केस सुंदर आणि चमकदार असावे असं प्रत्येकीला वाटत असतं. मात्र हेअरस्टाईल, प्रदूषण, केमिकलयुक्त उत्पादनं, मानसिक ताणतणाव, चुकीचा आहार यामुळे केस मोठ्या प्रमाणावर गळू लागतात. अशा वेळी तुम्ही केसांवर कितीही महागड्या ट्रिटमेंट केल्या तरी काही उपयोग होत नाही. उलट केमिकलयुक्त ट्रिटमेंटमुळे केसांचे अधिक नुकसान होते. केस नैसर्गिक पद्धतीने पुन्हा चमकदार करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. यासाठीच केस धुण्यासाठी वापरा हर्बल वॉटर… जाणून घ्या हर्बल वॉटरचे केसांवर होणारे फायदे
केस धुण्यासाठी कसा करावा हर्बल वॉटरचा वापर
केस धुण्यासाठी तुम्ही घरच्या घरी हर्बल वॉटर वापरू शकता. विशेष म्हणजे तुम्ही हे आर्युवेदिक पाणी स्वतःच करू शकता. जाणून घ्या तुमच्या केसांप्रमाणे कसे करावा हर्बल वॉटरचा वापर
लिंबाचे पाणी
केस धुण्यासाठी लिंबाचे पाणी वापरणे एक बेस्ट आणि नैसर्गिक उपाय आहे. कारण लिंबामधील असलेले पोषक घटक तुमच्या केसांसाठी फायदेशीर ठरतात. लिंबामध्ये असलेले फॅटी अॅसिड, अॅंटि ऑस्किडंट्स, व्हिटॅमिन्स या पाण्यातून केसांना मिळतात. ज्यामुळे केसांचे गळणे थांबते आणि केस मजबूत होतात.
नारळ पाणी
नारळ पाणी पिण्यासाठी जितकं उपयुक्त आहे तितकंच ते तुमच्या केसांसाठी फायदेशीर आहे. नारळामध्ये असलेले अॅंटि ऑस्किडंट्स या पाण्यातून तुमच्या केसांना मिळतात. नारळपाण्याने केस धुतल्यामुळे तुमचे केस मऊ आणि चमकदार होतात. शॅम्पू केल्यावर सर्वात शेवटी केस धुताना तुम्ही केस नारळपाण्याने धुवू शकता.
रीठा आणि आवळ्याचे पाणी
केसांचे आरोग्य वाढण्यासाठी रीठा आणि आवळा खूप फायदेशीर असतात. म्हणूनच केस धुण्यासाठी तुम्ही रीठा आणि आवळ्याचे आयुर्वेदिक पाणी वापरू शकता. यासाठी रात्रीभर पाण्यात रीठा आणि आवळा भिजत ठेवा. सकाळी ते पाणी उकळून अर्ध करा. थंड झाल्यावर केसांना लावा. या हर्बल वॉटरमुळे तुमच्या केसांच्या अनेक समस्या कमी होतील.
कांद्याचे पाणी
केसांची वाढ चांगली होण्यासाठी तुम्ही केसांना कांद्याचे पाणी वापरू शकता. यासाठी कांद्याचा रस काढा आणि त्यात पाणी टाकून ते पाणी केसांना लावा. कांद्यामध्ये केसांना काळेभोर आणि लांबसडक करणारे गुणधर्म असतात. तुमचे केस पांढरे होत असतील अथवा गळत असतील तर हे हर्बल वॉटर तुमच्या फायद्याचे आहे.
चहाचे पाणी
केसांना काळेभोर आणि चमकदार करण्यासाठी चहा पावडर फायद्याची आहे. यासाठी चहापावडर पाण्यात उकळा आणि त्याचे पाणी थंड झाल्यावर गाळून केसांना लावा. शॅम्पू केल्याव केसांना कंडिशनरप्रमाणे तुम्ही हे हर्बल वॉटर लावू शकता. ज्यामुळे केस काळेभोर होतील आणि शाईनी दिसू लागतील.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक