ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या लग्नाला आधीपासून बिग फॅट इंडियन असंच म्हंटल जात आहे. आशियातील सर्वात श्रीमंत आणि बिझनेस टायकून असणाऱ्या मुकेश अंबानींच्या मुलीचे ईशाचे 12 डिंसेबरला आहे. या लग्नावर होणारा खर्च हा तब्बल 700 करोड इतका असल्याचं कळतंय.
लेक कोमो येथील साखरपुडा आणि उदयपूरमधले प्री वेडींग फंक्सन्स बघता खऱ्या विवाह सोहळ्याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. विवाह सोहळा अंबानींच्या मुंबईतल्या 27 मजली अॅंटीलिया या निवासस्थानी होणार आहे. या लग्न सोहळ्यासाठी या निवासस्थानी खास सजावट ही केल्याचं दिसलं.
व्हिडीओ सौजन्य : Instagram
शाही लग्नाचं शाही सेलिब्रेशन
या शाही लग्नासाठी येणाऱ्या पाहूण्यांची ने-आण करण्यासाठी तब्बल 100 विमानांचा ताफा तैनात करण्यात आला होता. या लग्नाचे प्री वेडींग फंक्शन्स खास उदयपूरमध्ये साजरे करण्यात आले. या फंक्शन्ससाठीही 100 विमानांची सोय महाराणा प्रताप विमानतळावर करण्यात आली होती. तसंच अंबानी आणि पिरामल यांचे पाहूण्यांसाठी खास 5 स्टार हॉटेल्सचे बुकिंग करण्यात आले होते. या पाहूण्यांच्या यादीत पॉप सेन्सेशन बियॉन्से आणि हिलरी क्लिंटन, रतन टाटा आणि अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींचाही समावेश होता. या सर्व तयारीसाठी खास मुंबईमध्ये वॉर रुम तयार करण्यात आली होती. या प्री वेडींग फंक्शनसोबतच अंबानी कुटुंबियांनी उदयपूरमध्ये तीन दिवस अन्नदान ही केलं होतं. तसंच स्थानिक उद्योगांना चालना मिळावी यासाठी खास बाजाराचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यामध्ये 108 पारंपारिक भारतीय चित्र, स्थानिक कलांकाराांचे कलाविष्कारांचाही समावेश होता.
ईशा अंबानीच्या ‘प्रि-वेडींग’ साठी उदयपूर सज्ज
ईशा अंबानीची जयपूरमधील प्री-वेडींग फंक्शन्स
लग्नानंतर ईशा आणि आनंद राहणार या ठिकाणी
लग्नानंतर ईशा अंबानी आणि आनंद पिरामल हे जोडपं मुंबईतल्या गिल्टा बिल्डींगमधील डायमंड थीम मॅन्शनमध्ये शिफ्ट होणार आहेत. या प्रॉपर्टीची किंमतही तब्बल 450 कोटी एवढी आहे.
ईशा अंबानीच्या लग्नाचा समावेश जगातील सर्वात महागडया लग्नांमध्ये
तब्बल महिनाभर आधीपासून प्री वेडींग फंक्शन्स सुरू असलेलं भारतातील एकमेव लग्न आहे, असं म्हणायला हरकत नाही. या लग्नाची आमंत्रण पत्रिकाच तब्बल प्रत्येकी 3 लाखांची होती. आपली मुलगी ईशा हिच्यावरील प्रेमापोटी मुकेश अंबानींनी अगदी पाण्यासारखा पैसा खर्च केल्याचं चित्र आहे. या लग्नाची तुलना प्रिन्स चार्ल्स आणि लेडी डायना यांच्या लग्नात झालेल्या खर्चाशी होत आहे.