हेअर क्लचर किंवा हेअर क्लिप हे आपल्या सगळ्यांकडे असतात. पण अनेकांना आजही त्यांच्या केसांसाठी कोणता हेअर क्लिप लावावा हा प्रश्न पडतो. अनेकदा चांगले ड्रेसअप करुनसुद्धा केवळ केसांच्या चुकीच्या क्लचरमुळे तुमचा केलेला सगळा लुक वाया जातो. जर केसांचे कोणते क्लचर निवडायचे हे तुम्हाला कळत नसेल तर आज हेअर क्लचरचे काही पॅटर्न आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. हे पॅटर्न तुम्ही कशावर घालू शकता हे देखील सांगणार आहोत. चला करुया सुरुवात
हेअर ड्रायर खरेदी करताना लक्षात ठेवा या गोष्टी
स्लिक हेअर क्लचर
हा प्रकार तुम्हाला अगदी कोणत्याही स्टोअरमध्ये मिळू शकतो. हा हेअर क्लिप आकाराने चपटा असल्यामुळे तो केसांना लावल्यानंतरही फार दिसून येत नाही. या क्लचरमध्ये तुम्हाला वेगवेगळे आकार मिळतात. अगदी मिनी क्लचर पासून ते पूर्ण केसांना होईल असा हा क्लिप असतो. पण हे क्लचर केसांचा काही भाग घेऊन लावल्यास अधिक चांगला दिसतो. संपूर्ण केस बांधण्यासाठी हा क्लचर नाही.
जीन्सपासून ते पंजाबी ड्रेसपर्यंत हे क्लचर चांगले दिसतात. फक्त ते नीट लावता यायला हवेत.
केसगळती थांबवण्यासाठी उत्तम हेअर कंडिशनर (Best Anti Hair Fall Conditioner)
हेअर क्लॉ क्लचर
गोलाकार आकारामध्ये असलेले हे क्लचरही अनेकांकडे असेल. हे क्लचरही केसांचा क्राऊन भागाकडील केस घेऊन लावण्यासारखा आहे. यामध्येही तुम्हाल लहान-मोठे आकार मिळतात. हेअर क्लचर तुम्हाला एखाद्या ट्रेडिशनल वेअरवर घालण्यास हरकत नाही. गोलाकार असल्यामुळे तुम्ही ज्यावेळी क्लचर लावता त्यावेळी त्याचा आकार मागून गोल दिसतो. असे क्लचर वेस्टर्न आऊटफिटवर मुळीच चांगले दिसत नाहीत.
कुडती किंवा जीन्सवरील शॉर्ट कुडतीज घातल्यावर तुम्ही हे क्लचर लावू शकता.
स्पापेक्षाही अधिक फायदेशीर आहे पावरडोस ट्रिटमेंट
बनाना हेअर क्लचर
बनाना क्लिप म्हणून प्रसिद्ध असलेला हा प्रकार नाही.हा प्रकार क्लचर प्रमाणे असतो. ज्यांना केसपूर्ण बांधायाची इच्छा असेल आणि त्यांना रबरचा उपयोग न करता क्लचर हवा असेल तर असे क्लचर केसांना चांगले दिसतात. यामध्ये तुम्हाला गोलाकार किंवा चौकोनी असा आकार मिळतो. तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याची निवड करु शकता.
बनाना हेअर क्लचर हे तसे कशावरही लावता येतात. पण पूर्णपणे वेस्टर्न लुक असलेल्या कपड्यांवर हे घालू नका. कारण ते इतके उठून दिसत नाहीत.
मेटल हेअर क्लचर
मेटलमध्ये वेगवेगळे क्लचर मिळतात. पण हा प्रकार सध्या ट्रेंडमध्ये आहे. मेटालिक क्लचरमध्ये वेगवेगळे आकार आणि साईज मिळतात. हे क्लचर पूर्ण केसांपेक्षा अर्धवट केसांना चांगले दिसते. यामधील वेगवेगळे आकार तुम्हाला तुमच्या कपड्यांनुसार निवडता येतात..
मेटल हेअर क्लचरमधील वेगवेगळे प्रकार निवडत तुम्ही इंडो-वेस्टर्न किंवा कोणत्याही कपड्यांवर घालू शकता.
क्लचरच्या बाबतीत करु नका या चुका
क्लचरचे काही पॅटर्न पाहिल्यानंतर योग्य कपड्यांनुसार त्याची निवड करा. कोणताही क्लिप कोणत्याही कपड्यांवर घालू नका.
- जर तुम्ही मॅचिंग क्लचर लावायला आवडत असेल तर मॅचिंग क्लिप लावा. पण असे कलरफुल क्लिप तुम्ही कोणत्याही कपड्यावर लावू नका.
- रंगीबेरंगी क्लिपऐवजी तुम्ही तुमच्यासाठी प्लेन किंवा पारदर्शक रंगाचे क्लचर वापरा.यामध्ये तुम्हाला निळा, काळा, करडा असे छान रंग मिळतात. त्यामुळे तुम्ही त्याचा उपयोग करु शकता.
आता क्लचर निवडताना या काही गोष्टींची नक्की काळजी घ्या