ADVERTISEMENT
home / Fitness
अंडरआर्म्स बल्ज (Underarms Bulge) पासून मिळवा सुटका

अंडरआर्म्स बल्ज (Underarms Bulge) पासून मिळवा सुटका

तुम्हाला बऱ्याचदा स्लीव्हलेस घालण्याची भीती वाटते का? त्याचं कारण अंडरआर्म्स आहे का? अंडरआर्म्समधील फक्त केसच नाही तर अंडरआर्म्स बल्ज (underarm bulge) हेदेखील एक कारण असू शकतं. अर्थात याचा अर्थ नक्की काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो याचा नक्की अर्थ काय. तुमच्या काखेखाली जमलेली चरबी अर्थात underarm bulge, ज्यामुळे तुम्हाला स्लीव्हलेस कपडे घालण्याचीही लाज वाटते. पण आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुमचे underarm bulge कमी होण्यासाठी मदत होईल.

1. वेट लिफ्ट करा

weight lifting

तुम्ही हे मान्य करा अथवा करू नका पण Weight-Lifting तुमच्या armpits साठी खूपच चांगला पर्याय आहे. वेट लिफ्टिंग केल्यामुळे तुमची काख व्यवस्थित टोन्ड होऊ लागते आणि त्याशिवाय तुमचे खांदेदेखील योग्य एका रेषेत राहतात.

कसं करावं वेटलिफ्टिंग?

ADVERTISEMENT

स्टेप 1 – जमिनीवर चटई अंथरा आणि त्यावर झोपा

स्टेप 2 – आता तुम्ही जितक्या वजनाचे डंबल्स उचलू शकता, अर्थात तुम्ही त्यामध्ये कम्फर्टेबल असणं गरजेचं आहे त्यानुसार डंबेल्स उचला आणि सीलिंकच्या दिशेने वर उचला.

स्टेप 3 – आता पाच पर्यंत अंक मोजून दोन्ही हात खाली घेऊन या. लक्षात ठेवा की, तुमचे हात हे जमिनीपासून साधारण 2 इंच वरच राहायला हवेत.

स्टेप 4 – आता पुन्हा 5 अंक मोजून हात वरच्या बाजूने घ्या

ADVERTISEMENT

स्टेप 5 – आता हातातील डंबल्स आपल्या छातीच्या बाजूला घ्या

हा तुमच्या व्यायामाचा एक सेट पूर्ण झाला. अशा तऱ्हेनेच साधारण किमान दहा वेळा तरी हा सेट पूर्ण करा.

काखेत घामाचा वास का येतो त्याची कारणे (Causes Of Underarm Smell In Marathi)

2. पुश अप्स करून पाहा

push ups

ADVERTISEMENT

तुम्ही जर कधी जिममध्ये गेला असाल अथवा जात आहात तर तुमच्या जिम ट्रेनरने नक्कीच तुम्हाला पुशअप्सबद्दल सांगितलं असेल. पुशअप्स तुमच्या काखेतील चरबी घालवण्यास मदत करतं. त्यामुळे हा तुमच्यासाठी खूपच चांगला पर्याय आहे.

कसं करावं पुशअप्स?

स्टेप 1 – चटईवर नीट झोपा. तुमचा चेहरा जमिनीच्या बाजूला ठेवा

स्टेप 2 – आता तुमचे दोन्ही पाय जवळ आणा आणि तुमचे हात समान तऱ्हेने जमिनीवर टेकवा. तुमच्या हाताचे तळवे हे जमिनीच्या बाजूने असावेत.

ADVERTISEMENT

स्टेप 3 – तुमचे हात वर उचलून शरीर वर घ्या आणि तुमच्या हाताचा कोपरा मागे यायला हवा. पुन्हा हात सरळ करा

स्टेप 4 – असं तुम्हाला झेपेपर्यंत करा.

सुरुवातीला दिवसातून दहा पुशअप्स मारा. सवय झाल्यावर पुशअप्स वाढवा. याचा underarm bulge कमी करण्यासाठी खूपच चांगला उपयोग होतो.

3. दोरी उड्या

skipping rope

ADVERTISEMENT

दोरी उड्या मारणं हे काही फक्त लहान मुलांसाठी नाही. तर तुमच्या शरीरातील चरबी कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. सर्वात जास्त याचा उपयोग होतो तो underarm bulge कमी करण्यासाठी. कारण दोरी उद्या मारताना हाताचा व्यायाम जास्त होत असतो.

कसा करावा दोरी उड्या व्यायाम?

स्टेप 1 – आपल्या दोन्ही हाताने दोरी पकडा

स्टेप 2 – आता दोन्ही हातातील दोरी फिरवत दोन्ही पाय उचलून उड्या मारायला सुरुवात करा

ADVERTISEMENT

स्टेप 3 – हळूहळू तुमचा हात थोडा लांब लांब न्या आणि मग उड्या मारा

रोज किमान 200 दोरीच्या उड्या मारल्यास तुमच्या हाताचा आणि काखेचाही चांगला व्यायाय होतो आणि काखेतील चरबी कमी होण्यास मदत होते.

4. Chair dips देखील ट्राय करा

chair dips

हा व्यायाम करण्यासाठी तुम्हाला अजिबात जिममध्ये जायची गरज नाही. तुम्ही घरीच एक खुर्ची घेऊन त्याच्या मदतीने हा व्यायाम करू शकता. यामुळे तुमच्या शरीरातील चरबीदेखील कमी होईल आणि त्याशिवाय underarm bulge देखील कमी होतील.

ADVERTISEMENT

कसं करावं चेअर डिप्स?

स्टेप 1 – जमिनीपासून 2-3 फूट उंच असणारी खुर्ची घ्या

स्टेप 2 – खुर्चीकडे तुमची पाठ करा आणि खुर्चीच्या सीटवर तुमचा हात ठेवा

स्टेप 3 – तुमचे खांदे अधिक रुंद करा आणि खुर्चीच्या 2-3 steps पुढे या

ADVERTISEMENT

स्टेप 4 – तुमचे हात फोल्ड करून खाली बसण्याचा प्रयत्न करा

स्टेप 5 – पुन्हा तुमच्या पहिल्या पोझिशनवर या आणि असंच सतत रिपीट करा

हा व्यायाम केल्यामुळे तुमच्या काखेखालीलच नाही तर तुमच्या पोटावरील चरबीदेखील कमी होईल.

5. Arm Circles मध्ये जास्त दम

arm circles

ADVERTISEMENT

हा व्यायाम अतिशय सोपा आणि तितकाच परिणामकारही आहे. तुमच्या हाताबरोबरच तुमचे खांदे, दंड आणि बॅक मसल्सदेखील चांगले टोन्ड होतात.

कसा करावा व्यायाम?

स्टेप 1 – आपल्या पायात अंतर ठेऊन उभे राहा

स्टेप 2 – आपले खांदे सरळ करा आणि दोन्ही हात दोन्ही बाजूला पसरवा

ADVERTISEMENT

स्टेप 3 – आता पुन्हा पुढच्या बाजूला तुमचे हात 50-60 वेळा स्ट्रेच करा

स्टेप 4 – अशाच तऱ्हेने तुमचे हात मागच्या बाजूला वळवा

या व्यायामामुळे तुमचे हात आणि हाताखालील चरबी कमी होण्यास मदत होते.

6. Exercise ball ने खेळा

exercise balls

ADVERTISEMENT

Exercise balls हे तुमच्या abdominal part, arms आणि back portion ला आकार मिळवून देतात. फक्त तुम्हाला दिवसातून 20 मिनिट्स व्यायाम करायचा आहे आणि तुमचं काम होईल.

कसा करावा बॉल्सचा खेळ?

स्टेप 1 – चटईवर गुडघ्यावर बसा. तुमची हाताची मूठ बंद करून exercise ball वर ठेवा

स्टेप 2 – आता मूठीच्या सहाय्याने आपलं शरीर मागे आणि पुढे करा

ADVERTISEMENT

स्टेप 3 – हा व्यायाम तुम्ही 3 सेटमध्ये करा आणि प्रत्येक सेटनंतर किमान 1 मिनिटांचा ब्रेक घ्या

फोटो सौजन्य – Shutterstock

हेदेखील वाचा 

अंडरआर्म्स काळवंडलेत? मग रोजच्या रोज अशी घ्या काळजी

ADVERTISEMENT

अंडरआर्म्स स्वच्छ ठेवण्यासाठी वॅक्सिंग आणि शेव्हिंग क्रीमपैकी कोणता प्रकार योग्य, जाणून घ्या

#DIY: अंडरआर्म्सचा काळेपणा कमी करण्यासाठी झटपट घरगुती उपाय

07 May 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT