ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
रणबीर कपूर लवकरच चाहत्यांना देणार सरप्राईझ, व्हिडिओ केला शेअर

रणबीर कपूर लवकरच चाहत्यांना देणार सरप्राईझ, व्हिडिओ केला शेअर

अभिनेता रणबीर कपूरचे चाहते अनेक आहेत. कपूर खानदानचे नाव रोशन करत हा अभिनेता सतत चाहत्यांसाठी काहीतरी नवीन धमाल घेऊन येत असतो. त्याचा विविध अंगी अभिनय चाहत्यांना मनोरंजनाने खिळवून ठेवतो. रणवीरचे नाव सध्या आलियासोबत जोडलेलं असल्यामुळे या लव्हबर्डच्या विषयी जाणून घेण्यासही चाहते नेहमीच उत्सुक असतात. आता रणवीर चाहत्यांसाठी एक खास सरप्राईझ घेऊन येणार आहे. नुकतंच त्याने सोशल मीडियावर असा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामुळे चाहत्यांना आता याविषयी अधिकच उत्सुकता लागली आहे.

काय आहे रणबीरचं सरप्राईझ

कोरोनामुळे सध्या बॉलीवूडचे मोठमोठे प्रॉजेक्ट पुन्हा रखडले आहेत. मागचं वर्षभर चित्रपटाचं शूटिंग आणि त्यामुळे प्रदर्शनही रखडलं होतं. पुन्हा सगळं सुरू होतं ना होतं तेवढ्यात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि मुंबईत लॉकडाऊन झालं. आता मोठमोठ्या बॅनरचे चित्रपट रखडल्यामुळे मोठ्या पडद्यावरील मनोरंजनाला काही काळासाठी स्वल्पविराम नक्कीच लागला आहे. मात्र असं असलं तरी डिजिटल माध्यमावरील मनोरंजनाचा धमाका आजही सुरूच आहे. उलट मागच्या वर्षीपासून ओटीटी माध्यमावर चाहत्यांचा ओढा जरा जास्तच वाढला आहे. ज्यामुळे बॉलीवूडच्या मोठ्या कलाकारांनाही आता डिजिटल माध्यमात पदार्पण करण्याची ओढ लागली आहे. एका पाठोपाठ एक कलाकार डिजिटल माध्यमाकडे वळत आहेत. डिजिटल डेब्यूच्या  या लिस्टमध्ये आता अभिनेता रणबीर कपूरदेखील सहभागी झाला आहे. त्याने नुकताच एक असा एक व्हिडिओ नेटफ्लिक्सवर शेअर केला आहे. ज्यामुळे त्याच्या डिजिटल डेब्यूची हिंट चाहत्यांना मिळू शकते. 

रणबीरने या व्हिडिओत शेअर केलं आहे की…

या व्हिडिओमध्ये रणवीर नेटफ्लिक्सबाबत थोडी माहिती सांगताना दिसत आहे. ज्यात तो म्हणतो की, “तुम्हाला या फ्लॅटफॉर्मवर कॉमेडी, ड्रामा, रोमांस, कार्टून सगळं पाहायला मिळतं…. म्हणजे संपूर्ण फॅमिली एंटरटेंटमेंट… मग तो थोडावेळ थांबतो आणि त्याच्या लक्षात येतं की, सध्या तर सगळे क्रिकेट बघण्यात बिझी आहेत. म्हणून तो चाहत्यांना सांगतो की,  “ठीक आहे तुम्ही सर्व बिझी असाल तर आईपीएलनंतर मी तुम्हाला लवकरच भेटायला येईन” याचाच अर्थ रणवीर लवकरच डिजिटल डेब्यू करणार आहे. आता त्याच्या या “सी यू सून”चा अर्थ नेमका काय आहे हे आईपीएलनंतरच चाहत्यांना समजू शकेल. मात्र चाहत्यांनी असा अंदाज लावला आहे की यानिमित्ताने रणबीर नेटफ्लिक्सवर धमाकेदार एंट्री करण्यासाठी नक्कीच सज्ज झाला आहे. शिवाय रणवीरचा हा व्हिडिओ नेहमी प्रमाणेच मजेशीर असल्यामुळे चाहत्यांना या प्रोजेक्टविषयी जाणून घण्याची ओढदेखील लागली आहे. 

ADVERTISEMENT

instagram

कारण मनोरंजनाचा ओघ सुरूच राहणार

रणबीर कपूरचा संजू चित्रपट प्रदर्शित होऊन आता जवळजवळ अडीच वर्षे उलटली आहेत. ‘संजू’ अभिनेता संजय दत्त ची बायोपिक होती आणि त्यात रणबीर कपूरच्या अभिनय आणि लुक्सची चांगलीच प्रशंसा झाली होती. त्यानंतर मात्र रणबीर कपूर कोणत्याच चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आलेला नाही. सध्या त्याचा ड्रीम प्रोजेक्ट ‘ब्रम्हास्त्र’ कोरोनामुळे चांगलाच रखडला आहे. ब्रम्हास्त्र एक बिग बजेट चित्रपट आहे. तो तीन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. बिग बजेट असल्यामुळे चित्रपट तयार असूनही तो प्रदर्शित केला जाऊ शकत नाही. त्यामुळे ब्रम्हास्त्रच्या प्रदर्शित होण्याची वाट पाहत बसण्यापेक्षा रणबीरने डिजिटल माध्यमावर डेब्यू करण्याचा निर्णय घेतला असावा. कारण काही झालं तरी प्रेक्षकांचे मनोरंजन व्हायलाच हवे. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

ADVERTISEMENT

या कारणासाठी ‘गंगूबाई काठियावाडी’ होणार ओटीटीवर प्रदर्शित

‘रूद्र दी ऐज ऑफ डार्कनेस’मधून अजय देवगन करणार डिजिटल डेब्यू

आरस्पानी सौंदर्याने केलंय अमृताने चाहत्यांना घायाळ

25 Apr 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT