गुढीपाडवा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गृहिणींची घराच्या आवरा-आवरीसाठी आणि सजावटीसाठी लगबग सुरू होईल. आपल्याकडे गुढीपाडव्याचं महत्त्व फार आहे. गुढीपाडव्याला घराची सजावट, घरात गोडधोड , एकमेंकाना भेटून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा आणि आशिर्वाद घेणे हे आलंच. त्यासोबतच गृहिणीला वेध लागतात गुढीपाडव्याच्या निमित्ताने खास कोणती रांगोळी काढायची याचे. पण तुम्हाला माहीत आहे का, वास्तूनुसार जर तुम्ही रांगोळी काढलीत तर तुमची नववर्षाच्या निमित्ताने सुख-समृद्धी आणि भरभराट होईल. रांगोळी रेखाटताना आधी तुम्ही कधी याबाबत विचार केला होता का? मग यंदा फॉलो करा वास्तूशात्रानुसार रांगोळी आणि रंग.
प्रकृतीप्रमाणेच रंगांचा प्रभावही आपल्या भावना आणि संवेदनांवर होत असतो. रंगांच्या माध्यमातून व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रूपाने प्रभावित होत असतो. जसं उर्जेचा रंग लाल, समृद्धीचा रंग हिरवा, आनंदाचा रंग पिवळा आणि प्रेमाचा रंग गुलाबी, विस्तृतेचा रंग निळा, शांततेचा रंग पांढरा आणि ज्ञानाचा रंग जांभळा असं मानलं जातं. हे सर्व रंग वेगवेगळे भाव व्यक्त करतात. हेच कारण आहे की, आपल्या भारतीय संस्कृतीनुसार शुभ दिवशी वेगवेगळ्या रंगांच्या माध्यमातून रांगोळी काढण्याची प्रथा अनेक पिढ्यांपासून प्रचलित आहे. शुभ प्रतीक मानली जाणारी रांगोळी मग ती तांदूळ, हळद, कुंकू किंवा फुलापानांनी काढलेली का असेना. पण तुम्हाला माहीत आहे का, जर तुम्ही वास्तूनुसार रांगोळी दिशा आणि रंग लक्षात घेऊन काढली तर ती तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी आणि भरभराट घेऊन येते. रांगोळी काढण्याने आसपासची नकारात्मक ऊर्जा समाप्त होते आणि सकारात्मक उर्जेचा संचार सुरू होतो. घरावर देवांची कृपा कायम राहते.
कोणत्या दिशेला कोणती रांगोळी? Rangoli according to direction
PIxabay
वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घराचा मुख्य दरवाज्याची दिशा पाहून त्यानुसार कोणत्या आकाराची आणि कोणती रंगाची रांगोळी काढावी हे सांगण्यात आलं आहे.
जर तुमचं घर पूर्वमुखी असेल आणि मुख्यदरवाज्याकडे तुम्ही रांगोळी काढलीत. तर घरात सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण होतं. घराच्या भरभराटीसाठी अंडाकार डिझाईनमध्ये रांगोळी काढा. पूर्व दिशेला अंडाकार डिझाईन काढल्याने आयुष्यातील विकासाचे नवे मार्ग खुले होतील. या दिशेला रांगोळी काढताना सात्विक आणि उर्जा प्रदान करणारे रंग म्हणजे लाल, पिवळा, गुलाबी आणि केशरी रंग याचा वापर करा.
उत्तरमुखी घर असल्यास लाटांचा किंवा पाण्याच्या गुणाशी मिळतंजुळतं डिझाईन काढा. यामुळे तुमच्या जीवनात स्पष्टता आणि प्रगतीच्या संधींना आमंत्रण मिळेल. पिवळा, हिरवा, आकाशी आणि निळा रंगसुद्धा या दिशेला रांगोळी काढण्यासाठी शुभ मानण्यात आला आहे.
दक्षिण-पूर्वेला त्रिकोण किंवा दक्षिण मुखी घर असल्यास सुंदर आयताकृती पॅटर्नची रांगोळी काढल्यास लाभदायक ठरेल. या दिशेला रांगोळी काढल्यावर ती भरण्यासाठी गडद लाल, केशरी, गुलाबी किंवा जांभळ्या रंगाचा वापर करा. अशा प्रकारे काढलेली रांगोळी तुमच्या जीवनात सुरक्षा, यश आणि आत्मविश्वास वाढवण्यास मदत करेल.
जर तुमचं घर पश्चिम मुखी असेल तर सोनेरी किंवा पांढऱ्या रंगाचा वापर करून गोलाकार रांगोळी काढा. पांढऱ्या आणि सोनेरी रंगासोबत लाल, पिवळा, फिकट हिरवा अशा रंगांचाही तुम्ही वापर करू शकता. यासोबतच पंचकोनी आकारातील रांगोळी काढता येईल.
You Might Also Like