ADVERTISEMENT
home / आरोग्य
Tondala Chav Yenyasathi Kay Karave

तोंडाला चव येण्यासाठी घरगुती उपाय (Tondala Chav Yenyasathi Kay Karave)

आजारपणातून बरं होताना तुम्हाला तोंडाला काहीच चव नाही असं वाटत आहे का? असं असेल तर मुळीच घाबरू नका कारण हा एक तात्पुरता बदल आहे. शरीरातील इतर बदलांसोबत तुमच्या तोंडाची चव पुन्हा येईल आणि त्यासाठी काही घरगुती उपाय तुमच्या नक्कीच फायद्याचे ठरतील. पण जर वयोमानानुसार तुमच्या तोंडाची चव गेली असेल तर त्यावर तुम्हाला तुमच्या डॉक्टरच्या मदतीने त्वरीत उपाय करावे लागतील. सोबत तुम्ही हे तोंडाला चव येण्यासाठी घरगुती उपाय करू शकता. कारण याचे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत. 

लसूण (Garlic)

साहित्य –

 • लसणाच्या दोन ते तीन पाकळ्या
 • पाणी

काय कराल –

 • एका भांड्यात पाणी गरम करा
 • त्यात लसणाच्या पाकळ्या टाका आणि पाच ते तहा मिनिटे पाणी उकळू द्या
 • पाणी गाळून घ्या आणि कोमट असताना एखाद्या काढ्याप्रमाणे प्या
 • दिवसातून दोनवेळा हा उपाय करा

कसे आहे उपयुक्त –

ADVERTISEMENT

लसणामध्ये अॅंटि इनफ्लैमटरी गुणधर्म असतात. ज्यामुळे तुमची सर्दी, खोकला आणि ताप कमी होण्यास मदत होते. लसणामुळे तुमचा श्वास मोकळा होतो. ज्यामुळे तुमची वास घेण्याची आणि चव चाखण्याची क्षमता पूर्ववत होते.

लसूण

आलं (Ginger)

साहित्य –

 • आल्याचा पातळ चिरलेला तुकडा

कसा कराल उपाय –

ADVERTISEMENT
 • आल्याच्या पातळ चिरलेल्या तुकड्यावर काटच्याच्या चमच्याने दोन ते तीन भोक तयार करा
 • त्यावर थोडं मीठ टाका 
 • आल्याचा तुकडा दाताखाली ठेवा आणि त्यातून झिरपणारा रस प्या
 • हा उपाय जमत नसल्यास आल्याचा चहा करून प्या

कसा आहे उपयुक्त –

आल्यामुळे तुमच्या तोंडाची चव सुधारते. ताप, सर्दीमुळे तोंडाला आलेला कडवटपणा कमी होतो. जेव्हा तुम्ही जीभ आणि दातामध्ये आल्याचा तुकडा ठेवता तेव्हा त्यातून येणाऱ्या रसामुळे तुमच्या जीभेचे टेस्ट बड्स सक्रिय होतात. आलं अॅंटि इनफ्लैमटरी असल्यामुळे तुमची सर्दी, खोकला आणि ताप लवकर बरा होतो

आलं

लिंबू (Lemon)

साहित्य –

ADVERTISEMENT
 • एक अर्धे कापलेलं लिबू
 • साखर

कसा  कराल उपाय –

 • लिंबाचा अर्ध्या कापलेल्या भागावर साखर लावा
 • गॅसवर तवा गरम करा आणि त्यावर साखरेकडचा भाग 
 • ठेवा
 • साखर वितळू लागली की तव्यावरून लिंबू काढून घ्या
 • थंड झाल्यावर जिभेवर तो भाग हलक्या हाताने रगडा अथवा लिंबाचा रस जिभेने चाटा.

कसे ठरते उपयुक्त –

लिंबामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढते. शिवाय आंबट आणि गोड चवीमुळे तुमच्या जीभेची चव परत येण्यास मदत होते

लिंबू

ADVERTISEMENT

ऑईल पुलिंग (Oil Pulling)

तोंडीची दुर्गंधी कमी करण्यासाठी आणि चव वाढवण्यासाठी फार पूर्वीपासून ऑईल पुलिंगचा उपाय केला जातो.

साहित्य –

 • एक चमचा नारळाचे तेल

कसा कराल उपाय –

 • तोंडात नारळाचे तेल चमच्याने टाका
 • तोंड बंद करा आणि चुळ भरल्याप्रमाणे करा
 • तोंडात दहा ते पंधरा मिनिटे तेल घुसळा
 • ज्यामुळे तोंडातील जीव जंतू त्या तेलाला चिकटतील
 • दहा मिनिटांनी तेल थुंकून द्या
 • दात घासून तोंड स्वच्छ करा
 • नियमित हा उपाय करा

कसा आहे उपयुक्त –

ADVERTISEMENT
 • ऑईल पुलिंगमुळे तुमचे तोंड आतून स्वच्छ होते. निरोगी आरोग्यासाठी हा उपाय नेहमी करायला हवा
 • असं केल्यामुळे हळूहळू तुमच्या  तोंडाची चव परत येण्यास नक्कीच मदत होईल

ऑईल पुलिंग

अधिक वाचा –

दातांची स्वच्छता करण्यासाठी असा करा फ्लॉसचा उपयोग

सोरायसिस म्हणजे काय जाणून घ्या सर्व माहिती (Psoriasis Treatment In Marathi)

ADVERTISEMENT

प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हिवाळ्यात मुळा खाणं ठरेल फायदेशीर

14 Dec 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT