ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
ब्रा स्ट्रिप्स लागत असतील तर तुम्ही करत आहात या चुका

ब्रा स्ट्रिप्स लागत असतील तर तुम्ही करत आहात या चुका

ब्रा या महिलांच्या जीवनाचा अविभाज्य आहे. रोज घातली जाणारी ब्रा ही नेहमीच परफेक्ट असायला हवी. चुकीची ब्रा साईज, कपसाईज या विषयी आपण अनेकदा बोललो आहोत. पण बऱ्याचदा योग्य साईजच्या ब्रा घेऊनही अनेकदा ब्रा स्ट्रिप्स लागतात. तुम्हालाही हा त्रास अनेक ब्राच्या बाबतीत होत असेल तर तुम्ही काहीतरी चुकत आहात. तुम्हाला ब्राच्या स्ट्रिप्स लागण्याचे कारण आणि त्यावर काय उपाय करता येईल ते जाणून घेऊया.

ब्रामध्ये कपसाईजची निवड करणे जाते कठीण, मग वाचा

चुकीच्या पट्ट्यांची निवड

चुकीच्या पट्ट्यांची निवड

Instagram

ADVERTISEMENT

 रोजच्या वापरासाठी आपल्याला नेहमीच कम्फर्टेबल अशा ब्रा हव्या असतात अशावेळी आपण त्यांच्या पट्ट्यांकडे फार लक्ष देत नाही. पण ब्राच्या कप साईजसोबतच पट्ट्यांची निवड महत्वाची असते. कारण ते ब्रा होल्ड करुन ठेवण्यासाठी महत्वाचे असतात. जर एखाद्या कपड्याची तुम्हाला एलर्जी असेल तर अशा कपड्यांमधील ब्राच्या पट्ट्या तुम्ही टाळल्या तरी चालतील. कारण काही जणांना अशा कपड्यामुळेही त्रास होण्याची जास्त शक्यता असते. 

पट्ट्यांची फिटींग

अजूनही काही जणांन ब्राच्या फिटींगसंदर्भात अनेक प्रश्न असतात. त्यांना योग्य फिटिंगची ब्रा कळत नाही. कधीकधी याच चुकीमुळे ब्राचे पट्टे नाहक फारच घट्ट केले जातात. त्यामुळे ब्रा ही योग्य ठिकाणी न राहता पाठीवर येते. मग याच कारणामुळे त्याचे पट्टे  खांद्यावर आणि पाठीवर रुतू लागतात. अशी ब्रा सतत खाली ओढत राहावी लागते. तुम्हालाही असा त्रास होत असेल तर तुम्ही सगळ्यात आधी ब्राचे पट्टे थोडे सैल करा. कारण चुकीच्या साईजची ब्रा निवडल्यानंतर उगीचच बेल्ट घट्ट केले ही हा त्रास होतो. त्यामुळे ब्राचे पट्टे रुतणार नाही आणि त्याचा मागील भाग कंबरेच्या थोडावर येईल इतके सैल असू द्या. 

रात्री झोपताना ब्रा घालणंं योग्य की अयोग्य?

मोठ्या कपसाईजसाठी सल्ला

मोठ्या कपसाईजसाठी सल्ला

ADVERTISEMENT

Instagram

अनेकांना ब्रा या बारीक पट्ट्याच्या हव्या असतात.जर तुमची चण मध्यम आणि तुमच्या स्तनांचा आकार लहान असेल तर तुम्हाला कपसाईज लहान असेल तरी चालू शकते. पण जर तुम्ही कपसाईज फारच मोठी असेल तर तुम्ही बारीक ब्रा चे पट्टे असलेल्या ब्राची निवड अजिबात करु नका. कारण जरी तुम्हाला स्टायलिश आणि बारीक पट्ट्याची ब्रा हवी असली तरी देखील अशा ब्राचे पट्टे स्तनांचा भार घेऊ शकत नाहीत .त्यामुळेच अशा ब्राचे पट्टे तुम्हाला रुतू लागतात. त्यामुळे मोठ्या कपसाईज असणाऱ्यांनी बारीक स्ट्रिप्सचा हट्ट अजिबात करु नये. 

अशी घ्या काळजी

  • एखादी ब्रा जुनी झाली असेल तरी देखील ती आटते. त्यामुळे तिचे पट्टे लागण्याची शक्यता असते. 
  • कोणतीही ब्रा घालताना जर त्याची फिटिंग तुम्हाला चुकीची वाटत असेल तर तुम्ही तुमच्या खांद्यांना आणि पाठीला एखादी टाल्कम पावडर लावा. 
  • जर तुमचे खांदे ब्राच्या पट्टयांमुळे दुखावले गेले असतील तर तुम्ही ब्रा काढून टाकल्यानंतर खांदयाला कैलास जीवन किंवा पेट्रोलिअम जेली लावायला विसरु नका. 
    आता ब्राचे स्ट्रिप्स लागत असतील तर तुम्ही ही काळजी घ्यायाल विसरु नका. 

 जुनी वा घट्ट झालेली Bra टोचत आहे किंवा क्लिपचा होतोय त्रास तर होईल दूर

29 Sep 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT