रणवीर सिंहच्या Gully boy ने गल्लीच्या सगळ्या रॅपर्सना त्यांच्या स्वप्नांना जगण्याची एक संधी मिळवू दिली. त्यामुळेच कदाचित रॅपिंगचा एक नवा करीअर ऑप्शन सध्याच्या पिढीला मिळाला आहे. हा गंमतीचा भाग वगळला तर सध्या खूप रॅपर्स वेगवेगळ्या भाषेतील रॅपस घेऊन येत आहे. मराठी भाषेतही असेच ‘बहुत हार्ड रॅप’ आलेले आहेत. तुम्ही जर ते ऐकले नसतील तर आज नक्की ऐका. कारण हे रॅप एकदम खास आहेत… बोले तो एकदम झक्कास आहेत.. त्यामुळे या मराठमोळ्या मुलांचे रॅप तुम्ही ऐकलेच पाहिजे.
आईबाबांशिवाय तैमुरने अशी केली धुळवड साजरी
- आपला टाईम येणार आहे
‘अपना टाईम आएगा’ या रणवीर सिंहच्या गाण्याचे मराठी व्हर्जन असलेला हे गाणे आहे. हे गाणे शंभो रॅपरने गायले आहे. हे गाणे झी मराठी म्युझिकची प्रस्तुती असून हिंदी गाण्याचे डिक्टो मराठीत भाषांतरीत करण्यात आले आहे.त्यामुळे हे गाणे ऐकताना तुम्हाला रणवीर सिंह आठवेल. पण या गाण्यातील शंभो हा मराठी रॅपर आणि त्याची स्टाईलही थोडी हटके आहे. म्हणजे आता त्याने या गाण्यात पांढरा शुभ्र कुडता आणि लेंगा घातला आहे. डोक्यावर गांधी टोपी आणि गळ्यात मस्त रुद्राक्षाची माळ आहे त्यामुळे तो यात हटके दिसतोय हे काही सांगायला नको. सध्या सोशल मीडियावर या गाण्याची चर्चा होत आहे.
- आम्ही पुणेकर
युट्युबवरील खास रे टीव्हीने ही एक रॅप गाणे केले आहे. ‘आम्ही पुणेकर’ नावाचे हे रॅप असून सगळया पुण्याची नव्ययाने ओळख या रॅपने करुन दिली आहे. मुंबई की पुणे? असे भांडण नेहमी सुरु असते. म्हणूनच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येच तुम्ही पुण्याचे नसलात म्हणून काय झाले? असे म्हटले आहे. हे गाण ऐकल्यावर धम्माल येते. हे गाणे रॅपर ऋषिकेशने गायले आहे आणि जर तुम्ही पुण्याचे असाल तर तुम्हाला हे गाणे ऐकल्यावाचून चैनच पडणार नाही.
दिव्यांका त्रिपाठी प्रेग्नेंट, फोटो झाले वायरल
- भांडुप सरस ७८
भांडुप सरस ७८ हे गाणही सोशल मीडियावर चांगलच सुरु आहे. हिंदी-मराठी भाषेतील हे रॅप असून यातही संपूर्ण भांडुप पश्चिमची ओळख करुन दिली आहे. जर तुम्ही भांडुपला राहत असाल तर तुम्हाला हे नक्कीच आवडेल. हे रॅप गाणारा मुलगा मराठी असून त्याने नाव प्रथमेश सावंत आहे आणि त्याचे योगीकिंग नावाने युट्युब चॅनेल आहे.
- भन्नाट
VNM रॅपरचे हे रॅप गाणे देखील सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे. VNM म्हणजेच विराज मांजरेकर. विराज हा डोबिंवलीचा असून त्याने या आधी रॅप लिहिले असले तरी त्यााचा व्हिडिओ तयार केला नव्हता. पण त्याने ‘भन्नाट’ नावाचा पहिला व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या त्याच्या गाण्याला फार व्ह्युज नाहीत पण या निमित्ताने त्याने व्हिडिओ तयार केला असे म्हणायला हवे.
विकी कौशल करणार कतरिनाच्या बहिणीसोबत रोमान्स
- उंच भरारी
‘स्वप्नांच्या वाटेवर घेतो मी उंच भरारी’ हे मराठी रॅपर युगचे गाणे त्याने दोन महिन्यांपूर्वी पोस्ट केले आहे. या गाण्यामध्ये त्याने कलाकाराची व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे.शिवाय रॅपचा उद्दिष्टही सांगितला आहे. रॅपरच्या लुकपेक्षा रॅप महत्वाचे असते हे त्याच्या रॅपमधून नक्कीच कळते.
एकूणच काय नव्या रॅपर्सना आता एक नवी संधी मिळाली आहे. या माध्यमातून त्यांची कला सादर करण्याची
(सौजन्य- Youtube)