Advertisement

लाईफस्टाईल

वजन कमी करायचं असेल तर बदला झोपण्याची पद्धत

Dipali NaphadeDipali Naphade  |  Apr 18, 2019
वजन कमी करायचं असेल तर बदला झोपण्याची पद्धत

Advertisement

आजच्या जीवनशैलीत बऱ्याच लोकांना वजन वाढण्याची समस्य आहे. वजन वाढताना तर पटापट वाढतं पण कमी करताना मात्र बरंच काही सहन करावं लागतं. वजन कमी करण्यासाठी बरेच प्रयत्न केले जातात. पण त्याचा फायदा होतोच असं नाही. पण आम्ही तुम्हाला झोपता – झोपता वजन कमी करण्याच्या टीप्स देणार आहोत. वाटलं ना हे वाचून तुम्हाला आश्चर्य? तुम्ही योग्यच वाचलं आहे. अशा काही गोष्टी ज्या तुम्ही झोपताना फॉलो केल्यात तर तुम्ही कोणत्याही ताण, व्यायाम आणि डाएटिंगशिवाय तुमचं वजन आटोक्यात आणू शकता. त्यामुळे पाहूया आता झोपताना अशा कोणत्या गोष्टी फॉलो करायला हव्यात, ज्यामुळे तुम्ही वजन कमी करू शकता. तुम्ही या टीप्स रोज न चुकता फॉलो केल्यात तर, तुमचं वजन कमी होत जाईल. जाणून घेऊया काय आहेत या टीप्स –

योग्य पोझिशनमध्ये झोपा

sleep position

तसं तर रात्री झोपेत आपण कशा प्रकारे झोपतो हे आपल्याला माहीत नसतं. पण तुम्ही जेव्हा झोपायला तुमच्या बेडवर जाल तेव्हा स्लिपिंग पोझिशनमध्ये झोपायचं प्रयत्न करा. म्हणजे वजन घटवण्यासाठी तुम्ही पाठीवर झोपा. ते तुमच्यासाठी योग्य आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा तुम्ही जास्त वेळ तुमचं शरीर बेढत आणि अयोग्य तऱ्हेने झोपेत ठेवलंत तर तुमच्या शरीराचा आकार त्याप्रमाणेच होतो. कारण तुम्ही जेव्हा झोपता तेव्हा तुमच्या शरीराचा विकास होतो. त्यामुळे कधीही पाय पोटात घेऊन किंवा आखडून झोपू नये.

Also Read About झोपेची उत्तम स्थिती

तुमची खोली नेहमी थंड ठेवा

रात्री झोपताना तुमची खोली नेहमी थंड ठेवण्याचा प्रयत्न करा. एका रिसर्चच्या नुसार, रात्री झोपताना खोलीचं तापमान थंड असल्यास, शरीराची उष्णता राखण्यासाठी मदत होते. त्यामुळे तुमच्या शरीरातील फॅट बर्न होण्यास मदत होते.

काळोखात झोपा

night sleep

तुम्ही काळोखात झोपल्यास, वजन कमी होण्यास मदत होते. कदाचित हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल पण हे खरं आहे. ओहियो स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधनामध्ये सिद्ध झालं आहे की, काळोखात झोपल्यामुळे शरीरामध्ये हलकेपणा येतो आणि तुमचं वजन कमी होण्यास मदत होते. वास्तविक जेव्हा आपण झोपतो तेव्हा मोलटोनिन हार्मोन आपल्या शरीरात मेलाटोनिन हार्मोन बनवत असतो. ज्यामुळे कॅलरी बर्न होण्यास मदत होते. काळोखात आपलं शरीर जास्त प्रमाणात मेलटोनिन उत्पन्न करत असतं. त्यामुळे तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर पूर्ण अंधारात झोपा.

पूर्ण झोप घ्या

तुम्हाला खरंच वजन कमी करण्याची इच्छा असेल तर तुम्हाला भरपूर झोप घ्यायला हवी. प्रत्येक माणसाला दिवसभरात किमान 7 ते 8 तास झोप गरजेची असते. कारण यावेळी तुमच्या शरीराचा सर्व थकवा आणि ताण निघून जात असतो. खास गोष्ट हीदेखील आहे की, वजन घटवण्याच्या प्रक्रियेत झोप ही महत्त्वाची भूमिका निभावत असते. तुमच्या भूकेचे हार्मोनदेखील स्थिर करते. त्यामुळे तुमची भूक नियंत्रणामध्ये राहते आणि वजन कमी होण्यास मदत होते.

रात्री उशीरापर्यंत जागणं सोडून द्या

पूर्वीचे लोक रात्रीचं जेवण 8 वाजता जेऊन 9 पर्यंत झोपत होते. मात्र आजकाल लाईफस्टाईल बदलली आहे. बरेच लोक हे रात्री 11 ते 12 वाजेपर्यंत मोबाईल आणि टीव्हीच्या समोर असतात. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, रात्री उशीरापर्यंत मोबाईल आणि टीव्ही बघितल्यामुळे शरीरातील मेलाटोनिन हार्मोनमुळे ब्लड सर्क्युलेशन कमी होतं. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये असलेल्या खाण्याचे फॅट बनण्यास अर्थात चरबी जमा होण्यास सुरुवात होते आणि वजन जास्त प्रमाणात वाढू लागतं. प्रयत्न करा की, रात्री मोबाईल आणि टीव्हीपासून तुम्ही स्वतःला दूर ठेवाल आणि स्वतःसाठी शांततेचे आणि महत्त्वाचे क्षण ठेवाल. कोणत्याही तणावाशिवाय तुम्ही यामुळे व्यवस्थित झोप घेऊ शकता.

पुदीनादेखील आहे लाभदायी

एका रिसर्चमध्ये सांगितल्यानुसार, तुम्ही झोपण्यापूर्वी आपल्या खोलीमध्ये मिंट अर्थात पुदीन्याचा सुगंध ठेवल्यास, वजन कमी होण्यास मदत होते. यासाठी तुम्हाला फक्त इतकंच करायचं आहे की, झोपण्यापूर्वी तुमच्या गादीवर अथवा तुमच्या उशीखाली मिंट स्प्रे तुम्ही मारा.

फोटो सौजन्य – Shutterstock

हेदेखील वाचा

शांत झोप येण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

कपड्यांशिवाय झोपायला आवडत असेल तर माहीत हव्यात 7 गोष्टी

तुम्हालाही होतोय का अपुऱ्या झोपेचा त्रास