Advertisement

आरोग्य

गरोदर महिलांसाठी सर्दी-खोकल्यावर घरगुती उपाय (Pregnancy Madhe Sardi Khokla Var Upay)

Trupti ParadkarTrupti Paradkar  |  Apr 29, 2020
Pregnancy Madhe Sardi Khokla Var Upay

Advertisement

वातावरणातील बदलांमुळे सर्दी- खोकला अशी आजारपणं येणं स्वाभाविक आहे. मात्र सध्या कोरोनामुळे साध्या सर्दी खोकल्याचीदेखील अनेकांना भिती वाटत आहे. जर तुम्ही गरोदर असाल आणि फक्त वातावरणातील बदलामुळे तुम्हाला सर्दी खोकल्याचा त्रास होत असेल तर घरीच काही सोपे उपाय करून तुम्ही तुमचा सर्दी खोकला बरा करू शकता. यासाठी जाणून घ्या गरोदर महिलांसाठी सर्दी खोकल्यावर घरगुती उपाय (Pregnancy Madhe Sardi Khokla Var Upay). मात्र लक्षात ठेवा या उपायांनी एक ते दोन दिवसांमध्ये तुमचा सर्दी खोकला बरा झाला नाही तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. 

आल्याचा चहा

आपल्या प्रत्येकाच्या घरी आलं असतंच. आल्यामध्ये भरपूर अॅंटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. ज्यामुळे तुम्ही ते एखाद्या अॅंटि बॅक्टेरिअल, अॅंटि व्हायरल, अॅंटिबायोटिकप्रमाणे वापरू शकता. जर तुम्हाला साधा सर्दी खोकला झाला असे तर तुम्ही आल्याचा रस घेऊन त्यावर उपचार करू शकता. याच प्रमाणे आजारी पडू नये यासाठी आहारात आल्याचा वापर जरूर करा. आल्याचा चहा घेतल्यामुळेदेखील तुम्हाला नक्कीच बरे वाटू लागेल. मात्र आल्याचा अती वापर करू नका. कारण आलं उष्ण गुणधर्माचे आहे.

मध आणि हळदीचे चाटण

मध हे घरात खोकल्यावर उपाय (pregnancy madhe khokla upay) करण्यासाठी हमखास वापरले जाते. कारण त्यामुळे कफ कमी होतो आणि तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. बऱ्याचदा गरोदरपणात तुमची रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे तुम्हाला खोकला अथवा सर्दी होण्याची शक्यता असते. असं झाल्यास घरीच थोडसं हळद आणि मधाचे चाटण घ्या. ज्यामुळे तुम्हाला यातून नक्कीच आरााम मिळेल.

मध आणि हळदीचे चाटण

लसूणाचा स्वयंपाकात वापर करा

लसणामुळे तुमची सर्दी नक्कीच बरी होऊ शकते. कारण लसूण अॅंटि बॅक्टेरिअल आणि अॅंटि सेप्टिक आहे. काही संशोधनानुसार लसणामुळे तुमच्या शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि रक्तदाबाची समस्या कमी होते. म्हणूनच आहारात लसणाचा वापर जरूर करा ज्यामुळे तुम्हाला सर्दी खोकल्याचा त्रास होणार नाही आणि तुमचा रक्तदाबही सुरळीत राहील. 

वाचा – गरोदरपणाच्या पहिल्या महिन्यात कशी काळजी घ्यावी

मीठाच्या पाण्याच्या गुळण्या करा

मीठ हे निर्जंतूक असल्यामुळे तुम्ही कोमट पाण्यात मीठ टाकून त्याच्या गुळण्या तुम्ही नक्कीच करू शकता. अशा प्रकारे केलेल्या गुळण्यांमधून तुमच्या घशातील कफ बाहेर पडतो. घसा निर्जंतूक झाल्यामुळे सर्दीमुळे घशात होणारी खवखव कमी होते. नाकाच्या आजूबाजूचा सायनसचा त्रास कमी झाल्यामुळे सर्दीमुळे होणारी डोकेदुखी कमी होते. यासाठी थोडासा खोकला जाणवू लागल्यास लगेच मीठाच्या पाण्याने गुळण्या करा.

गरम पाण्याची वाफ घ्या

सर्दी झाल्यावर चेहऱ्यावर गरम पाण्याची वाफ घेणं हा घरच्या घरी करण्यासारखा एक सोपा आणि साधा उपाय (pregnancy madhe sardi var upay) आहे. बऱ्याचदा नाकपुड्या, घसा अशा ठिकाणी कफ साठल्यामुळे तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होतो. मात्र चेहऱ्यावर गरम पाण्याची वाफ घेतल्यामुळे नाक आणि घसा मोकळा होतो. यासाठीच त्वरीत हा उपाय करा ज्यामुळे तुमची सर्दी आणि खोकला वाढणार नाही. 

गरम पाण्याची वाफ घ्या

सर्दी खोकल्यावर हे साधे आणि घरी करण्यासारखे उपाय करा. मात्र जर त्याने लवकर आराम मिळाला नाही तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण जर साधे इनफेक्शन असेल तर या घरगुती उपायाने तुम्हाला एक ते दोन दिवसांमध्ये आराम मिळेल. मात्र जर आराम मिळाला नाही तर तुम्हाला त्याच्या मागील इतर कारणांसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल. गरोदरपणात कोणत्याही आजारपणात हलगर्जी पणा करू नये. कारण आजारपण अंगावर काढण्यामुळे तुमच्या बाळावर त्याचा परिणाम होऊ शकतो.

 

अधिक वाचा –

‘अशी’ लक्षणं जाणवत असतील तर तुम्ही गरोदर आहात हे समजा
गरोदरपणी ही फळं आवर्जून खावी
गरोदरपणात चुकूनही खाऊ नका हे पदार्थ