एखाद्या खास प्रसंगी अथवा कार्यक्रमासाठी तुम्ही पार्लरमध्ये तासनतास घालवता. एखादा नवीन हेअर कट, स्ट्रेटनिंग अथवा ब्लो ड्राय केल्यावर सेट केलेले केस फार सुंदर दिसतात. त्यामुळे तुमचे केस नेहमी तसेच राहावे असं तुम्हाला वाटू लागतं. मात्र काही तासांनी अथवा हेअर वॉश केल्यावर तुमचे केस पुन्हा नेहमीप्रमाणे दिसू लागतात. मात्र घरीच काही सोप्या युक्त्या करून पार्लरप्रमाणे तुम्ही घरीच केस सेट करू शकता. यासाठी या काही हेअर केअर टीप्स तुम्हाला फायदेशीर ठरतील
हेअरकट करताना काळजी घ्या-
तुम्ही पार्लरमध्ये जी हेअरस्टाईल अथवा हेअरकट करत आहात तो तुमच्या केसांसाठी योग्य असावा. तुमच्या केसांची लांबी आणि टेक्चरनुसार हेअरकट करा. कारण तुमच्या केसांचा पोत, त्यांचे टेक्चर आणि केसांमधील त्वचा या सर्वांचा तुमच्या केसांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. यासाठीच तुमच्या केसांबद्दल आधी जाणून घ्या आणि मगच एखादी हेअरस्टाईल करा. ज्यामुळे ती हेअरस्टाईल काही दिवस तशीच राहील.
केसांना योग्य पोषण द्या-
केस चमकदार आणि सुंदर दिसावेत यासाठी केसांचे योग्य पोषण होईल याची काळजी घ्या. नियमित भरपूर पाणी पिण्यासोबत केसांना नियमित तेल, कंडीश्नन आणि सिरमदेखील लावा. ज्यामुळे तुमचे केस मऊ आणि मुलायम होतील. मऊ टेक्चर झाल्यामुळे केस फ्रीज न होता सेट केल्याप्रमाणे दिसू लागतील. केसांची योग्य काळजी घेण्यासाठी Streax PRO Hair Serum Vita Gloss (Rs 189) तुम्ही वापरू शकता.
केस योग्य पद्धतीने धुवा-
केस धुताना ते नेहमी खालच्या दिशेला करून धुवावे. ज्यामुळे त्यांचा गुंता कमी होतो आणि ते लवकर तुटत नाहीत. शिवाय केस धुताना शॅंपू केसांच्या मुळांवर कधीच लावू नका. केसांना शॅंपू लावताना ते रगडून अथवा घासून धुवू नका. केसांसाठी वापरण्यात येणारा शॅंपू तुमच्या केसांच्या प्रकारासाठी योग्य आहे याची दक्षता घ्या. केस अती कोरडे असतील तर आठवड्यातून एकदा सौम्य शॅंपू आणि एकदा केवळ कंडीश्नर लावून केस धुवा.
केस धुताना करू नका या ‘7’ चुका
केस धुतल्यावर कोरडे करण्यासाठी टॉवेल वापरू नका-
बऱ्याचदा घाईघाईत केस धुतल्यावर ते कोरडे करण्यासाठी तुम्हाला केस टॉवेलने रगडून पुसण्याची सवय असते. मात्र तसे मुळीच करू नका. कारण असं केल्यामुळे केस अती प्रमाणात कोरडे होतात आणि तुटतात. केस पुसण्यासाठी एखादा कॉटनचा पंचा अथवा जुनं टी-शर्ट वापरा. ज्यामुळे केसांमधील पाणी निघून जाईल मात्र केसांमधील नैसर्गिक तेल तसंच राहील. असे कोरडे केलेले केस सुकल्यावर पार्लरमध्ये सेट केल्याप्रमाणे दिसतात.
मोठ्या दातांचा कंगवा वापरा-
केस धुतल्यावर ते विंचरण्यासाठी मोठे दात असलेला कंगवा वापरा. असा कंगवा वापरून केस विंचरल्यामुळे केसांचा गुंता लवकर सुटतो, केस मोकळे आणि सुटसुटीत होतात आणि केस कमी प्रमाणात तुटतात. केसांचा व्हॉल्यूम टिकल्यामुळे ते कोरडे झाल्यावर सेट केल्याप्रमाणे दिसतात.
ट्विस्ट इट अप-
केस एखाद्या क्लिपच्या अथवा हेअरस्टिकच्या मदतीने वरच्या दिशेने गुंडाळून केसांचा बन तयार करा. बाहेर जाण्यापूर्वी काही तास हा हाय बन बांधून ठेवा. त्यामुळे बाहेर जाताना केस मोकळे सोडल्यावर ते कर्ल केल्याप्रमाणे दिसू लागतील. घरच्या घरी तुम्ही केस अशा पद्धतीने सेट करू शकता.
या’ ट्रीक्सने दिसतील तुमचे केस लांबसडक
केस आणि त्वचेच्या सौंदर्यासाठी दही आहे उपयुक्त
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम