ADVERTISEMENT
home / आरोग्य
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी आहारात असा करा सुंठाचा वापर

हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी आहारात असा करा सुंठाचा वापर

पावसाळ्याप्रमाणेच हिवाळा हा ऋतूदेखील आजारपणांना आमंत्रण देणारा असतो. कारण हिवाळ्यातील उबदार वातावरण जीवजंतूंसाठी पोषक असतं. ज्यामुळे सर्दी, खोकला, ताप, जुलाब अशा अनेक आरोग्यसमस्या या काळात डोकं वर काढतात. या आरोग्य समस्या गंभीर नसल्या तरी त्यावर वेळीच उपचार करणं गरजेचं आहे. आपल्या स्वयंपाकघरातील अनेक वस्तू या छोट्या मोठ्या आजारपणांना दूर करण्यास समर्थ असतात.  प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात सुंठ असतेच. सुंठ म्हणजे सुकवलेलं आलं. आलं आणि सुंठ हे एकच पदार्थ असले तरी त्या दोघांचे गुणधर्म मात्र निरनिराळे आहेत. आलं जसं आरोग्यदायी आहे तसंच सुंठदेखील आहे. म्हणूनच मराठी म्हणीत ‘सुंठीवाचून खोकला गेला’ असं म्हणण्याची पद्धत सुरू झाली असावी.बऱ्याचदा हिवाळ्यात सुंठवडा, सुंठाचे लाडू घरोघरी बनवले जातात. कारण सुंठामुळे अनेक आजारपणं दूर राहू शकतात. यासाठीच जाणून घेऊ या सुंठाचे आरोग्यदायी गुणधर्म.

आलं आणि सुंठ

Shutterstock

सुंठ पावडरचे आरोग्यदायी गुणधर्म –

सुंठ पावडर बाजारात विकत मिळते नसेल तर आलं सुकवून घरीच तुम्ही त्याची पावडर करू शकता. ही पावडर हिवाळ्यात तुमच्या अनेक आरोग्य समस्या दूर ठेवण्यासाठी वापरता येऊ शकते. 

ADVERTISEMENT

पचनसंस्था सुधारते –

बऱ्याचदा पचनसंस्था बिघडल्यामुळे तुम्हाला अपचन, पोटाच्या समस्या, बद्धकोष्ठता अशा समस्या जाणवतात. ज्यामुळे वारंवार पोटात गॅस निर्माण होतो. जर तुम्ही या समस्या सहन करत असाल तर तुमच्या स्वयंपाकात सुंठाचा वापर वाढवा. यासोबत तुम्ही जेवणाआधी कोमट पाण्यासोबत सुंठ पावडर घेऊ शकता. ज्यामुळे तुमचे पोट स्वच्छ होईल आणि  पचनसंस्था सुधारेल.

सुंठ पावडर

Shutterstock

खोकला, घशाची खवखव, ताप, सर्दीपासून आराम मिळतो –

आल्यामध्ये सर्दी, खोकला दूर करण्याचे गुणधर्म असतात जे तुम्हाला सुकवलेल्या आल्यात म्हणजेच सुंठ पावडरमध्येही आढळतात. यासाठी सर्दी, खोकला झाल्यास आल्याचा अथवा सुंठ टाकलेला चहा घ्यावा म्हणजे लगेच आराम मिळतो. सर्दी दूर करण्यासाठी सुंठ पावडर आणि मधाचे चाटण अथवा सुंठ घातलेला काढा तुमच्या फायद्याचा ठरू शकतो. ताप अथवा डोकेदुखीवर सुंठ पावडरीचा लेप डोक्यावर लावला जातो. ज्यामुळे ताप लवकर उतरतो आणि डोकेदुखी थांबते.

ADVERTISEMENT

मासिक पाळीतील वेदना कमी होतात –

मासिक पाळी आणि पोटदुखी, कंबरदुखी, डोकंदुखी याचं एक वेगळंच नातं आहे. ज्यामुळे प्रत्येक महिन्याला स्त्रीयांना या त्रासाला सामोरं जावंच लागतं. पण जर तुम्ही या काळात कोमट पाण्यातून  सुंठ पावडर घेतली तर तुमच्या या वेदना कमी होऊ शकतात. 

रक्तातील साखर कमी होते –

ज्यांना मधुमेहाची समस्या आहे त्यांनी जर आहारात सुंठाचा वापर केला तर त्यांना आश्चर्यकारक बदल जाणवू शकतात. रक्तातील साखर नियंत्रणात आणण्यासाठी कोमट पाणी, सुंठ आणि सैंधव घेण्याचा सल्ला दिला जातो. ज्यामुळे तुम्हाला लवकर बरं वाटू शकतं.

वजन कमी करण्यासाठी –

ज्यांना आपलं वजन झटपट कमी व्हावं असं वाटत असेल त्यांच्यासाठी सुंठ एक गुणकारी औषध आहे. कारण सुंठामुळे तुमची पचनशक्ती सुधारते. ज्यामुळे तुमच्या शरीरातील साठलेली चरबी कमी होते, रक्तातील साखर नियंत्रणात राहते. थोडक्यात सुंठाच्या वापरामुळे तुमचे मेटाबॉलिझम नियंत्रणात येते ज्यामुळे तुमचे वजन कमी होऊ लागते. 

कोलेस्ट्रॉल कमी होते –

आजकाल अनेकांना ह्रदयाच्या समस्या वाढण्याची भिती वाढत असते. कारण खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवणं कठीण जातं. यासाठीच तुमच्या आहारात सुंठाचा वापर करा. ज्यामुळे तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होईल आणि ह्रदयाच्या समस्यांपासून सुटका मिळेल.

ADVERTISEMENT

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

हे ही वाचा –

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

अधिक वाचा –

ADVERTISEMENT

आरोग्य आणि स्मरणशक्तीसाठी वरदान आहे आलं

मासिक पाळी लवकर येण्यासाठी सोपे उपाय

सकाळी उठल्याबरोबर प्याल हे तर होईल फायदाच फायदा

23 Jan 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT