला प्रिक्ली असे म्हणतात. हे काटेच जणू शरीरावर असल्यामुळे अंगाला खाज सुटते. खाजवल्यामुळे तो भाग लालसर होऊ लागतो.  घामोळ्यांना नख लागल्यामुळे त्यातून रक्तस्राव होऊ लागतो.  घामोळे आल्यानंतर त्याची योग्य काळजी घेतली तर ते घामोळे लवकर बरे होण्यासाठी त्वचेची काळजी घेणे फार गरजेचे असते. त्यामुळे त्याची योग्य काळजी घेण्यासाठी काही सोपे उपाय करता येतात. जर योग्यवेळी जर काळजी घेतली तर घामोळ्या बऱ्या होण्यास मदत मिळते.

घामोळ्या उपाय (Home Remedies For Prickly In Marathi)

घामोळ्या झाल्यानंतर चिडचिड न करता त्याची योग्य काळजी घेतली तर ते लवकर जाण्यास मदत होते. काही घरगुती उपाय हे घामोळ्यांवर उत्तम काम करतात. घामोळ्या उपाय जाणून घेत त्याचा वापर कसा करायचा ते देखील आपण जाणून घेऊया.

मुलतानी माती

मुलतानी माती ही फार उपयुक्त असते. ती प्रकृतीने खूप थंड असते. मुलतानी माती लावल्यामुळे त्वचेला थंडावा देण्याचे काम करतो. मुलतानी मातीमुळे घामोळ्यांची खाज कमी होते. जर खाजवून शरीर लाल पडले असेल तरी देखील त्यापासून आराम मिळतो. याच्या नित्य वापरामुळे शांत झोप लागते. लहान मुलांना गळ्याजवळ किंवा पाठीवर असे घामोळे आले असतील तर तुम्ही अगदी हमखास त्यांच्या शरीरावर मुलतानी मातीचा उपयोग करा.

ADVERTISEMENT

असा करा वापर (How To Use):
मुलतानी माती आणून ती पाण्यात छान भिजवून घ्या. थोडावेळ ती पूर्णपणे भिजू द्या. माती पाण्यात छान एकजीव झाली की, घामोळ्यांवर अगदी हलक्या हाताने किंवा सॉफ्ट ब्रशच्या मदतीने लावा. त्यामुळे लगेचच त्वचेचा दाह कमी होण्यास मदत मिळेल. मुलतानी माती वाळल्यानंतर ती थंड पाण्याने काढून टाका. या दिवसात थंड पाण्याची आंघोळ ही फार फायद्याची ठरते.

कोरफड

कोरफड

Instagram

घामोळ्यांमुळे जर तुमच्या त्वचेला लालिमा आली असेल तर त्या ठिकाणी खूप जळजळ होऊ लागतो. अशावेळी कोरफड हे फायदेशीर ठरतं. कोरफडीचा गर हा आराम देतो. कोरफडीचा गर हा इतरवेळीही त्वचा विकारांसाठी फार फायदेशीर असतो. त्यामुळे जर घामोळे खूप झाले असतील आणि ते लाल झाले असतील तर मात्र तुम्ही त्यावर थंडगार कोरफडीचा गर लावा. ज्या ज्या वेळी तुम्हाला ही जळजळ जाणवेल त्यावेळी कोरफड लावल्यास काहीच हरकत नाही.

ADVERTISEMENT

असा करा वापर (How To Use):
फुल आलेल्या कोरफडीचा गर किंवा तुमच्याकडे जेल असल्यास काही काळासाठी ती फ्रिजमध्ये ठेवा. तो थंड झाल्यानंतर घामोळ्यांवर लावायला घ्या. त्यामुळे तुम्हाला आराम मिळतो. असे तुम्ही दिवसातून केवळ दोनदा करा. खूप वेळाही हा प्रयोग करु नका. कारण त्यामुळे शरीरात उष्णता ही निर्माण होऊ शकते.

बर्फ

एखाद्या गोष्टीवर अगदी तातडीने थंड वाटू द्यायचे असतील तर त्यावर बर्फ उत्तम पद्धतीने काम करते. बर्फामुळे आवश्यक असलेला थंडावा तुम्हाला मिळतो. घामोळ्यांवर अगदी तातडीने आराम मिळावा असे वाटत असेल तर तु्म्ही त्यावर काही वेळासाठी बर्फ फिरवू शकता. त्यामुळे तुम्हाला आराम मिळतो.

असा करा वापर (How To Use):
बर्फाचा थेट प्रयोग शरीरावर करु नका. त्याऐवजी एका पातळ कपड्यात बर्फ गुंडाळून घ्या. त्यानंतर तो बर्फ घामोळे आलेल्या ठिकाणी मिळवा तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.

ओटमील

ओट्स

ADVERTISEMENT

Instagram

ओट्सच्या उपयोग वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या कारणांसाठी केला जातो. त्वचा विकारावरही ओट्स खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. ओट्सचा वापर केल्यामुळे त्वचा त्वरीत थंड होते. शिवाय पुळ्या, पुरळ , पुटकुळ्या यांची लालिमा कमी होते. जर घामोळे खाजवून जखम झाली असेल तर ती जखमही बरी होण्यास मदत मिळते.

असा करा वापर (How To Use):
ओट्स साधारण 5 मिनिटांसाठी पाण्यात भिजवून ठेवा. त्याममध्ये काहीही घालून नका. ओट्स चांगले भिजले की, त्याचा हाताने लगदा करुन घ्या आणि तो त्वचेला लावून घ्या. संपूर्ण शरीराला जरी ओट्स लावले तरी त्याचे कोणतेही विपरित परिणाम होत नाहीत. त्यामुळे त्याचा वापर तुम्ही बिनधास्त करु शकता.

कडुनिंब

कडुनिंब हे अँटिबॅक्टेरिअल गुणांनी युक्त असते. याच्या वापरामुळे शरीराला कोणत्याही जखमा झाल्या असतील तर त्याचे इन्फेक्शन कमी करण्याचे काम कडुनिंब करते. बरेचदा शरीराला आलेल्या अशा पुळ्या पुटकुळ्या कमी करण्यासाठी कडुनिंबाचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. कडुनिंबाचा फेसपॅक चेहऱ्यासाठी उत्तम असतो.

ADVERTISEMENT

असा करा वापर (How To Use):
घामोळ्यांसाठी कडुनिंबाचा वापर करायचा तुम्ही विचार केला असेल तर गरम पाण्यात कडुनिंबाची पाने उकळून घ्या. हे पाणी थंड झाल्यानंतर या पाण्याने आंघोळ करा. तुम्हाला नक्कीच त्यामुळे तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.

बेकिंग सोडा

बेकिंग सोडा हा देखील त्वचा स्वच्छ करण्याचे काम करतो. त्यामुळे त्वचेवर असलेले फोड कमी करण्याचे काम करतात. त्यामुळे बेकिंगसोडा हा अनेक ठिकाणी वापरला जातो. पण काही जणांना बेकिंग सोडा वापरल्यामुळे त्रासही होऊ शकतो. जर तुम्हाला असा त्रास होत असेल तर तुम्ही बेकिंग सोड्याचा वापर टाळा.

असा करा वापर (How To Use):
बेकिंग सोडा घेऊन तो भिजवून घ्या. बेकिंग सोडा आणि पाणी एकत्रित आल्यामुळे त्याच्यातून बुडबुडे येऊ लागतात. असे बुडबुडे येत असतानाच तुम्ही ते घामोळ्यांवर लावा. काही काळासाठी तुमचे घामोळे चुरचुरतील पण त्यानंतर तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.

चंदन पावडर

चंदन पावडर

ADVERTISEMENT

Instagram

चंदन पावडर ही देखील थंडावा देण्याचे काम करते. चंदन पावडर ही खूप महागडी असते.  त्यामुळे त्याची सहज उपलब्धता होईल याची खात्री नाही. पण तुम्ही चंदन पावडरचा उपयोग करुन तुम्हाला नक्कीच थोडा थंडावा मिळेल. चंदन पावडर थेट शरीराला लावल्यामुळळे तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.

असा करा वापर (How To Use):
गुलाबपाण्यात चंदन पावडर भिजवा त्याची अगदी पातळशी पेस्ट तयार करा. ही चंदन पावडर तुम्ही घामोळे आलेल्या भागाला लावा तुम्हाला त्यामुळे नक्कीच आराम मिळेल.

गुलाब पाणी

गुलाबपाणी हे देखील थंडावा देण्याचे काम करते. जर तुम्हाला  घामोळ्यांवर सतत काही तरी शिडकावा करुन थंडावा मिळवायचा असेल तर तुम्ही सोबत गुलाबपाणी नेऊ शकता.गुलाबपाण्यामुळे तुम्हाला त्वरीत थंडावा मिळतो. शिवाय घामोळ्यामुळे तुम्हाला जर लालिमा आली असेल तर ही लालिमा कमी करण्यासही गुलाबपाणी  मदत करते.

ADVERTISEMENT

असा करा वापर (How To Use):
बाजारात गुलाबपाण्याचा स्प्रे मिळतो. जो शक्य असेल तेव्हा घामोळ्यांवर मारा. त्यामुळे तुम्हाला लगेचच थंडावा मिळेल. गुलाबपाणी हे त्वचेवर कोणत्याही प्रकारे नुकसान करु शकता नाही त्यामुळे त्याचा वापर हा फारच फायदेशीर ठरतो.

प्रिकली हिट पावडर

बाजारात रेडिमेड मिळणारा पर्याय म्हणजे  प्रिकली हिट पावडर. टाल्कम पावडरमध्ये बरेच वेगवेगळे घटक घालून ती तयार केली जाते. त्यामुळे घामोळे थांबण्यास मदत होते. घामोळ्यांवर आराम हवा असेल तर हा अगदी सोपा असा पर्याय आहे. त्यामुळे नक्कीच आराम मिळतो.

असा करा वापर (How To Use):
प्रिकली हिट पावडर या थोड्या जड असतात. त्यामुळे त्या थोड्याच लावल्या तरी पुरेशा असतात. बरेचदा  या पावडरमुळे पटकन थंडावा मिळतो. पण काही जणांची त्वचा या पावडरमुळे काळवंडण्याची शक्यता असते.

लिंबू

लिंबू

ADVERTISEMENT

Instagram

लिंबामध्ये व्हिटॅमिन्स C असते. त्वचेला व्हिटॅमिन्सची खूपच गरज असते. लिंबाचा उपयोगही अनेक त्वचारोगा साठी फार फायदेशीर ठरतो. लिंबाचा योग्य पद्धतीने उपयोग केला तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. घाम शोषून घेऊन शरीराला घामापासून फ्री ठेवते.

असा करा वापर (How To Use):
लिंबाचा थेट वापर त्वचेवर आणि घामोळ्यावर मुळीच करु नका. तुमच्या थंड पाण्यामध्ये लिंबाचा रस घाला आणि अशा पाण्याने तुम्ही आंघोळ करा. लिंबाचे पाणी घालून तुम्ही जर आंघोळ केली तर तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.

ADVERTISEMENT

तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s )

1. घामोळ्या या गंभीर त्वचाप्रकार आहे का ?

उन्हाची तीव्रता वाढली की, शरीराला उष्णतेमुळे मोठ मोठे फोड येतात. गळा, पाठी, छातीवर मोठमोठ्या फोडी येऊ लागतात. ज्या ठिकाणी घाम थांबतो त्य ठिकाणी या फोड्या येऊ लागतात. हा प्रकार गंभीर तेव्हा होतो. जेव्हा घामोळ्याची वाढ जास्त होते आणि त्याला खाज सुटू टाकते. हे घामोळे जास्त खाजवले तर त्यातून रक्तस्राव होण्याची शक्यता असते. त्यामुळे यावर योग्य इलाज करणे गरजेचे असते.

2. कोणते व्हिटॅमिन हे घामोळ्यांसाठी चांगले आहे ?

त्वचेच्या कोणत्याही प्रकारासाठी व्हिटॅमिन C हा चांगला खुराक आहे. त्वचेमध्ये आर्द्रता कमी झाली असेल. तर ती भरुन काढण्याचे काम व्हिटॅमिन C करते. त्यामुळे तुम्ही लिंबू वर्गातील फळे किंवा व्हिटॅमिन्सच्या गोळ्या यांचे सेवन करायला काहीच हरकत नाही.

3. घामोळे किती दिवसांसाठी राहते ?

साधारण आठवडाभरासाठी घामोळ्या राहतात. शरीरात पाण्याचे प्रमाण आणि योग्य काळजी घेतली तर घामोळ्या हळुहळू कमी होतात. पण प्रत्येकाच्या शरीरप्रवृत्तीनुसारही तुमच्या घामोळ्या बऱ्या होण्यासाठी वेळ घेतो.

12 Apr 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT