मेष – आरोग्याची काळजी घ्या
आज मधुमेही अथवा अती वजन असलेल्या लोकांना त्रास होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी एखादा अधिकारी तुम्हाला सहकार्य देण्याची शक्यता आहे. घरात मंगल कार्य घडण्याची शक्यता आहे. देणी-घेणी करताना सावध रहा.
कुंभ – रक्तदाबात सुधारणा येण्याची आहे
आज तुमच्या रक्तदाबाच्या समस्येमध्ये सुधारणा जाणवेल, आहारावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. व्यवसायात प्रगती होऊ शकते. कौटुंबिक वातावरण सुखाचे असेल. अनोळखी लोकांवर विश्वास ठेऊ नका. आर्थिक स्थिती मजबूत राहील.
मीन – ताण-तणाव वाढण्याची शक्यता
आज तुमच्या कौटुंबिक जीवनातील ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे. जोडीदार आणि तुमच्यामध्ये अंहकाराची भिंत निर्माण करू नका. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यातील रस वाढवा.
वृषभ – धनलाभ होण्याची शक्यता
आज व्यवसायात उन्नती मिळेल. बुडलेले पैसे परत मिळू शकतात. चल अचल संपत्ती खरेदी करण्याचा विचार करू शकता. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. मित्रांसोबत परदेशी जाण्याचा योग आहे.
मिथुन – अपत्यप्राप्तीमुळे घरात आनंदाचे वातावरण असेल
आज तुमच्या घरात आनंद निर्माण होणार आहे. गोड बातमीमुळे कुटुंबिय खुश होतील. देणी घेणी करताना सावध रहा. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची अचानक भेट होईल. आर्थिक स्थिती चांगली असेल.
कर्क – व्यावसायिक काम अचानक रद्द होण्याची शक्यता
आज आयात निर्यातीच्या व्यवसायात अचानक समस्या येतील. व्यावसायिक कामे अचानक रद्द होण्याची शक्यता आहे. उत्पन्न कमी आणि खर्च अधिक झाल्यामुळे निराश व्हाल. मित्रांची मदत मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील.
सिंह – पैसे परत मिळतील
आज तुम्हाला धनसंपत्तीबाबत चांगली बातमी मिळेल. व्यवसायात नवीन लोकांशी भेट होऊ शकते. मित्रांकडून मौल्यवान भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. नवीन वाहन खरेदी कराल. कुटुंब आणि आरोग्याची काळजी घ्या.
कन्या – नवीन काम सुरू कराल
आज एखादे नवे काम तुम्ही सुरू करू शकता. कामाच्या ठिकाणी तणाव निर्माण होऊ शकता. विरोधक त्रास देण्याची शक्यता आहे. वादविवादांपासून दूर रहा. मित्रांच्या सहकार्यांने उत्पन्नाची साधने वाढतील. देणी-घेणी करताना सावध रहा.
तूळ – आईच्या तब्येतीची काळजी घ्या
आज तुमच्या आईची तब्येत अचानक खराब होऊ शकते. मन निराश आणि असमाधानी राहील. आत्मविश्वास कमी होऊ शकतो. जोडीदाराची भावनिक साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण असेल.
वृश्चिक – विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होतील
विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होतील. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांची साथ मिळेल. कोर्ट कचेरीत यश मिळण्याची शक्यता आहे. आई-वडीलांच्या तब्येतीची काळजी घ्या. रचनात्मक कार्यात प्रगती होण्याची शक्यता आहे.
धनु – कामाच्या ठिकाणी चांगली संधी मिळेल
आज विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी एखादी चांगली संधी मिळू शकते. व्यावसायिक प्रवास लाभदायक असेल. बिघडलेली कामे सहज होतील. रचनात्मक कार्यात प्रगती होण्याची शक्यता आहे.
मकर- पाकीट चोरीला जाण्याची शक्यता
आज तुमचा दिवस आव्हानात्मक असेल. कारण आज कदाचित तुमचे पाकीट चोरीला जाण्याची शक्यता आहे. मेहनत जास्त आणि उत्पन्न कमी असू शकते. कौटुंबिक वातावरण अशांतीचे असेल. कामाच्या ठिकाणी व्यवहारकौशल्यामुळे पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे.
अधिक वाचा
राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव
राशीनुसार जाणून घ्या कोणाला कसली वाटते भीती