ADVERTISEMENT
home / Care
How to make lip balm with coconut oil at home

नारळाच्या तेलापासून असं बनवा घरीच लिपबाम

वातावरणात थंडावा वाढला ती ओठ कोरडे होतात. कधी कधी डिहाड्रेशनमुळेही ओठ कोरडे होतात अथवा फुटून त्यातून रक्त येतं. अशा वेळी जवळ लिप बाम असेल तर तुम्ही सतत ओठ हायड्रेट ठेवू शकता.आजकाल बाजारात यासाठी विविध रंग, फ्लेवरचे लिपबाम मिळतात. पण असे महागडे लिपबाम नको असतील अथवा तुम्ही ऑर्गेनिक वस्तू वापरत असाल तर तुम्ही तुमचा लिप बाम स्वतःच घरी बनवू शकता. तुमच्या घरी असलेल्या नारळाच्या तेलापासून तुम्ही लिप बाम बनवू शकता. जाणून घ्या लिपबाम बनवण्यासाठी लागणारं साहित्य, पद्धत आणि या लिपबामचे फायदे… त्याचप्रमाणे वाचा लिप बामचा ओठांप्रमाणेच आणखी असाही करा वापर

नारळाच्या तेलापासून बनवा लिप बाम

नारळाच्या तेलापासून तुम्ही दोन प्रकारे लिपबाम बनवू शकता. यासाठी य टिप्स करा फॉलो

लिप बाम  १

साहित्य –

ADVERTISEMENT

एक चमचा नारळाचे तेल

अर्धा चमचा बीटचा रस

एक चमचा इतर कोणतेही इसेंशिअल ऑईल ( ऑलिव्ह ऑईल, बदामाचे तेल, लव्हेंडर ऑईल)

एक चमचा पेट्रोलिअम जेली

ADVERTISEMENT

पद्धत –

लिप बाम बनवण्याची पद्धत अगदी साधी आणि सोपी आहे सर्व घटक एकत्र करा आणि थोडं कोमट करून एखाद्या डबीत भरून ठेवा. लगेच वापरण्यासाठी तुम्गी ते फ्रीजमध्ये थंड करू शकता. अथवा थोडावेळ तसंच ठेवा काही वेळाने ते लिप बाम प्रमाणे घट्ट होईल. तुमचे गुलाबी जांभळट रंगाचे लिप बाम घरच्या घरी तयार होईल.

लिप बाम २

साहित्य – 

ADVERTISEMENT

दोन चमचे नारळाचे तेल

एक चमचा कोको बटर

पद्धत –

लिप बाम तयार करण्यासाठी दोन्ही घटक गरम करा आणि एका छोट्या डबीत भरून नियमित वापर करा.

ADVERTISEMENT

यासोबतच जाणून घ्या सर्वात सोप्या पद्धतीने कसे बनवावे होममेड शिमर लिप बाम

लिपबाम लावणं का आहे गरजेचं

ओठ कोरडे पडणं अथवा फुटणं ही एक सामान्य समस्या आहे. थंडीच्या दिवसांमध्ये अथवा वातावरणात बदल झाल्यास तुमच्या ओठांवर याचा लगेच परिणाम होतो.  कारण चेहऱ्यावरील इतर त्वचेपेक्षा ओठ जास्त नाजूक आणि मऊ असतात. यासाठीच लिप केअर करणं अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. डेली स्किन केअर रुटीनमध्ये लिपबामचा समावेश करायलाच हवा.मात्र बाजारात यासाठी तुम्हाला विविध प्रकारचे लिप बाम मिळतात. यातील कोणता लिपबाम वापरावा अथवा त्याचा तुमच्या त्वचेवर काय परिणाम होईल याबाबत शंका असेल तर स्वतःच घरच्या घरी नारळाच्या तेलाचा वापर करून हे दोन लिपबाम बनवा. कारण नारळाचे तेल त्वचा मऊ ठेवण्यासाठी आणि त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी खूपच फायदेशीर आहे. घरीच करा लिप स्पा, फॉलो करा या सोप्या टिप्स

30 Sep 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT