ADVERTISEMENT
home / Diet
आपल्या जेवणात फायबरचा करून घ्या समावेश, तज्ज्ञांचे मत

आपल्या जेवणात फायबरचा करून घ्या समावेश, तज्ज्ञांचे मत

फायबर आपल्या शरीरात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते, हे पाचक प्रणालीस एकापेक्षा अधिक प्रकारे मदत करते आणि यामुळे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास देखील मदत होते. फायबरमधील समृद्ध आहार घेतल्यास हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होते. इतकेच नाही तर आतडे सिंड्रोमपासून मुक्त होते, वजन कमी होण्यास मदत होते आणि त्वचा निरोगी आणि चमकदार राहते. उत्तम पचन सुलभ करण्यासाठी फायबर-युक्त पदार्थ आपल्या दैनंदिन आहाराचा एक भाग असावेत असे तज्ज्ञांकडूनही नेहमी सांगण्यात येते. आम्हीदेखील यासंदर्भात विटाबायोटिक्स, फिटनेस अँड न्यूट्रिशन एक्स्पर्ट येथे उपाध्यक्ष असणाऱ्या रोहित शेलाटकर यांच्याशी याबाबत चर्चा केली आणि त्यांच्याकडून याविषयी अधिक जाणून घेतले. आपल्या वाचकांसाठी त्यांनी दिलेली ही खास माहिती.

रोजच्या जेवणातील डाएटमध्ये कोणते अन्न असावे

आम्ही केलेल्या चर्चेनुसार रोहित शेलाटकर यांनी सांगितले की, रोजच्या जेवणामध्ये नक्की कोणत्या अन्नाचा समावेश करून घ्यावा जेणेकरून तुमच्या शरीरात योग्य प्रमाणात फायबरचा भरणा होऊ शकेल. याचीच माहिती आम्ही तुम्हाला खाली देत आहोत.

चणे

चणे

Instagram

ADVERTISEMENT

चण्याच्या एका कपमध्ये अंदाजे 16 ग्रॅम फायबर असते. चिकनमध्ये मॅग्नेशियम आणि ओमेगा -3 फॅटी अॅसिड, ओमेगा -6 फॅटी अॅसिड आणि प्रथिने देखील समृद्ध असतात. चणे हे कोशिंबीरीत खाल्ले जाऊ शकतात किंवा ते प्रोटीन पॅक असलेल्या स्नॅकसाठी अथवा पारंपरिक पद्धतीने करण्यात येणाऱ्या भाजीमध्येही वापरून तुम्ही खाऊ शकता. रात्रभर चणे भिजवून अथवा भाजलेले चणे तुम्ही नाश्त्यामध्ये समाविष्ट करून घेऊ शकता. तसंच तुम्ही तुमच्या नेहमीच्या मसाल्यांमध्येही याचा वापर करून घेऊ शकता.

अवाकाडो

अवाकाडो

Shutterstock

अवाकाडोमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते आणि अवाकाडोमध्ये उत्तम पोषक तत्वे असून यामध्ये विटामिन के, फोलेट, पोटॅशियम, विटामिन बी6, विटामिन बी5, विटामिन ई आणि विटामिन सी असून आपल्या शरीरासाठी अत्यंत उत्तम फळ आहे. वजन कमी करण्यासाठीही अवाकाडोचा उपयोग होतो. यामध्ये अत्यंत कमी प्रमाणात कॅलरी असून शरीरातील फॅट्स वाढू न देण्याचे काम अवाकाडो उत्तमरित्या करते. त्याशिवाय फायबर असल्याने पोटही भरलेले राहाते

ADVERTISEMENT

चिया सीड्स

पोषक तत्वांचा भरणा असलेल्या चिया सीड्सचाही तुम्ही आहारात समावेश करून घ्या. ओमेगा – 3 फॅटी अॅसिड्स, प्रोटीन, विटामिन्स आणि मिनरल्स याचा यामध्ये समावेश असतो. आरोग्य चांगले राखण्यासाठी आणि पचनक्रिया उत्तम राखण्यासाठी याचा चांगला उपयोग करून घेता येतो. मधुमेही व्यक्तींसाठी तर चिया सीड्स हे वरदान आहे. तुम्हाला यातून मिळणारे फायबर मधुमेहावर नियंत्रण आणण्यासाठीही फायदेशीर ठरते.

बेरी

बेरी

Shutterstock

इतर फळांच्या तुलनेत बेरीमध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते त्यामुळे त्यामध्ये वेगळी साखर घालण्याची गरज भासत नाही. त्यात दही अथवा दूध मिक्स केले अथवा बेरीज नुसत्या खाल्ल्या तरीही तुमच्या शरीराला फायबर मिळते. त्यामुळे दिवसभरात या फळांचा समावेश नक्की करून घ्यावा. यामध्ये फायबर, विटामिन ए, सी, ई आणि के असते. त्याशिवाय फोलेटही असते. हाडांचा मजबूती मिळण्यासाठी आणि त्वचा अधिक चांगली राखण्यासाठीही याचा उपयोग होतो.

ADVERTISEMENT

रताळ्यापासून तयार केलेल्या या रेसिपीज जरूर ट्राय करा

रताळे

रताळे

Shutterstock

रताळ्यामध्येही फायबर जास्त प्रमाणात असते. आपल्याकडे बऱ्याच जणांना आठवड्यातून उपवास करायचीही सवय असते. त्यावेळी तुम्ही साबुदाण्याऐवजी रताळ्याचा उपयोग करून घ्या. रताळ्याचा किस अथवा रताळ्याची भाजी करून तुम्ही खाऊ शकता. मधुमेही व्यक्तींसाठीही हे त्रासदायक ठरत नाही. रताळ्यामध्ये साखर असते असं सांगितलं जातं. पण तरीही याचा मधुमेही व्यक्तींना त्रास होत नाही. तसंच यामध्ये मॅग्नेशियमही असते. रताळे उकडूनदेखील खाल्ले जाते. चविष्ट असते.

ADVERTISEMENT

सालीसकट सफरचंद खाल्ल्याने होते वजन कमी, जाणून घ्या फायदे

गाजर

गाजर

Shutterstock

बीटा कॅरेटिन, फायबर, विटामिन के 1, पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट्सने गाजर युक्त असते. गाजरामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात जे तुमच्या शरीरातील साखरेची पातळी कमी करण्यास उपयुक्त ठरतात. तसंच तुम्हाला मधुमेह असेल तर याचा फायदा होतो. फायबर जास्त असल्याने पोट भरलेले राहून पटकन भूक लागत नाही. नियमित तुम्ही एका गाजराचा ज्युस प्यायलात अथवा सलाड म्हणून रोज गाजर खाल्लेत तर तुम्हाला नक्की याचा फायदा होतो.

ADVERTISEMENT

सफरचंद

सफरचंद

Shutterstock

पचनक्रियेसाठी सफरचंदाचा फायदा होतो हे तर सर्वांनाच माहीत आहे. रोज एक सफरचंद खावे असे प्रत्येक डॉक्टर सांगतात. यामध्ये रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, लठ्ठपणा आणि कॅन्सरसारख्या आजारांपासून दूर राखण्याची शक्ती असते. त्यामुळेच नियमित सफरचंद खावे.

फायबरयुक्त पदार्थांचं सेवन न केल्यास होतील ‘हे’ गंभीर परिणाम

ADVERTISEMENT

वर दिलेल्या अन्नाचा तुम्ही तुमच्या नियमित खाण्यात समावेश करून घेतलात तर तुम्हाला त्याचा आरोग्य निरोगी राखण्यास फायदा मिळतो. तसंच तुम्हाला तुमच्या शरीराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे वेळीच जर फायबर तुम्ही खात नसाल तर या फळांचा आणि भाज्यांचा आपल्या जेवणात समावेश करून घ्या.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

12 Mar 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT