ADVERTISEMENT
home / आरोग्य
वृद्धापकाळातील काळजी

वृद्धापकाळात होणाऱ्या घरगुती अपघातांपासून स्वतःला कसे वाचवाल

एखादी व्यक्ती जेव्हा वृद्धत्वाकडे झुकते तेव्हा तिच्या चालण्या-फिरण्याविषयीच्या चिंता कुटुंबियांना भेडसावू लागतात. ज्येष्ठ नागरिकांमध्ये आढळून येणाऱ्या तब्येतीच्यी तक्रारींमध्ये पडल्याने किंवा घसरून होणारे अपघात ही प्रमुख समस्या असते. उतारवयात होणाऱ्या घरगुती दुर्घटना ज्यांना ‘डोमेस्टीक फॉल्स’ असेही म्हटले जाते. या वयोगटात होणाऱ्या दुखापतींमागचे ते मुख्य कारण ठरत आहे. वारंवार पडल्याने होणाऱ्या या अपघातामुळे अनेक वयोवृद्धांना अपंगत्वाचा सामना करावा लागतो. परिणाम या अपघातात अनेकांना प्राण गमवावा लागतो.  

भारत हा लोकसंख्येनुसार जगातील दुस-या क्रमांकाचा देश आहे. या लोकसंख्येत साठ वर्षे वयापेक्षा जास्त वय असलेल्या लोकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. भारतात सध्या आठ कोटींपेक्षा जास्त लोक हे साठ पेक्षा अधिक वयाचे आहे. याबाबत आम्ही अधिक जाणून घेतले डॉ. अनुप गाडेकर , जॉंईट रिप्लेसमेंट सर्जन, लोकमान्य रूग्णालय पुणे यांच्याकडून. 

अधिक वाचा – आठवड्यातून केवळ दोन वेळा वापरा अँटिएजिंग फेसमास्क, म्हातारपण ठेवा दूर

विशेष काळजी घेणे महत्त्वाचे

वयाची साठी ओलांडली की, विविध आजार शरीराला ग्रासत असतात.  साठीनंतर शारीरिक, मानसिक क्षमता कमी होतात आणि मेंदूचे काम हळूहळू कमी होते. त्यामुळे अनेक वृद्ध लोकांना मानसिक आजाराचा त्रास असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय उच्च रक्तदाब, मधुमेह, स्नायूंचे आजार, मणक्याचा त्रास आणि डोळ्यांचे विकार हे उतारवयात जाणवत आहेत. सध्या आधुनिक वैद्यकीय उपचार पद्धतीमुळे आज माणसाचं आयुष्यमान वाढलं आहे. मात्र त्यामुळे प्रत्येकाला म्हातारपण टळणार आहे, असं नाही तर ते येणारच आहे. म्हणून उतारवयात स्वतः आरोग्याची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.

ADVERTISEMENT

अधिक वाचा – प्रदूषणामुळे तुम्ही दिसू शकता वयाआधीच म्हातारे

घरगुती दुर्घटना होण्यामागची कारणे –

–    वाढत्या वयामुळे स्नायुंना येणारा कमकुवतपणा
–    चालताना तोल जाणे
–    वयोमानानुसार आकलनशक्ती कमी होणे
–    प्रदीर्घ आजार व त्यामुळे होणारे शारीरीक बदल उदा. संधीवात, पार्किन्सस, अल्झायमर
–    दृष्टी व ऐकण्याची क्षमता कमी होणे

भौगोलिक परिस्थिती जसे की

ADVERTISEMENT

–    अपुरा प्रकाश
–    घरात अस्ताव्यस्त पडलेले सामान
–    लुज कार्पेट्स
–    निसरड्या जागा अथवा जमिनी
–    सुरक्षित साधनांचा अभाव
–    झोपेच्या व इतर गुंगी आणणाऱ्या औषधांचा वापर

घरगुती दुर्घटनांमुळे कोणत्या प्रकारची दुखापत होऊ शकते

–    खुब्याच्या हाडाचे फ्रॅक्चर
–    मनगटाच्या हाडाचे फ्रॅक्चर
–    मणक्याच्या हाडाचे फ्रॅक्चर
–    घोट्याजवळील हाडाचे फ्रॅक्चर

 घरगुती अपघात टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी

–    न घसरणाऱ्या चप्पल अथवा बुटांचा वापर करणे
–    घरात पुरेसा प्रकाश असावा. झोपायची खोली, बाथरुम, जिना, हॉल येथे नाईट लॅम्प असावेत
–    कार्पेटला जमिनीला फिक्स करणे
–    बाथरुम व संडास येथे हात पकडण्यासाठी बार असावेत
–    जिन्याच्या दोन्ही बाजूंना आधार घेण्यासाठी रेलींग असावेत
–    वृद्ध लोकांनी शिडीवर चढणे अथवा स्टुलवर चढणे टाळावे
–    घरातील निसरड्या जागांची नियमितपणे साफसफाई करणे
–    कान व डोळे यांची नियमितपणे वैद्यकीय तपासणी करणे
–    नियमित व्यायाम करणे,  ऑस्टिओपोरेसिस,  संधिवात सारख्या आजारावर योग्य उपचार करणे.

ADVERTISEMENT

तुमच्याही घरामध्ये जर वृद्ध व्यक्ती असतील तर त्यांना नक्की या गोष्टी वाचायला द्या आणि त्यांची तुम्हीही काळजी घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करा.

अधिक वाचा – वाढतं वय लपवायचंय तर नक्की वाचा या अँटीएजिंग टीप्स

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

31 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT