निरोगी आणि सुदृढ शरीरासाठी आपल्या जीवनशैलीत योग्य बदल करणं फार गरजेचं झालं आहे. जी माणसं वेळेवर झोपतात, लवकर उठतात, योग्य आणि संतुलित आहार घेतात, योगासने, व्यायाम आणि मेडिटेशन नियमित करतात त्यांचं जीवन नक्कीच आनंदी आणि समाधानी असतं. मात्र आजकालच्या धकाधकीच्या जीवनात रात्री वेळेवर झोपणं आणि लवकर उठणं फारच कठीण झालं आहे. बऱ्याचवेळा काही लोकांना लवकर झोपण्याचा प्रयत्न करूनही पटकन झोपही लागत नाही. जर तुम्हालाही शांत झोप लागत नसेल तर झोपण्यापूर्वी या गोष्टींची सवय जरूर लावा. जे लोक आपल्या आरोग्याबाबत जागरूक असतात ते झोपण्यापूर्वी काही गोष्टी कटाक्षाने पाळतात. ज्यामुळे तुमचे संपूर्ण आरोग्य निरोगी आणि आनंदी होऊ शकते. या सवयी तुम्ही जर फॉलो केल्या तर तुम्हालाही शांत झोप नक्कीच लागेल.
रात्री झोपण्यापूर्वी करा या गोष्टी
रात्री लवकर झोप लागण्यासाठी या काही गोष्टींची सवय स्वतःला लावणं गरजेचं आहे.
झोपण्यापूर्वी दात घासणे –
वैद्यकीय शास्त्रानुसार दिवसभरात दोन वेळा दात घासणं फार महत्त्वाचं आहे. सकाळी उठल्यावर तर सर्वजण दात घासतातच. पण जेवणानंतर आणि झोपण्यापूर्वी जर तुम्ही दात घासले तर त्याचा तुमच्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो. दातात अडकलेले अन्नकण, जीवजंतू यामुळे निघून जातात. तुम्हाला फ्रेश वाटू लागतं आणि झोप चांगली लागते.
अंघोळ करणे –
तुमच्या गाढ झोपेचा आणि तुमच्या शरीरातील तापमानाचा संबंध असतो. रात्री झोपण्याआधी अंघोळ केल्यामुळे तुमच्या शरीराचे तापमान संतुलित राहण्यास मदत होते. कोमट पाण्याने अंघोळ केल्यामुळे तुमचे शरीर रिलॅक्स होते. दिवसभराचा कामाचा ताण आणि शीण यामुळे कमी होतो. शिवाय या गोष्टींची सवय लावल्यास तुम्हाला शांत झोप लागू शकते.
Shutterstock
मेटिटेशन करणे –
रात्री गाढ झोप लागत नसेल तर मेडिटेशनचा तुम्हाला फारच चांगला फायदा होऊ शकतो. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी एका ठिकाणी बसून काही मिनीटे शांत बसून राहा. ध्यानाचा परिणाम तुमच्या मानसिक स्थितीवर होतो ज्यामुळे तुम्हाला शांत झोप लागते. मेडिटेशनचे तुमच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थावर चांगले परिणाम होतात. एखाद्या मंत्र अथवा प्रार्थनेचा जप तुम्ही करू शकता. ज्यामुळे तुमचे मन शांत आणि निवांत होण्यास मदत होईल.
पाणी पिणे –
काही लोकांना संध्याकाळी मद्यपान करण्याची सवय असते. मद्यपान अथवा धुम्रपान करणे शरीरासाठी हानिकारक आहे. हे तर सर्वांना माहीत असतेच. मात्र तरिही काही माणसे या सवयींच्या आहारी जातात. ज्यामुळे भविष्यात निद्रानाशाचा त्रास त्यांना जाणवू लागतो. या सवयीवर मात्र करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी मुबलक प्रमाणात पाणी पिण्याची सवय लावा. ज्यामुळे तुमचे शरीरा हायड्रेट राहील आणि तुम्हाला झोपही चांगली लागेल.
व्यायाम करणे –
रात्री झोपण्यापूर्वी व्यायाम नक्कीच करू नये. मात्र संध्याकाळी अथवा रात्रीच्या जेवणाआधी दोन तास आधी तुम्ही व्यायाम नक्कीच करू शकता. ज्यामुळे तुम्हाला चांगली झोप लागण्यास मदत होईल. जर तुमची जीवनशैली बैठी असेल आणि तुम्हाला सकाळी व्यायाम करण्यास वेळ नसेल तर तुम्ही संध्याकाळी व्यायाम करू शकता.
रात्रीचे जेवण हलके आणि सात्त्विक घेणे –
रात्री जेवल्यानंतर लगेच झोपू नये त्याआधी शतपावली करावी हे तर आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. मात्र आजकाल रात्रीचं जेवण फार उशीरा केलं जातं. यासाठी जर तुम्ही रात्री उशीरा जेवणार असाल तर ते जेवण हलकं आणि सात्विक असेल याची काळजी घ्या. फार जड आणि मांसाहारी जेवण केल्यास तुम्हाला रात्री अपचनाचा त्रास होऊ शकतो.
रात्रीची झोप कमीत कमी सात तास घेणे –
रात्री किती वेळ झोपावं हे खरं तर प्रत्येकाच्या शारीरिक गरज, आरोग्य, कामाचे स्वरूप यावर अवलंबून आहे. मात्र तज्ञ्जांच्या मते प्रत्येक व्यक्तीने कमीत कमी सात ते आठ तास झोपण फार गरजेचं आहे. यासाठी रात्री पुरेशी झोप मिळेल याची काळजी घ्या.
बेडरूममध्ये वातावरण निर्मिती करणे –
रात्री झोपताना बेड स्वच्छ करणे, बेडरूममध्ये मंद सुवास, संगीत लावणे अशा गोष्टींची सवय तुमच्या फायद्याची ठरू शकते. अशा वातावरणामुळे तुमच्या मेंदूला झोपेचा संदेश मिळतो. याउलट रात्री झोपताना टीव्ही अथवा मोबाईल पाहण्याच्या सवयीमुळे तुमच्या झोपेवर विपरित परिणाम होऊ शकतो. यासाठी रात्री झोपताना कमीत कमी अर्धा तास या गोष्टींपासून दूर राहा.
फोटोसौजन्य – शटरस्टॉक
हे ही वाचा –
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.
अधिक वाचा –
दिवसभर झोप येत असेल तर नक्की ट्राय करा ‘या’ टिप्स
तुमची झोपण्याची पद्धत सांगते तुमची पर्सनॅलिटी,तुम्ही नेमकं कसं झोपता