ADVERTISEMENT
home / आरोग्य
पावसाळ्यात वाढतात डोळ्यांच्या समस्या, असे करा उपचार

पावसाळ्यात वाढतात डोळ्यांच्या समस्या, असे करा उपचार

पावसाळा हे नेहमीच आजारपणांना आमंत्रण देणारा ऋतू म्हणून ओळखला जातो. अती पाऊस, पूर, हवामानात होणारे बदल, जीवजंतूंना पोषक वातावरण याचा परिणाम आरोग्यावर होताना दिसतो. मात्र जर वेळीच योग्य काळजी घेतली तर निरोगी राहून पावसाचा आनंद घेता येतो. पावसाळ्यात बऱ्याचदा डोळ्यांच्या समस्या जास्त प्रमाणात आढतात. वातावरणात झालेल्या बदलांमुळे व्हायरल इनफेक्शनचा धोका वाढतो. डोळे हा शरीरातील सर्वात नाजूक अवयव असल्यामुळे डोळ्यांचे इनफेक्शन पटकन होण्याची शक्यता असते. या काळात डोळ्यांच्या स्वच्छतेकडे जरा जरी  दुर्लक्ष झाले तर आय इनफेक्शन होऊ शकतं. ज्यामुळे डोळे लाल होणं, डोळ्यांमध्ये खाज येणं, डोळ्यांना सूज येणं अशी लक्षणं जाणवतात. अशा लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास डोळ्यांना गंभीर संक्रमण होण्याची शक्यता असते. यासाठीच या काळात अशी घ्या डोळ्यांची काळजी. ज्यामुळे तुम्ही राहाल निरोगी आणि दृष्टी असेल तेजस्वी

पावसाळ्यात अशी घ्या डोळ्यांची काळजी

डोळ्यांच्या समस्या पावसाळ्यात जास्त प्रमाणात डोकं वर काढतात. यासाठीच जाणून घ्या पावसाळ्यात आय इनफेक्शन टाळण्यासाठी नेमके कोणते उपाय करावे.

  • नियमित डोळे पाण्याने स्वच्छ करा. मात्र लक्षात ठेवा यासाठी हॅंड शॉवर अथवा जोरात पाणी डोळ्यांवर मारू नका. हाताच्या ओंजळीत पाणी घेऊन हलक्या हाताने डोळे धुवा. ज्यामुळे तुमचे डोळे स्वच्छ होतील.
  • पावसाळ्यात होणारे इनफेक्शन टाळण्यासाठी तुमचे सनग्लासेस, टॉवेल, रूमाल कोणासोबत शेअर करू नका. शिवाय तुमचा टॉवेल आणि रूमाल नियमित स्वच्छ करा. 
  • आय मेकअप किटच्या माध्यमातून आय  इनफेक्शन होण्याची शक्यता अधिक असते. यासाठीच या काळात तुमचे ब्युटी प्रॉडक्ट शेअर करू नका आणि इतरांचा आय मेकअप वापरू नका.
  • घराबाहेर जाताना नेहमी डोळ्याचे संरक्षण करणारे सनग्लासेस वापरा. उन्हातच नाही तर वादळवाऱ्यातूनही सनग्लासेस तुमच्या डोळ्यांचे संरक्षण करतात.
  • कॉटॅंक लेंस वापरत असाल तर दिवसातून दोनदा ते व्यवस्थित स्वच्छ करा. लेसेंस लावताना आणि काढताना हात स्वच्छ करा ज्यामुळे डोळ्यांचे इनफेक्शन टाळता येईल. शिवाय शक्य असल्यास या  काळात लेंस वापरणे टाळा. 
  • पावसाळा येण्याआधी अथवा पावसाळ्यात डोळ्यांचे नियमित चेकअप करा. दोन वर्षांतून एकदा डोळे तपासून घेणे गरजेचे आहे. 
  • डोळ्यांना एखादे इनफेक्शन झाल्यास स्वतःच उपाय करणे टाळा. त्याऐवजी आधी तज्ञ्जांचा सल्ला घ्या. 
  • डोळ्यांच्या समस्या असलेल्या लोकांनी अती पाऊस असेल तर घराबाहेर जाणे टाळा. कारण या काळात व्हायरल इनफेक्शन पसरण्याची दाट शक्यता असते.
  • कोणतेही इनफेक्शन टाळण्यासाठी प्रतिकार शक्ती मजबूत असायला हवी. यासाठी या काळात योग्य आहार, व्यायाम आणि पुरेशी झोप घ्या.
  • वर्क फ्रॉम होम अथवा सतत लॅपटॉपवर काम करणाऱ्या लोकांनी एक तासाने कमीत कमी एक ते दोन मिनीटांचा ब्रेक घ्या.

अधिक वाचा –

डोळ्यांमुळे दिसत असेल वाढलेले वय तर आहेत ही कारणे

ADVERTISEMENT

स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स

जाणून घ्या काय आहे म्युकरमायकोसिस

29 Jul 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT