home / DIY फॅशन
history-of-rani-haar-collection-style-designs-in-marathi

राणी हारची फॅशन ज्यामध्ये खुलते सौंदर्य, काय आहे इतिहास

महिलांच्या सुंदरतेमध्ये भर घालतात ते म्हणजे दागिने (Jewellery). सोन्याचे दागिने असो वा मोत्याचे विविध दागिने असतो. मेकअप, हेअरस्टाईल आणि साड्यांसह दागिन्यांमुळेही आपले सौंदर्य अधिक खुलून येते. प्रत्येक महिलेकडे वेगवेगळ्या पद्धतीचा दागिन्यांचा सेट हा असतोच. कोणत्या कार्यक्रमात कसे दागिने वापरायचे हेदेखील आपण ठरवत असतो. तसे तर आजकाल बाजारात विविध आणि ट्रेंडी दागिने दिसून येतात. पण जी गोष्ट पारंपरिक दागिन्यांमध्ये आहे ती आजही तशीच आहे. या सगळ्यात लक्ष वेधून घेणारा दागिना म्हणजे राणी हार. अर्थात राणी हार म्हटलं की आपल्यासमोर पूर्वीच्या राण्यांच्या प्रतिमा उभी राहाते. आजही अनेक ठिकाणी नववधू लग्नामध्ये राणी हार घालण्याला प्राधान्य देते. तुम्ही हा राणी हार इमिटेशन ज्वेलरीच्या दुकानातूनही विकत घेऊ शकता. 

हल्ली विशेषतः अनेक बॉलीवूड अभिनेत्रींनी आपल्या लग्नात राणी हार घातला आहे. यामध्ये प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra), नयनथारा (Nayanthara) यांची नावे घेता येतील. तर नीता अंबानी (Neeta Ambani) जवळही अनेक राणी हाराचे डिझाईन्स आहेत, जे तिच्या मुलाच्या लग्नात दिसून आले होते. पण या राणी हाराचा इतिहास काय आहे आणि याची साधारण किंमत किती असते ते आपण जाणून घेऊया. 

राणी हाराचा इतिहास (History Of Rani Har)

Rani Haar Collection

भारतीय दागिन्यांचे डिझाईन्स वेगवेगळे आहेत. त्यापैकी राणी हार हा खरंत तर राजस्थानी संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतो. राजस्थानातील राजघराण्यातील महिला आपल्या श्रृंगारात या हाराचा समावेश करून घते होत्या. कोणत्या शतकात या हाराची निर्मिती झाली अथवा कोणत्या राणीने सर्वात पहिल्यांदा या हाराचा उपयोग केला हे सांगणं तसं कठीण आहे मात्र, आजही राजपूत घराण्यात अशा पद्धतीचे राणीहार घालण्याची परंपरा कायम आहे. अनेक घरात पिढ्यानुपिढे हा हार जपत आलेलाही दिसून येतो. पूर्वीच्या काळी हा हार राणी घालत असल्यामुळेच याला राणीहार असे नाव प्राप्त झाले. मोती अथवा रत्नांनी हा हार पूर्वीपासून तयार करण्यात येतो. किमान तीन ते चार लड असणारा हा राणीहार अत्यंत सुंदर दिसतो आणि मोठा असतो. 

मात्र आजच्या काळात यामध्ये अनेक बदलही करण्यात आलेले दिसून येतात. मुख्यत्वे आता केवळ श्रीमंत घराण्यातील महिलाच नाही तर अगदी मध्यमवर्गीय महिलाही अशा पद्धतीचा राणीहार आपल्या दागिन्यांमध्ये समाविष्ट करून घेऊ शकतात. अनेकदा आर्टिफिशियल दागिन्यांमध्येही याचे डिझाईन्स पाहायला मिळतात. 

राणी हाराचे प्रकार (Types of Ranihar)

Rani Haar – Instagram
  • तुम्हाला चोकरसह मल्टीलड असणारा राणीहार मिळू शकतो. तसंच तुम्ही एखाद्या भरजरी साडी अथवा भरजरी लेहंग्यावर याचा वापर करून घेऊ शकता 
  • 5 लड असणारा राणीहारही उपलब्ध असतो. हा तुम्ही व्ही नेकलाईनच्या ब्लाऊजसह घालू शकता. दिसायला यामुळे अत्यंत सुंदर दिसते 
  • साधारणतः 3-5 लड असणारे राणी हार तुम्हाला ज्वेलर्सच्या दुकानात अथवा बाजारात इमिटेशन ज्वेलरीमध्ये उपलब्ध होतात. जे तुम्ही भरजरी साड्या अर्थात कांजीवरम साडी, बांधणी अथवा बंधेज साडी, लहरिया साडी, लेहंगा यासह परिधान करू शकता

राणीहाराची किंमत (Price Of Ranihar)

राणीहार हा रत्न, मोती आणि वेगवेगळ्या खड्यांनी तयार करण्यात येतो. याची मूळ किंमत ही लाखोंच्या घरात असते. पण तुम्ही तुमच्या पद्धतीने राणीहार कस्टमाईज करूनही तयार करून घेऊ शकता. तर तुम्हाला आर्टिफिशियल अथवा इमिटेशन राणीहार हवा असेल तर तो बाजारामध्ये साधारणतः 500 रूपयांपासून ते तुमच्या खिशाला परवडेल अशा किमतीपर्यंत मिळू शकतो. तसंच यामध्ये तुम्हाला वेगवेगळे डिझाईन्स आणि तुमच्या आवडत्या खड्यांमध्येही राणीहार मिळू शकतात. तुम्ही तुमच्या लेहंगा आणि साडीच्या रंगाप्रमाणे याची खरेदी करू शकता. 

08 Aug 2022

Read More

read more articles like this
good points logo

good points text