ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
केसांना सिल्की बनवण्यासाठी आणि स्टाईलिंगसाठी वापरा हेअर सीरम (Hair Serum To Get Silky Hair)

केसांना सिल्की बनवण्यासाठी आणि स्टाईलिंगसाठी वापरा हेअर सीरम (Hair Serum To Get Silky Hair)

टीव्हीवर तुम्ही नेहमी जाहिराती पाहिल्या असतील, ज्यामध्ये कोरड्या केसांना सिल्की आणि चमकदार, सुंदर करण्यासाठी काही गोष्टी वापरल्या जातात. ज्याला सीरम म्हटलं जातं. आजकाल धावपळीच्या जीवनशैलीत अशी उत्पादनं आपल्याला बरीच आकर्षित करतात. त्यामुळे आपल्यालाही आपले केस असेच सुंदर दिसावे असं वाटत असतं आणि ते साहजिकच आहे. वास्तविक ही जादू नाही तर ही सीरमची कमाल आहे. शँपू केल्यानंतर मुलायम आणि सिल्की केस हवे असतील तर तुम्ही केसांना सिरम लावायला हवं. केसांची स्टाईल करण्यापूर्वी केसांचं संरक्षण करणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे त्यासाठी तुम्ही हेअर सीरमचा वापर केल्यास, जास्त चांगला फरक जाणवतो. संपूर्ण दिवस तुमचे केस अतिशय चमकदार आणि सुंदर दिसतात. केसांची स्टाईल करण्यासाठी तसंच केस सुंदर दिसण्यासाठी हेअर सीरमची खूपच मदत होते. पण केसांवर हेअर सीरम लावण्यापूर्वी हे जाणून घेणं गरजेचं आहे की, हेअर सीरम नक्की काय आहे आणि याचा उपयोग कशा तऱ्हेने करायला हवा? आम्ही तुम्हाला याविषयीच सांगणार आहोत.

Table of Contents

  1. जाणून घ्या काय आहे हेअर सीरम – What Is Hair Serum?
  2. हेअर सीरमचे फायदे – Hair Serum Benefits In Marathi
  3. फ्रिजी केसांना बनवतं मुलायम आणि सिल्की
  4. हेअर स्टायलिंग करा सोपी
  5. केसांना बनवतं मजबूत
  6. योग्य हेअर सीरमची निवड कशी करावी – Best Hair Serum In Marathi
  7. केसांवर हेअर सीरम लावण्याची पद्धत – How To Use Hair Serum In Marathi
  8. हेअर सीरम लावल्यानंतर कशी घ्यावी केसांची काळजी – Post Hair Serum Tips In Marathi
  9. घरी कसं बनवावं हेअर सीरम – How To Make Hair Serum At Home In Marathi
  10. तेलकट केसांसाठी (Serum For Oily Hair)
  11. कोरड्या केसांसाठी (Serum For Dry Hair)
  12. बाजारात मिळणारे उत्कृष्ट हेअर सीरम – Best Hair Serum Products
  13. पॅराशूट अॅडव्हान्स कोकोनट सीरम ऑईल (Parachute Advansed Coconut Serum Oil)
  14. स्ट्रीक्स हेअर सीरम (Streax Hair Serum)
  15. लिवाॅन सीरम (Livon Serum)
  16. बायोटिक माऊंटन इबाॅनी व्हाईटलायजिंग सीरम फाॅर फाॅलिंग हेअर इंटेन्सिव्ह हेअर ग्रोथ ट्रिटमेंट (Biotique Mountain Ebony Vitalizing Serum For Falling Hair Intensive Hair Growth Treatment)
  17. पँटीन ऑईल रिप्लेसमेंट (Pantene Oil Replacement)

योग्य हेअर सीरमची निवड कशी करायची?

केसांवर हेअर सीरम लावण्याची पद्धत

हेअर सीरम लावल्यानंतर कशी घ्यावी केसांची काळजी

ADVERTISEMENT

घरी कसं बनवावं हेअर सीरम

जाणून घ्या काय आहे हेअर सीरम – What Is Hair Serum?

Hair Serum 1

हेअर सीरम केसांची काळजी घेणारं एक उत्पादन आहे. तसं तर हे लिक्विड स्वरूपात असतं. पण याचं टेक्स्चर मात्र थोडं जाड असतं. हेअर सीरम बनवण्यासाठी सिलीकॉन, सेरामाईड्स आणि अमिनो अॅसिडसह बऱ्याच रसायनांचा वापर केला जातो. यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण घटक असतो तो म्हणजे सिलीकॉन कारण याच्या मदतीने तुमचे कोरडे, फ्रिजी असणारे केस अतिशय स्मूथ आणि मुलायम होतात. तसंच केसांमध्ये चमकदारपणा येतो. बाजारामध्ये असे अनेक सीरम आहेत, जे तुम्ही तुमच्या केसांच्या टेक्स्चरप्रमाणे निवडून लाऊ शकता. एखादं चांगलं हेअर सीरम धूळ, माती, प्रदूषण आणि सूर्याच्या किरणांपासून तुमच्या केसांचं संरक्षण करतं आणि ते सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. तुमचा जास्तीत जास्त वेळ हा बाहेर जात असेल तर हेअर सीरम केसांना लावणं हा तुमच्यासाठी उत्कृष्ट पर्याय आहे.

हेअर सीरमचे फायदे – Hair Serum Benefits In Marathi

फ्रिजी केसांना बनवतं मुलायम आणि सिल्की

Hair Serum 4

कुरळे आणि फ्रिजी केस असतील तर त्यावर हेअर सीरम लावल्यास, खूपच चांगलं काम करतं. हे केसांचा कोरडेपणा मिटवून त्यावर चमकदारपणा आणतं आणि शिवाय केस सिल्की बनवण्यास मदत करतं. याशिवाय तुमच्या केसांचा गुंता झाला असल्यास, तो सोडवण्यासाठीही मदत करून केस तुटण्यापासून वाचवतं. सीरममुळे तेलाशिवाय आणि चिकटपणाशिवाय पोषण करतं आणि सुरक्षादेखील मिळवून देतं.

इनग्रोउन केस प्रतिबंधाबद्दल देखील वाचा

ADVERTISEMENT

हेअर स्टायलिंग करा सोपी

Hair Serum 5

हेअर सीरम आपल्या केसांना नियंत्रणात आणतं आणि हेअर स्टायलिंग करणं त्यामुळे सोपं होतं. तुम्हाला रोज नवी हेअर स्टाईल करायची असेल तर त्यासाठी हेअर सीरमची चांगली मदत होते. तुम्हाला तुमच्या केसांची स्टाईल करण्यासाठी जर हिटिंग स्टूलचा वापर करावा लागत असेल तर तुम्हाला त्याआधी हेअर सीरम नक्की वापरायला हवं. यामुळे तुमची हेअर स्टाईल आरामात होते शिवाय हिटिंग टूलमुळे तुमच्या केसांना हानीही पोहचवत नाही. हेअर सीरममध्ये अमिनो अॅसिड असतं जे तुमच्या केसांच्या स्टाईल करताना केसांची सुरक्षा करण्यासाठी मदत करतं.

केसांना बनवतं मजबूत

Hair Serum 6

हेअर सीरममुळे तुमचे केस तुटण्यापासून वाचतात शिवाय तुम्हाला जर केसांना फाटे फुटण्याचा त्रास असेल तर त्यातूनही यामुळे सुटका होते. हेअर सीरममधील पोषक तत्वामुळे केसांवर जमा झालेली घाण अर्थात धूळ, माती, प्रदूषण आणि सूर्याच्या किरणांमुळे होणारा परिणाम यापासून सीरम सुरक्षा करतं आणि केसांना मजबूती देतं. हेअर सीरम केसांवर लगेच परिणाम करतं आणि त्यामुळे केसांना योग्य चमक मिळते आणि सौंदर्य मिळतं.

केसांच्या वाढीसाठी असलेल्या आहाराबद्दल देखील वाचा

योग्य हेअर सीरमची निवड कशी करावी – Best Hair Serum In Marathi

Hair Serum 3

कोणत्याही अन्य उत्पादनाप्रमाणे हेअर सीरम बाजारामध्ये वेगवेगळ्या घटकांमध्ये मिळतात. हेअर सीरममध्ये असणारे घटक हे तुमच्या केसांच्या टेक्स्चरनुसार असतात. त्यामुळे सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या केसांचं योग्य टेक्स्चर आणि योग्य दर्जा जाणून घ्यायला हवा. त्यानंतरच तुम्ही तुमच्या केसांप्रमाणे हेअर सीरमची निवड करा. कदाचित तुम्हाला हे जाणून घेण्यासाठी आधी दोन अथवा तीन सीरम केसांवर वापरूनदेखील पाहायला लागू शकतात. कारण हेअर सीरम नेहमी वापरण्यापूर्वी तुमच्या केसांसाठी योग्य हेअर सीरम कोणता आहे हे माहीत करून घेणं गरजेचं आहे.

ADVERTISEMENT

बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे सीरम वेगवेगळ्या किमतीमध्ये उपलब्ध आहेत, पण तुम्हाला तुमच्या केसांची काळजी घ्यायची असेल तर कोणतंही हेअर सीरम विकत घेऊ नका. नेहमी चांगल्या कंपनीचं आणि माहिती करूनच हेअर सीरमची खरेदी करा. ज्या गोष्टीवर तुम्ही खर्च करणार आहात, त्याचा योग्य फायदादेखील तुम्हाला मिळायला हवा हे नेहमी लक्षात ठेवा. एकदा तुम्ही हेअर सीरम वापरायला सुरुवात केल्यानंतर आपल्या केसांकडे व्यवस्थित लक्ष द्या. काही आठवडे सीरम वापरल्यानंतर जर तुमचे केस कोरडे पडू लागले अथवा अधिक तुटायला लागले तर लगेच तुम्ही सीरम बदला. केसांना निरोगी ठेवण्यासाठी योग्य हेअर सीरम लावणं गरजेचं आहे.

केसांवर हेअर सीरम लावण्याची पद्धत – How To Use Hair Serum In Marathi

Hair Serum 2

तुम्ही जर विचार करत असाल की, या सीरमचा उपयोग करणं ही कोणती मोठी गोष्ट आहे, फक्त हातावर थोडंसं सीरम घेतलं आणि केसांवर लावलं हे इतकं सोपं आहे. पण हे तुम्हाला जितकं वाटतं आहे तितकं सोपं नक्कीच नाही. हेअर सीरम लावण्याचीही एक योग्य पद्धत असते. आम्ही तुम्हाला याठिकाणी सीरम लावण्याच्या काही पद्धती सांगणार आहोत.

1- जेव्हा तुमचे केस खूपच कोरडे वाटत असतील, तेव्हा सीरम एकदम लवकर केसांमध्ये बसतं. अशा स्थितीत काळजी करण्यापेक्षा केसांवर पुन्हा एकदा सीरम लावा. तसंच कोणत्याही वेळी तुमचे केस पुन्हा कोरडे दिसू लागल्यास त्यावर चमक आणण्यासाठी तुम्ही पुन्हा हेअर सीरमचा वापर करू शकता.

2- ज्यांचे केस घनदाट आहेत, अशा व्यक्तींना सीरमची गरज नाही. त्यामुळे तुमचे केस तेलकट होण्यासह लवकर खराब होऊ शकतात. हेअर सीरमचा वापर तुमच्या केसांना अधिक तेलकट बनवू शकतो. सरळ शब्दात सांगायचं तर, सीरम कोरड्या केसांवरच जास्त उपयोगी आहे.

ADVERTISEMENT

वाचा – लांबसडक आणि घनदाट केसांच्या वाढीसाठी 10 घरगुती उपाय

3- तुमचे केस पहिल्यापासूनच योग्य आणि सेट असतील, तर अशा केसांवर सीरम लाऊ नये. कारण तसं केल्यास, केस अधिक चिकट होऊ शकतात. तसंच सीरम नेहमी कमी प्रमाणात लावावं आणि केसांची लांबी ज्या दिशेने वाढणार आहे त्याच दिशेने लावावं.

4- तुम्ही जर पहिल्यांदाच सीरमचा वापर करणार असाल तर सर्वात पहिले केसांच्या मागच्या भागावर याचा वापर करून पाहा.  पहिल्यांदाच पुढच्या केसांवर लावल्यास, हेअरस्टाईलवर त्याचा परिणाम होऊ शकतो.

5- आपल्या केसांची लांबी आणि घनदाटपणा पाहून, आपल्या हातावर हेअर सीरमचे दोन थेंब घ्या आणि यात मिसळण्यासाठी दोन्ही हातावर नीट घासून घ्या. हेअर सीरम धुतलेल्या केसांवरच लावावं. तुम्ही जेव्हा धुतलेल्या केसांंवर हेअर सीरम लावत असता, तेव्हा टॉवेलने केस इतकेच पुसून घ्या, जेणेकरून तुमचे केस बऱ्यापैकी ओले राहतील.

ADVERTISEMENT

6- आता आपल्या केसांना मागच्या बाजूला घ्या आणि केसांना खालून वरच्या बाजूने हेअर सीरम लावा. त्यानंतर केस सरळ करून घ्या. आता हेअर सीरमचे काही थेंब घ्या आणि पुन्हा सर्व केसांवर लावा. असं केल्यामुळे तुमचे केस योग्य प्रकारे सेट होतात.

हेअर सीरम लावल्यानंतर कशी घ्यावी केसांची काळजी – Post Hair Serum Tips In Marathi

Hair Serum 7

1- तुम्ही जेव्हा एक वेळ सीरम आपल्या केसांवर योग्य तऱ्हेने लावता, तेव्हा केस खालच्या बाजूने विंचरा. त्यामुळे केसातील गुंता योग्यरित्या सोडवण्यास मदत होते. हेअर सीरम लावल्यानंतर केस पूर्ण सुकवा. कारण केस ओले राहिले तर यावर लगेच धूळ, माती आणि इतर घाण चिकटून बसते.

2- तुम्ही जर नेहमी हेअर स्ट्रेटनरजचा वापर करत असाल, तर त्याआधी केसांवर हेअर सीरम लावा. त्यानंतरच हेअर स्ट्रेटनरचा वापर करा. सीरम तुमच्या केसांवर होणाऱ्या ओव्हर हिटिंग आणि डॅमेज होण्यापासून वाचवतं.

3- हेअर सीरम कधीही तुमच्या केसांच्या मुळाशी रगडू नका. हे लावल्यानंतर केसांवर हळू हळू कंगवा फिरवा. तुम्हाला हवं तर तुम्ही तुमच्या हाताच्या बोटांचा वापर करूनही केसातील गुंता सोडवू शकता. त्यामुळे केसगळती होण्याची भीती राहात नाही.

ADVERTISEMENT

4- एकाच कंपनीचं हेअर सीरम वापरून तुमचे केस कोरडे होत आहेत असं जर तुम्हाला वाटायला लागलं तर, तुम्ही योग्य वेळी सीरम बदला

5- कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नक्कीच चांगला नसतो. सीरमचा गरजेपेक्षा जास्त वापर हा केसांसाठी योग्य नाही. हेअर सीरम रोज वापरण्याचा प्रयत्न करू नका. जरी तुम्हाला याची रोज वापरण्याची गरज भासत असली तरीही हेअर सीरमचे अगदी थोडे थेंबच वापरा.

वाचा – पुण्यातील बेस्ट हेअर सलून

घरी कसं बनवावं हेअर सीरम – How To Make Hair Serum At Home In Marathi

Hair Serum 8

तुम्हाला हवं तर तुम्ही घरच्या घरी रसायनरहित हेअर सीरम बनवून त्याचा वापर करू शकता. हेअर सीरम घरी तेलकट आणि कोरड्या केसांसाठी इसेन्शियल तेलाच्या मदतीने सहज बनवता येऊ शकतं.

ADVERTISEMENT

तेलकट केसांसाठी (Serum For Oily Hair)

तेलकट केसांसाठी सीरम बनवताना बेस स्वरूपात हलक्या तेलाचा उपयोग करायला हवा. नारळ तेल आणि जोजोबा ऑईल हे इतर तेलांच्या तुलनेत अधिक हलके असतात आणि त्यामुळे तेलकट केसांसाठी आणि स्कॅल्पसाठी हे योग्य आहे. याबरोबर तुम्हाला इसेन्शियल ऑईल निवडण्याची अधिक गरज असते. याचं मिश्रण तेलकट केसांसाठी योग्य हेअर सीरम बनवण्यासाठी फायदेशीर ठरतं.

सीरम बनवण्यासाठी लिंबू आणि पेपरमिंटप्रमाणे घटकांमधील तेलाचे काही थेंब 100 मिली नारळ तेल अथवा जोजोबा ऑईलमध्ये मिसळून एक टाईट बरणीत भरून ठेऊन द्या. हे तेल केसांना मऊ मुलायम ठेवण्यासह केस अधिक तेलकट होण्यापासून वाचवतं. तुम्ही जर हे तेल सकाळी लाऊ इच्छित नसाल तर, रात्री झोपण्यापूर्वी लावा आणि केसांना नीट मालिश करून झोपा.

वाचा – केस हायलाईटस करताय,मग तुम्हाला या गोष्टी माहीत हव्यात

कोरड्या केसांसाठी (Serum For Dry Hair)

कोरडे केस हे जास्त खराब आणि त्यातही फाटे फुटलेले दिसतात. यासाठी सीरम तयार करताना एरंडाचं तेल बेस म्हणून वापरायला हवं. हे केसांमध्ये अधिक चमक आणतं तसंच केसांना चांगलं मॉईस्चराईजही करतं. शिवाय ड्राय स्कॅल्प आणि शीशम अथवा लव्हेंडरसासरख्या तेलाचे घटक यासाठी चांगले आहेत.

ADVERTISEMENT

सीरम बनवण्यासाठी 100 मिली शुद्ध एरंडाचं तेल त्याबरोबर शीशम अथवा लव्हेंडरपैकी कोणत्याही इसेन्शियल ऑईलचे थोडेसे थेंब यामध्ये मिसळा. आता हे मिश्रण नीट हलवून एरअटाईट बाटलीमध्ये ठेवा. तुम्हाला जर एरंडाचं तेल जास्तच जाड वाटत असेल तर यामध्ये 20 मिली नारळ तेलदेखील तुम्ही मिक्स करू शकता.

हे हेअर सीरम तुमच्या कोरड्या स्कॅल्पवर रोज लाऊन मसाज केल्यास, तुमचे केस कधीही फाटे फुटलेले दिसणार नाहीत शिवाय मजबूत होऊन अधिक चमकदार होतील. रात्रभर तुम्ही तुमच्या केसांना हे सीरम लाऊन ठेवलंत तर तुम्हाला याचा दुप्पट फायदा मिळू शकतो.

बाजारात मिळणारे उत्कृष्ट हेअर सीरम – Best Hair Serum Products

तुम्हाला घरी सीरम बनवण्याइतका वेळ नसेल तर आम्ही तुमच्यासाठी बाजारात मिळणाऱ्या काही चांगल्या ब्रँडच्या सीरमबद्दल सांगणार आहोत. जाणून घेऊया तुम्ही कोणते सीरम वापरू शकता –

पॅराशूट अॅडव्हान्स कोकोनट सीरम ऑईल (Parachute Advansed Coconut Serum Oil)

Parachute Advansed Coconut Serum Oil
लाॅरिअल पॅरिस स्मूथ इन्टेन्स इन्स्टंट स्मूदिंग सीरम (L’Oreal Paris Smooth Intense Instant Smoothing Serum)

L'Oreal Paris Smooth Intense Instant Smoothing Serum

जाणून घेऊया केसगळतीची मुख्य कारणं काय आहेत

ADVERTISEMENT

स्ट्रीक्स हेअर सीरम (Streax Hair Serum)

Streax Hair Serum

लिवाॅन सीरम (Livon Serum)

Livon Serum

बायोटिक माऊंटन इबाॅनी व्हाईटलायजिंग सीरम फाॅर फाॅलिंग हेअर इंटेन्सिव्ह हेअर ग्रोथ ट्रिटमेंट (Biotique Mountain Ebony Vitalizing Serum For Falling Hair Intensive Hair Growth Treatment)

Biotique Mountain Ebony Vitalizing Serum
मॅट्रिक्स बायोलेज 6 इन 1 स्मूथ प्रूफ डीप स्मूदिंग सीरम (Matrix Biolage 6 In 1 Smooth Proof Deep Smoothing Serum)

Matrix Biolage 6 In 1 Smooth Proof Deep Smoothing Serum

पँटीन ऑईल रिप्लेसमेंट (Pantene Oil Replacement)

Pantene Oil Replacement

फोटो सौजन्य – Shutterstock

तुम्हाला कदाचित या गोष्टी आवडतील:

Effective Home Remedies For Long Hair In Marathi

Home Remedies For Black Hair In Marathi

ADVERTISEMENT

Home Remedies For Hair Growth In Marathi

केस गळतीवर घरगुती उपाय (How To Stop Hair Fall In Marathi)

09 May 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT