ADVERTISEMENT
home / Periods
Menstrual Hygiene In Marathi

मासिक पाळीच्या स्वच्छतेचे महत्त्व माहीत आहे का तुम्हाला (Menstrual Hygiene In Marathi)

मासिक पाळी प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक नैसर्गिक अवस्था आहे, तरीही याबद्दल अद्यापही क्वचितच चर्चा केली जाते. एखादी महिला आपल्या आयुष्यातील 1800 दिवसांपेक्षा जास्त काळ मासिक पाळीमध्ये घालवते. दुसऱ्या शब्दात बोलायचं झालं तर, तिच्या आयुष्यातील सुमारे 5 वर्षे रक्तस्त्रावातच (Bleeding) घालवावी लागतात.

मासिक पाळी ही सामान्य शारीरिक प्रक्रिया असूनही, समाजामध्ये मासिक पाळीबद्दल माहितीचा अभाव आणि अनेक गैरसमज असल्याचं दिसून येतं. यामध्ये जागरूकतेचा अभाव असल्यामुळे अशा मुलींमध्ये ‘गंभीर धोका’ उद्भवू शकतो. पाळी उशिरा येणे असो वा लवकर येत असो मासिक पाळीच्या वेळी स्वच्छता पाळणं खूपच गरजेचं असतं. पण तुम्हाला माहीत आहे का? आपल्या देशात सॅनिटरी पॅड / स्वतः तयार केलेले नॅपकिन्सचा विवाहित स्त्रियांपैकी फक्त 15% स्त्रिया याचा वापर करतात. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये नक्की काय स्वच्छता पाळायला हवी आणि याचं काय महत्त्व आहे याबद्दल आम्ही जसलोक हॉस्पिटलच्या डॉ. शिल्पा अग्रवाल यांचं मत घेतलं. त्यांनी आम्हाला दिलेली माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत आहोत.

मासिक पाळीच्या वेळी वापरल्या जाणा-या पद्धती

1. सॅनिटरी नॅपकिन्स

2. कापसापासून बनविलेले सॅनिटरी पॅड

ADVERTISEMENT

3. कॉटन क्लॉथ्स

4. मेन्स्ट्रुएल टॅम्पन्स

5. मेन्स्ट्रुएल कप

napkins FI

ADVERTISEMENT

आरोग्यासाठी वापरल्या जाणारे प्रमुख निर्धारण घटक हे पुढील प्रमाणे विभागली गेली आहे, उच्च माध्यमिक शिक्षण, १८ वर्षानंतर महिलेचे लग्न झालेले असणे आणि शहरी भागात राहणारी. आदिवासी समाजातील महिला, अनुसूचित जातीच्या स्त्रियांच्या तुलनेत स्वच्छतेचा वापर अधिक करतात. शौचालय सुविधा असलेल्या स्त्रिया मासिक पाळीच्या वेळी स्वच्छता पद्धती वापरतात. वैयक्तिक स्वच्छतेबद्दल जनमानसामध्ये न बोलणाऱ्या महिला काळजी घेतात. खुलेपणाने न बोलणाऱ्या महिला या स्वच्छतेची काळजी घेतच नाहीत. मासिक पाळीच्या काळात सॅनिटरी पॅडच्या वापरास उत्तेजन देण्यासाठी तसेच जागरूकता, परवडणारी पॅड  आणि गोपनीयतेवर त्वरित लक्ष देणं आवश्यक आहे. बऱ्याच ठिकाणी महिला मासिक पाळीच्या दिवसात घरगुती कापड वापरतात. पण त्या कापडाने त्रास होतो हे बऱ्याच महिलांना लक्षात येत नाही. कारण असे कपडे कितीही धुतले तरीही स्वच्छ धुतले जात नाहीत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे निर्जन ठिकाणी आणि कुबट वातावरणात असे कपडे वाळवले जातात. त्यामुळे अशा कपड्यांना थेट सूर्यप्रकाश मिळत नाही. ही गोष्ट खूपच आश्चर्याची आहे की, भारतात सुमारे 1% महिला मासिक पाळीच्या वेळी काहीही वापरत नाहीत.

महत्वाचे घटक

 • रक्तस्त्राव कमी असल्यासदेखील पॅड वारंवार बदलायला हवे.
 • वापरलेले पॅड पेपरमध्ये गुंडाळून फेकून द्यावे.
 • आपत्कालीन परिस्थितीतही पॅड हे पर्समध्ये साठवू नका, जरी आपण स्टोअर करत असाल तर ते कागदामध्ये गुंडाळून ठेवा.
 • आपण सुती कापड वापरत असल्यास, असे कपडे व्यवस्थित धुवा आणि सूर्यप्रकाशात वाळवा
 • कपडे बंद खोलीत, निर्जन ठिकाणी आणि अनैसर्गिक ठिकाणी सुकवू नका
 • भरपूर प्रमाणात पाणी प्या
 • मुलींसाठी डस्टबिन्स, पाणी, वेगवेगळ्या शौचालयांची उपलब्धता, स्वच्छता पॅड आवश्यक आहेत.

वाचा – मासिक पाळी येण्यासाठी उपाय

मासिक पाळी चालू असताना स्वच्छता न केल्यास-

 • आरटीआय आणि योनि संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते
 • एलर्जी
 • प्रजननक्षम संक्रमण
 • यामुळे आई होण्यात बाधा येते

napkins

किशोरवयीन मुलींना मासिक पाळी स्वच्छता आणि प्रजनन ट्रॅक्ट इन्फेक्शनचा धोका कसा असतो हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. प्रशिक्षित शाळा नर्स / आरोग्य कर्मचारी, शैक्षणिक दूरदर्शन कार्यक्रम आणि इतर बरेच लोक यासारख्या किशोरवयीन मुलींना योग्य मासिक पाळी स्वच्छतेचा संदेश प्रसारित करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. गरिबी, डिस्पोजेबल सेनेटरी पॅड्सची अधिक किंमत आणि काही प्रमाणात अज्ञानामुळे लोक बाजारात उपलब्ध मासिक स्त्रियांचा वापर करण्यास अडथळा येत असल्याचे दिसत आहे. तरूण वयातील मुलींमध्ये जागरूकता करण्यासाठी विविध कार्यक्रम आखले जाऊ शकतात. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक महिलेपर्यंत मासिक पाळीच्या स्वच्छतेचं महत्त्व पोहचायला हवं.

ADVERTISEMENT

हेदेखील वाचा – 

मासिक पाळीच्या समस्या आणि त्यावरील उपाय
Period Tracker वापरण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का
पीसीओडी समस्या आणि त्यावरील उपाय

24 May 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT