मेष – हेल्थ रिपोर्ट चांगला असेल
आज तुम्हाला एखाद्या गंभीर आजारपणाबाबत टेस्ट करावी लागणार आहे. मात्र हेल्थचा रिपोर्ट चांगला आल्याने काळजीचे काही कारण नसेल. जीवनशैलीत चांगले बदल करावे लागतील. घरात आनंदाचे वातावरण असेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष देण्याची गरज आहे. मित्रांशी भेट होऊ शकते.
कुंभ – करिअरसंबंधी समस्या दूर होतील
आज तुम्हाला परिक्षेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. मुलांच्या करिअरविषयी समस्या दूर होतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या नवीन विचारधारेमुळे चांगले बदल होऊ शकतात. तुमच्या विवेकबुद्धीने तुम्ही रखडलेली कामे पूर्ण कराल.
मीन – आर्थिक संकट येण्याची शक्यता
व्यावसायिक तोटा अथवा आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे. कर्ज घेणे टाळा. जागा विकणे कठीण जाईल. देणी-घेणी सांभाळून करा. आईवडीलांची भावनिक साथ मिळेल.
वृषभ – जोडीदारावर संशय घेणे टाळा
आज जोडीदारावर संशय घेणे शक्य असल्यास टाळा. कारण भावनेच्या आहारी जाऊन घेतलेला निर्णय तुम्हाला त्रासदायक ठरू शकतो. व्यावसायिक भागिदारी तुटण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास कमी होईल. रचनात्मक कार्यात मन रमवा.
मिथुन – दगदग करावी लागेल
आज तुमची विनाकारण दगदग होणार आहे. शारीरिक थकवा आणि कमजोरी जाणवेल. कामाच्या ठिकाणी समस्या जाणतील. जोखिमेची कामे करू नका. पैशांबाबत एखादी आनंदवार्ता मिळेल. देणी-घेणी करताना सावध रहा.
कर्क – धनलाभ होण्याची शक्यता
आज तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. व्यवसायात एखादे मोठे काम मिळण्याची शक्यता आहे. नवीन संपत्ती खरेदी करण्याचा विचार कराल. प्रॉपर्टी खरेदी करताना अथवा विकताना सावध रहा. कौटुंबिक वादविवादापासून दूर रहा.
सिंह – कौटुंबिक वातावरण आनंदाचे असेल
आज एखाद्या व्यक्तीच्या येण्याने घरात आनंदाचे वातावरण असेल. कामाच्या ठिकाणी मन लावून काम केल्यामुळे आणि तुमच्या कौशल्यामुळे पदोन्नती होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत असेल. आईच्या आरोग्याची काळजी घ्या.
कन्या – आळस करू नका
आज महत्त्वाची कामे करण्याचा कंटाळा करू नका. आळस करणे टाळा. अधिकारी तुमच्यावर नाराज होऊ शकतात. विद्यार्थ्यांना अधिक मेहनत घ्यावी लागेल. कौटुंबिक समस्यांमुळए निराश व्हाल. देणी-घेणी करताना सावध रहा.
तूळ – जोडीदाराकडून महागडी भेटवस्तू मिळेल
आज तुम्ही नवीन व्यवसायाला सुरूवात करणार आहात. जोडीदाराकडून एखादी महागडी भेटवस्तू मिळू शकते. इंजिनिअर क्षेत्रातील विद्यार्थ्यांना यश मिळेल. जुन्या मित्रांच्या भेटी होतील. व्यवसायानिमित्त प्रवास करावा लागेल. वाहन चालवताना सावध रहा.
वृश्चिक – विद्यार्थ्यांना समस्या जाणवतील
आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी समस्या जाणवणार आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासात अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागेल. व्यावसायिक कामे रद्द होणार आहेत. जोडीदाराची भावनिक साथ मिळेल. मुलांकडून खुशखबर मिळेल.
धनु – मुलांची तब्येत आज खराब होऊ शकते
स्वभावात चिडचिडेपणा जाणवेल. आहाराबाबत सावध रहा. विनाकारण खर्च करू नका. वादविवाद करणे टाळा. धार्मिक कार्यात मन रमेल. जोडीदाराची साथ मिळेल.
मकर- नातेसंबंध सुधारतील
घरातील थोरामोठ्यांच्या सल्लाने आज बिघडलेले नातेसंबंध पुन्हा सुधारणार आहेत. सामाजिक कार्यात यश मिळेल. तुमच्या कामाच्या पद्धतीमुळे अधिकारी खुश होतील. पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. एखादी आनंदवार्ता मिळू शकते.
अधिक वाचा
राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव