ADVERTISEMENT
home / Care
केसाला येणारा दुर्गंध दूर करण्यासाठी करा सोपे घरगुती उपाय

केसाला येणारा दुर्गंध दूर करण्यासाठी करा सोपे घरगुती उपाय

उन्हाळा असो अथवा कोणताही ऋतू असो केसांमध्ये घाम तर येतोच. काहींच्या केसात कमी प्रमाणात घाम येतो तर काहींना अति घाम येतो. त्यामुळे केस तेलकट तर होतातच पण  त्याहीपेक्षा अधिक घामामुळे केसातून दुर्गंधी अधिक येते. ही समस्या बऱ्याच जणांना जाणवते. पण तुमची यातून घरगुती उपाय करून नक्कीच सुटका होऊ शकते. बऱ्याचदा कितीही प्रयत्न केला तरीही केसातून घामाची दुर्गंधी येतेच. मग अशावेळी नक्की काय करायचं आणि कोणते घरगुती उपाय वापरायचे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हे उपाय अतिशय सोपे असून तुम्ही घरच्या वस्तूंंचा वापर करू शकता. त्यासाठी तुम्हाला कोणत्याही बाहेरच्या वेगळ्या वस्तू आणण्याची गरज भासणार नाही. जाणून घ्या कोणत्या गोष्टींमुळे तुम्ही हा केसाला येणारा दुर्गंध दूर करू शकता. 

मध आणि दालचिनी पावडर

Shutterstock

प्रत्येकाच्या घरी मध आणि दालचिनी पावडर असते. पावडर नसली तर तुम्ही दालिचीनीची पावडर तयार करूनही घेऊ शकता. केस धुण्यापूर्वी अर्धा तास आधी तुम्ही मध आणि दालचिनी पावडर मिक्स करून मिश्रण तयार करून घ्या. हे मिश्रण केसांना लावा. त्यानंतर अर्ध्या ते एक तासाने केस धुवा. यामुळे केसातील घामाची दुर्गंधी निघून जाण्यास मदत होते

ADVERTISEMENT

अॅप्पल साईड व्हिनेगर

Shutterstock

पाण्यामध्ये थोडे अॅप्पल साईड व्हिनेगर घालून नीट मिक्स करा. हे  मिश्रण केसांना लावा. थोड्या वेळानंतर थंड पाण्याने केस धुवा. यामुळे केसातील दुर्गंधी तर निघून जातेच त्याशिवाय केस अधिक सुंदर आणि चमकदार दिसू लागतात. 

कढीपत्त्याचा हेअर मास्क तयार करून मिळवा सुंदर केस

ADVERTISEMENT

गुलाबपाणी

Shutterstock

ज्या पाण्याने तुम्ही केस धुणार आहात त्या पाण्यामध्ये तुम्ही गुलाबपाणी मिक्स करून घ्या. यामुळे तुमच्या केसांमधील दुर्गंधी दूर होईल आणि तुमच्या केसांना सुंदर वास येईल. गुलाबपाणी हे एखाद्या टोनरप्रमाणे काम करते. त्यामुळे त्वचा असो वा केस त्याचा तुम्हाला चांगलाच फायदा मिळतो. 

केस घनदाट दिसण्यासाठी वापरा 7 सोप्या टिप्स

ADVERTISEMENT

व्हिनेगर

Shutterstock

केसांमधून येणाऱ्या दुर्गंधीने तुम्ही त्रस्त झालात तर तुमच्या घरातील व्हिनेगरचा तुम्ही वापर करू शकता. व्हिनेगर पाण्यात घालून तुम्ही केस धुवा. यामुळे केसांमध्ये दुर्गंधी निर्माण करणारे तत्व नष्ट होते आणि केसांमधून दुर्गंधी येत नाही.  तर केसही चमकदार होतात. 

केसांना मजबूती देण्यासाठी वापरा हे हेअर ऑईल्स

ADVERTISEMENT

बेकिंग पावडर

Shutterstock

एक भाग बेकिंग पावडर आणि तीन भाग पाणी असे वाटीत घेऊन त्याची पेस्ट करून घ्या. ही पेस्ट तुम्ही तुमच्या स्काल्पवर लावा. काही वेळानंतर केस थंड पाण्याने धुवा. यामुळे तुमच्या केसातील येणारा दुर्गंध हा निघून जातो आणि केस मऊ मुलायम होतात. 

घरगुती उपायांनी मिळवा सुंदर केस

ADVERTISEMENT

कडूलिंबाच्या पानाचे तेल

Shutterstock

कडूलिंबाचे तेल हा तर केसांच्या दुर्गंधीवर अप्रतिम उपाय आहे. यामुळे केसांमधील दुर्गंधीच नाही तर स्काल्पवर असणारे इन्फेक्शन आणि कोंडा या दोन्ही गोष्टी निघून जाण्यास मदत होते. कडूलिंबाच्या पानांमध्ये औषधी तत्व असल्याने केसांवर त्याचा खूपच चांगला परिणाम होतो. तसेच हे त्वचेसाठीही अधिक फायदेशीर ठरून केस अधिक मजबूत होण्यास मदत मिळते. दुसरी पद्धत म्हणजे तुम्ही कडूलिंबाची पाने नीट पाण्यात उकळून घ्या. पाणी थंड झाल्यावर याने केस धुवा. असं नियमित केल्यानेही केसांमधून दुर्गंध येणार नाही. 

कडूलिंबाचे फायदे आणि औषधीय गुण ऐकून तुम्हीही व्हाल चकीत! (Benefits Of Neem In Marathi)

ADVERTISEMENT

कोरफड जेल

Shutterstock

केस धुण्यापूर्वी काही वेळ आधी किमान अर्धा तास आधी तरी स्काल्प  आणि केसांना ताजे कोरफड जेल लावा आणि व्यवस्थित मसाज करा. नियमित तुम्ही याचा वापर केसांवर केल्यास, दुर्गंधी दूर होते आणि केस अधिक मुलायम बनण्यासाठी तुम्हाला याचा फायदा करून घेता येतो. 

07 Jul 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT