ADVERTISEMENT
home / Long Hair
if you want voluminous hair then stop doing these mistakes

लांबसडक आणि घनदाट केस हवे मग आजच बदला या सवयी

केस गळणे ही अनेकांना सतावणारी एक मोठी समस्या आहे. केस गळण्याची कारणं अनेक असू शकतात. वातावरणातील बदल, आजारपण, हॉर्मोनल असंतुलन, केसांची निगा न राखणं यासोबत तुमच्या काही चुकीच्या सवयी तुमचे केस गळण्याला कारणीभूत ठरू शकतात. जर तुमचे केस लांबसडक असतील तर ते गळू लागल्यावर फार वाईट वाटतं. कारण केस पुन्हा वाढण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. यासाठीच केस लांब असतील तर वेळीच बदला या सवयी ज्यामुळे तुमचे केस कायम राहतील लांबसडक

लांब केस असतील तर या चुका करणं टाळा

या चुका केल्यामुळे तुमचे लांबसडक केस गळून पातळ आणि लहान होऊ शकतात. यासाठी केस घनदाट राहण्यासाठी या चुका आवर्जून टाळण्याचा प्रयत्न करा. 

सतत शॅंपू करणे 

केसांची निगा राखण्यासाठी ते नियमित स्वच्छ करणे आणि शॅंपू करणे गरजेचे आहे. मात्र यासाठी दररोज अथवा एक दिवस आड केस धुणं नक्कीच योग्य नाही. केस खराब झाले नाही तरी जर ते दररोज धुतले तर ते गळून पातळ होण्याची शक्यता असते. यासाठी आठवड्यातून  दोन ते तीन वेळा केस धुवा. अती प्रमाणात शॅंपू केल्यामुळे केस गळण्याची शक्यता वाढते.

केस टॉवेलने रगडून पुसणे

जर तुमचे केस लांबसडक असतील तर हा नियम तुम्ही पाळायलाच हवा. कारण जर तुम्ही तुमचे ओले केस सुकवण्यासाठी ते टॉवेलने बांधून ठेवले अथवा रगडून पुसले तर केसांची मुळे कमजोर होतात आणि केस गळू लागतात. यासाठी केस टर्किशच्या टॉवेलने पुसण्यापेक्षा एखाद्या जुन्या सॉफ्ट टीशर्टने पुसा.

ADVERTISEMENT
if you want voluminous hair then stop doing these mistakes

केस सिल्की करण्यासाठी घरगुती उपाय (Silky Hair Tips In Marathi)

गरम पाण्याने केस धुणे

केस धुण्यासाठी गरम पाणी वापरणे अतिशय चुकीचे आहे. कारण गरम पाण्यामुळे तुम्हाला केस धुताना बरं वाटत असलं तरी त्यामुळे केसांची मुळं दुखावली जातात.गरम पाण्याने केस धुतल्यामुळे तुमचे केसस मोठ्या प्रमाणावर गळू लागतातच शिवाय ते पातळही होतात. यासाठीच लांबसडक आणि घनदाट केसांसाठी केस नेहमी थंड पाण्यानेच धुवावे.

आयुर्वेदिक पद्धतीने घ्या केसांची काळजी (Ayurvedic Hair Care Tips In Marathi)

केस घट्ट बांधून ठेवणे

वर्क फ्रॉम होम करताना हेअर स्टाईलसाठी वेळ नसल्यामुळे आणि कंटाळा आल्यामुळे आपण केस वर बांधून ठेवतो. ज्यामुळे काम करताना सुटसुटीत वाटू शकतं. पण यामुळे तुमच्या केसांचं मात्र नुकसान होतं. कारण केस वर घट्ट बांधून ठेवल्यामुळे केस ताणले जातात आणि तुटून गळू लागतात. यासाठीच केस मोकळे सोडा अथवा सैल बांधा. 

ADVERTISEMENT

केस सरळ करण्यासाठी घरगुती उपाय (Kes Saral Karnyasathi Upay)

केसाना तेल न लावणे 

केसांचे उत्तम पोषण होण्यासाठी केसांना तेल लावण्याची गरज असते. मात्र तेल लावण्यामुळे केस चिकट होतात म्हणून बऱ्याचदा केसांना तेल लावणं टाळलं जातं. मात्र असं करू नका. कारण केसांना नियमित तेलाने मालिश केल्यामुळे केसांच्या मुळांना चांगले पोषण मिळते. आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा नारळाचे तेल, बदामाचे तेल, ऑलिव्ह ऑईल अथवा कोणतेही हेअर ऑईल थोडं कोमट करून केसांना लावा आणि हलक्या हाताने केसांना मसाज करा. ज्यामुळे तुमचे केस नक्कीच लांब आणि घनदाट होतील. 

24 Sep 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT